Sunday, April 30, 2023

कराड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राजवीर ओहळच्या कुटुंबीयास १ लाख रुपयांची आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आर्थिक मदत ...

वेध माझा ऑनलाइन ;  शहरातील सूर्यवंशी मळा येथील कु. राजवीर राहुल ओहळ हा तीन वर्षाचा मुलगा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना २७ जून २०२२ रोजी घडली होती. या घटनेने कराड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली होती. या घटनेची नोंद घेऊन या मुलाच्या कुटुंबीयास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून मृताच्या कुटुंबीयास एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून ते मंजुरीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कुटुंबीयास वितरित करण्यात आले. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहुल चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, गजानन आवळकर आदी उपस्थित होते. 

सदर मंजूर अर्थसहाय्य रक्कम रु. एक लाख मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा इथून आपल्या नावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रतापगंज शाखेतील बँक खात्यावर परस्पर वर्ग करण्यात आले आहेत. या शाखेतून हि रक्कम मृतांच्या वारसास प्रमाणपत्र सहित दिली जाईल.

कराड बाजार समिती निवडणुकीसाठी 89 टक्के मतदान ; दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ; उद्या निकाल ;

वेध माझा ऑनलाइन - कराडच्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज रविवारी सकाळी सुरुवात झाली सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या एकूण 89 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे नेते अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान सोसायटी मतदार गटात १८६५ मते आहेत, ग्रामपंचायत गटात १९०० तर व्यापारी गटात ३७२ मते आहेत. कऱ्हाड तालुक्यातील मसुर, उंब्रज, कोळे, उंडाळे, काले, कऱ्हाड या मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. 
दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल ८९.३९ टक्के मतदान झाले आहे.

अजित पवार, मी राष्ट्रवादी वाढवायचा प्रयत्न करतोय : जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री कोण...या चर्चेवर सूचक विधान ...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल हे जवळपास सर्वानी मान्य केलंय असं त्यांनी म्हंटल.
कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, अजित पवार, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळे मला खात्री आहे कि, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल जयंत पाटील यांनी म्हंटल.

Saturday, April 29, 2023

वेध माझा ऑनलाइन -  कराडच्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला आहे त्यात शेतकरी विकास पॅनल हे आपल्या प्रचारातून मतदारांच्यात आपले म्हणणे लोकांपर्यंत पोचवण्यात यश मिळवत असल्याची चर्चा आहे त्यामुळेच सध्या याच पॅनेलचे पारडे जड असल्याची चर्चा आहे दरम्यान कराड तालुक्यातील बाजार समितीचे काही मतदार परगावी सहलीवर गेल्याची माहिती आहे.

सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या कराड बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे राजकीय वातारण तापलं आहे. या निवडणुकीमध्ये  कराड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऍड उदय पाटील माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील डॉ अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीतील चुरशीमुळे कराडात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येथील बाजार समितीच्या एका पॅनेलच्या काही मतदारांना हैदराबाद, गोवा सहलीवर पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आहे कराड बाजार समिती निवडणुकीत यंदा शेतकरी विकास पॅनेलचे पारडे जड असल्याचीही चर्चा आहे या पार्टीचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनुभवी उमेदवार तसेच नेतृत्व करणारे आ बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांचेही सहकार क्षेत्रात केलेले उत्तुंग केलेले काम या जमेच्या बाजू सध्या चर्चेत आहेत 
या दोन्ही नेत्यांनी आपापल्या सहकारी संस्था नुसत्या चालवल्या नाहीत तर मोठ्या केल्या राज्यात नावारूपाला आणल्या त्यामुळे मागील यांच्याच काळात बाजार समितीत सत्ता असताना या नेत्यांनी सुचवलेले कोणतेही प्रोजेक्ट व ठोस काम सध्याच्या सत्ताधार्यांनी उभे केले नसल्याचा प्रचार शेतकरी पॅनल च्या माध्यमातून सर्वत्र जोरदार होताना दिसतोय असे अनेक मुद्दे प्रचारातून लोकांना पटवण्याकडे या पॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आताच्या घडीला शेतकरी विकास पॅनेलचे पारडे जड होताना दिसत आहे

Thursday, April 27, 2023

भाजप नेते अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी ; ५२ गावांमध्ये रस्ता सुधारणेसह अन्य विकासकामे; ग्रामीण दळणवळणाला मिळणार चालना

 वेध माझा ऑनलाइन - कराड दक्षिणमधील जवळपास ५२ गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांसाठी निधी मिळावा अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील ५ कोटी रुपयांच्या ५२ नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. तसेच या कामांमुळे ग्रामीण दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे. 

