Saturday, January 14, 2023

अखिल भारतीय ग्राहक हक्क संरक्षण परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र न्युजचे पत्रकार कैलास थोरवडे यांची निवड ;

वेध माझा ऑनलाइन - ग्राहकांचे सर्वांगीण हित आणि सुरक्षेसाठी देशपातळीवर व्यापक काम करणाऱ्या “अखिल भारतीय ग्राहक हक्क संरक्षण परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र न्युज चे पत्रकार कैलास सोपान थोरवडे यांची निवड करण्यात आली आहे.

देशात ग्राहकांच्या हितासाठी विविध कायदे पारित करण्यात आले आहे तरीही ग्राहक म्हणून नागरिकांचे दैनंदिन समाज जीवनात अनेक क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार होत आहेत यासाठीच राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सागर प्रकाश घाडगे विविध स्तरावर ग्राहकांची हित, त्यांना असणारे कायदेशीर संरक्षण तसेच विविध शासकीय आस्थापनांसोबत समन्वय साधत नागरिकांचे प्रबोधन सातत्यपूर्ण करीत आहेत. आज समाज जीवनात खाजगी आस्थापना सोबत थोड्याफार फरकाने रेल्वे, बस, टेलिफोन, पोस्ट तसेच विमा, बँका, वीज मंडळे आधी सरकारी सेवां बाबतही दिरंगाई , अकार्यक्षमसेवा बाबत नागरिकांची नाराजी वाढत असून याबाबत ग्राहकांच्या हितासाठी शासन स्तरावर प्रयत्न होऊन ग्राहक हक्क संरक्षण कायद्यासमवेत माहितीचा अधिकार, जनलोकपाल, बँक लोकपाल कायदे सुद्धा पारित करण्यात आले आहेत याची माहिती ग्राहकांना व्हावी तसेच विभागवार आढावा घेण्यासाठी ग्राहक दिनाच्या औचीत्याने संपन्न बैठकीत पत्रकार कैलास सोपान थोरवडे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment