वेध माझा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव व मनसे नेते अमित ठाकरे यांचे नुकतेच कराडमध्ये आगमन झाले आहे जिल्हाध्यक्ष ऍड विकास पवार, धैर्यशील पाटील उपाध्यक्ष महेश जगताप तालुकाध्यक्ष दादा शिंगण शहर अध्यक्ष सागर बर्गे मनविसे शहर अध्यक्ष विनायक भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले उद्या कराडात विविध नियोजित कार्यक्रमांना ठाकरे उपस्थित राहणार आहेत
अमित ठाकरे आज रात्री कराड येथील विश्रामगृह येथे मुक्कामास असतील उद्या सकाळी मनसैनिकांबरोबर विश्राम गृहापासून स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह रॅलीने जाणार आहेत चव्हाण साहेबांच्या समाधीला त्याठिकाणी ते अभिवादन करणार आहेत त्यानंतर 11 वाजता विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे ते उदघाटन करतील त्यानंतर ते कराडच्या विश्रामगृह येथे 11.30 पासून येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत सुमारे दुपारी 3 च्या सुमारास कराडच्या पत्रकारांशी ते संवाद साधतील असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार शहराध्यक्ष सागर बर्गे व मनविसेचे शहराध्यक्ष विनायक भोसले यांनी सांगितले
No comments:
Post a Comment