यामध्ये कोयना वसाहत, येळगाव, कालवडे, गोंदी, आटके, जुळेवाडी, दुशेरे, खुबी, गोळेश्वर, सवादे, वाठार, कोडोली, मुंढे, गोटे, रेठरे खुर्द, विंग, आणे, खोडशी, मालखेड, शेणोली, बेलवडे बुद्रुक, नांदगाव, काले, संजयनगर शेरे, कासारशिरंबे, शिंदेवाडी (विंग), जिंती, कार्वे, कापील, नारायणवाडी, वडगाव हवेली, वहागाव, घोणशी, वारुंजी, वनवासमाची, विजयनगर, तुळसण, तारुख, शेरे, चचेगाव, येरवळे, किरपे, कुसूर या गावांमध्ये अंतर्गत रस्ते सुधारीकरण व काँक्रीटीकरणासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विठोबाचीवाडी, लोहारवाडी, ओंडोशी, कालेटेक, पवारवाडी (नांदगाव) व बांदेकरवाडी (सवादे) या गावांमध्ये अंतर्गत रस्ते सुधारीकरणासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय ओंड व रेठरे बुद्रुक येथील विठ्ठल मंदिर सभामंडप बांधकामासाठी अनुक्रमे १० लाख व २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर येवती येथे १० लाखांच्या निधीतून स्मशानभूमी शेडची उभारणी केली जाणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला असून, या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. याबद्दल जनतेकडून राज्य शासनाचे आभार मानले जात आहेत.

कराडच्या आस्था सामाजिक विकास संस्थेच्या वतीने 16 शेतकऱ्यांना आस्था कृषिभूषण पुरस्कार देऊन करणार सन्मानित ; अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील आस्था सामाजिक विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि 1 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला असून त्याच दिवशी एकूण 16 प्रगतशील शेतकऱ्यांना आस्था कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली  

या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यापूर्वी सन्मान देखील करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमास खासदार श्री छ उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ विद्या मोरे व सहसचिव सौ सुनीता पवार उपस्थित होत्या

सदर  कार्यक्रमास कृषितज्ञ ज्ञानेश्वर बोडके तसेच हमंतजी धुमाळ, विलासराव शिंदे तृप्ती घनवट डॉ राजेंद्र सारकाळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत 

दरम्यान हा शेतकरी सन्मान सोहळा 1 मे रोजी वेणूताई चव्हाण सभागृह येथे दुपारी 3 वाजता सम्पन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले 

Wednesday, April 26, 2023

ज्यांनी आमदारकी, खासदारकी, मुख्यमंत्रीपद भोगले त्यांनी एखादी पानपट्टी तरी काढली का? पैलवान आनंदराव मोहितेंची आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका ; सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला ; अतुल भोसलेची प्रखर टीका

वेध माझा ऑनलाइन - गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
दरम्यान उमेदवार पैलवान आनंदराव मोहिते यांनी यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले ...सत्ताधारी मंडळी स्वतःच्या कारभाराबाबत बोलण्यापेक्षा भोसले व पाटील कुटुंबावर नाहक टीका करत आहेत. खरंतर सहकारात उत्तुंग काम केलेल्या या कुटुंबांवर बोलण्याचा कोणताही नैतिक हक्क मंडळींना नाही. कारण ज्यांनी आमदारकी, खासदारकी आणि मुख्यमंत्रीपद भोगले अशांनी सहकारात एखादी संस्था काढायचे राहू दे, निदान एखादी पानपट्टी तरी काढली का? याचे उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.

यावेळी डॉ. भोसले पुढे म्हणाले, बाजार समितीचा गेल्या वर्षातील नफा हा केवळ साडेतीन लाख रुपये आहे, तर प्रशासक आल्यावर मात्र नफ्यात वाढ झाल्याचे दिसून येते. जे सत्ताधारी बाजार समितीला नफा मिळवून देऊ शकत नाहीत, ते शेतकऱ्यांचे भले काय करणार? सोसायटी निर्माण करुन मतदार तयार करण्याचा आणि आपले सत्तास्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या लोकांनी दीर्घकाळ केला. सोसायटी गटात वर्चस्व ठेऊन बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविण्याचे काम त्यांनी केले अशा प्रवृत्तींना आता धडा शिकविण्याची आता गरज आहे.  यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

आ. पाटील म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. ज्या काळात आमच्याकडे बाजार समिती होती, त्या ५ वर्षांच्या काळात आम्ही समितीचे उत्पन्न वाढविले. आपल्या येथे गूळ, हळद मोठ्या प्रमाणावर असताना इथल्या शेतकऱ्याला बाहेरच्या बाजारपेठेत का जावे लागते? उंब्रज, मसूर येथील उपबाजारांचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे.फळ प्रक्रिया करण्यासाठी ‘मॅग्नेट’ नावाचा प्रकल्प सुरु करण्यासाठी मी पणनमंत्री असताना राज्याच्या पणन विभागाकडून आपल्या कराडच्या बाजार समितीलाही पत्र पाठविले होते. पण निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रस्तावच दाखल न केल्याने, जवळपास 10 फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प आपल्या कराडमध्ये येऊ शकला नाही. हा प्रकल्प झाला असता तर इथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता असेही आ पाटील म्हणाले 



