वेध माझा ऑनलाईन ; बाळासाहेबांच्या विचारांचा स्वाभिमान एकनाथ शिंदे यांनी जपला आहे, अन्यथा विकली जाणारी लोकही आम्ही पाहिली आहेत. तेव्हा आदित्य ठाकरेंनी वयाप्रमाणेच बोलावे. आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत. अडीच वर्षात आपल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिना सुद्धा गेले नाहीत. लोकाची सेवा, राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय ते कधी समजू शकले नाहीत असा घणाघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे केला ते टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळ कराड यांच्या शताब्दी महोत्सावास आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे अनमॅच्युअर
आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युअर वक्तव्यामुळेच आमच्यात फूट पडली पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच सांगेन
आमचा ठाम निश्चय हाच आहे की आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरच चालणार. आम्ही एकच मागणी केली होती, हिंदू विचारांशी प्रामाणिक रहा. परंतु काश्मीरमध्ये जावून हे काॅंग्रेस पुढाऱ्यांना मिठी मारत असतील, तर त्याच्यासारखा अपमान बाळासाहेबांच्या विचाराचा असूच शकत नाही. महाराष्ट्रात येवून सावरकरांबद्दल चुकीचे शब्द काढतात, अशीही टीका शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काँग्रेसवर देखील केली
No comments:
Post a Comment