" कराड रोटरी अवॉर्ड 'चे उद्या वितरण ; ; आर.जी शेंडे डॉ.मोहन राजमाने (सर) दामोदर दीक्षित एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड आणि ग्रामपंचायत मान्याचीवाडी यांचा होणार सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन ; रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने " कराड रोटरी अवॉर्ड ' सन्मान सोहळा उद्या गुरुवार दि २७ रोजी कराड अर्बन शताब्दी हॉल येथे सायं. 5.30 वाजता पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा रोटरी अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे 

कराडमधील उद्योजक आर.जी शेंडे यांना उद्योग विभागातून, डॉ.मोहन राजमाने (सर) यांना शिक्षण विभागातून, दामोदर दीक्षित यांना कला विभागातून, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड या संस्थेला पर्यावरण विभागातून तर ग्रामपंचायत मान्याचीवाडी यांना सामाजिक विभागातून कराड रोटरी अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. 

अमेरिका येथून अल्ट्रामॅन हा किताब पटकावून आलेल्या वेदांत अभय नांगरे यांचा कराड वासीयांतर्फे कराड खेल रत्न पुरस्काराने यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 
या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी डॉ सुरेश भोसले, (कुलपती, कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी आपल्या मित्र परिवारासह या कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन क्लबचे कराडचे अध्यक्ष प्रबोध पुरोहित, तसेच रो चंद्रशेखर पाटील,रो डॉ राहुल फासे यांनी केले आहे

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला ; 11 जवान शहीद ;

वेध माझा ऑनलाइन - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे.  या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भू-सुरंगस्फोटामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. अरणपुरच्या जंगलामध्ये हा स्फोट माओवाद्यांनी केला असून अजूनही माओवादी आणि जवान यांच्यामध्ये त्या ठिकाणी चकमक सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचणे कठीण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडी जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान अरनपूर मार्गावर IED स्फोट घडवण्यात आला. या भीषण स्फोटात 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला.




Tuesday, April 25, 2023

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का ; बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या शिंदे सरकारला करता येणार नाहीत

काय आहे प्रकरण?
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, कोश्यारी यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. पुढे राज्यात सत्तेत बदल झाल्यावर मविआ सरकारने पाठविलेला प्रस्ताव कोश्यारी यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता 5 सप्टेंबर 2022ला सरकारकडे परत पाठवला. यानंतर शिंदे सरकारने आपल्या मर्जीतील सदस्यांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 26 सप्टेंबर रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीत या विषयात काऊंटर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रकरणात काऊंटर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात शिंदे सरकारकडून टाळाटाळ सुरू आहे. या प्रकरणात 14 ऑक्टोबर 2022ला चार आठवड्यांची मुदत मागितली होती. नंतर 16 नोव्हेंबर 2022च्या सुनावणीदरम्यान आणखी चार आठवड्यांची मुदत मागितली. त्यानंतर 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. 21 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुन्हा 2 आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, अद्यापही काऊंटर प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. आज परत एकदा महाराष्ट्र शासनाने दोन आठवडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. केवळ महाराष्ट्र शासनाकडून या केसमध्ये  वेळ काढू पणा सुरू आहे तसेच यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. आता पुढील तारीख 2 आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे.






राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ; वाळू/रेतीचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक ;

वेध माझा ऑनलाइन -  महाराष्ट्र शासनाने आपले बहुप्रतीक्षित वाळू धोरण जाहीर केले असून, यात आता ग्राहकांना वाळूखरेदीसाठी महाखनिज ॲप अथवा सेतू केंद्रात नोंदणी करून संबंधित डेपोधारकास आधार क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय वाळू मिळणार नाही, असे नव्या वाळूधोरणात स्पष्ट केले आहे. याशिवाय एका वेळेस एका कुटुंबास ५० मेट्रिक टनच वाळू मिळणार असून तीसुद्धा १५ दिवसांच्या आत उचलून नेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास मुदतवाढीसाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. वाळूची तस्करी रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

डेपोधारकाने वजन करून मेट्रिक टनांतच वाळूची विक्री करायची असून वजनकाटा हा महाखनिजप्रणालीला ऑनलाईन जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.
नदी/खाडीपात्रातून डेपोपर्यत वाळू/रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (ट्रॉली) अथवा कमाल सहा टायरच्या (टिपर) या वाहनांना पिवळा रंग देणे बंधनकारक केले आहे.
वाळूचे / रेतीचे उत्खनन करताना किंवा ती काढताना खासगी मालमत्तेस कोणतीही हानी / नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे दायित्व निविदाधारकावर राहील. अशा हानीची / नुकसानीची परिगणना सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल व त्याबाबतचा त्यांचा निर्णय अंतिम असून, तशी रक्कम जमीन महसुलाच्या थकबाकीच्या वसुलीप्रमाणे संबंधित निविदाधारकाकडून वसूल करण्यात येईल.
सार्वजनिक पाणवठे,पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणांपासून १०० मीटर दूर अंतरानंतर वाळूचे उत्खनन करणे आवश्यक आहे. तसेच पायवाट, रस्ते असलेल्या जागेत वाळूचे उत्खनन करता येणार नाही. कोणत्याही रेल्वेपूल व रस्तेपुलाच्या कोणत्याही बाजूने ६०० मीटर्स (२००० फूट) अंतराच्या आत वाळूचे उत्खनन करता येणार नाही.
वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल
नदीपात्रातील वाळूथराची जाडी सातत्याने राहण्यासाठी बेंच मार्क निश्चित करून त्याच्या खाली कोणत्याही परिस्थितीत वाळूचे उत्खनन करता येणार नाही, तसेच नदीपात्रातील वाळूच्या थराच्या आधारे आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होणार नाही. याबाबत निविदाधारकाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील. निविदेत मंजूर केलेल्या वाळूसाठ्याइतकेच उत्खनन करावे.
नदीपात्रातून तीन मीटर खोलीपर्यंत वाळूचे उत्खनन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
वाळूची वाहतूक सहा टायरच्या वाहनातूनच आणि त्यांना जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे.
वाळूडेपोच्या ठिकाणी तसेच गावातील ज्या मार्गावरून वाळूची वाहने ये-जा करतील, त्या मार्गांवर २४ तास सीसीटीव्ही चालू असणे आवश्यक आहे. याचा खर्च निविदाधारकाने स्वत: करायचा आहे.
नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे.


शरद पवारांच्या भेटीत ठाकरेंचा नवा प्रस्ताव, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

वेध माझा ऑनलाइन - 
शरद पवारांच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी नवा प्रस्ताव ठेवला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना मोठी ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 11 एप्रिलला सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच ही भेट झाली, त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत शिवसेनेकडून गौप्यस्फोट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे, शरद पवारांना भेटून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना दिला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावाही म्हस्के यांनी केला आहे.उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना भेटून आपला मुख्यमंत्री पदाचा दावा मागे घेतलाय. ज्या मुख्यमंत्रीपदाकरता उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पद घेतले, ते मुख्यमंत्री पदही गेले. तेल ही गेले तुप ही गेले, हाती आले धोपाटणे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
दरम्यान अजित पवार नाराज असून ते लवकरच राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चा सुरू असतानाच ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनीही शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी फोडण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, असे संकेत दिले.दुसरीकडे अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं सांगत संजय राऊतांना टोला लगावला. राष्ट्रवादीबद्दल बोलण्यासाठी आमचे नेते आणि प्रवक्ते खंबीर आहेत, दुसऱ्या कोणी आमची वकिली करू नये, असा निशाणा अजितदादांनी राऊतांवर साधला होता.





महादेवराव महाडिक विजयी; सतेज पाटलांना धक्का: राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक निकाल ;

वेध माझा ऑनलाइन ; पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. अखेर संस्था गटातून महादेवराव महाडिक यांनी दणदणीत विजय मिळवून सतेज पाटील याना धक्का दिला आहे. आत्तापर्यंत एकूण 9 पैकी 6 गटांवर महाडिक गटाने विजय मिळवला आहे.

राजाराम साखर कारखान्यासाठी 91.12% मतदान झाले होते. सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यामध्ये जोरदार प्रचार आणि आरोप प्रत्यारोप सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. आज मतमोजणी दरम्यान, संस्था गटातून महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली तर विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक यांचा 39 मतांनी विजय झाला आहे.महादेवराव महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक समर्थकांनी राजाराम साखर कारखाना परिसरात एकच जल्लोष केला आहे.

Saturday, April 22, 2023

बेपत्ता गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस'; बुलडाण्यात कोणी लावले पोस्टर?

वेध माझा ऑनलाइन ; शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले आहेत. गुलाबराव पाटील पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. पाटील यांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस असा मजकूर या पोस्टरवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत. गुलाबराव पाटील पालकमंत्री झाल्यापासून ते केवळ दोनदा जिल्ह्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

51 रुपयांचं बक्षीस
गुलाबराव पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र ते पालकमंत्री झाल्यपासून जिल्ह्यात केवळ दोनदाच आले असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात आले नाहीत असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. पालकमंत्री बेपत्ता आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास 51 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असा मजकूर या बॅनरवर आहे.  विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदारसंघात हे पोष्टर लागले आहेत.
शेतकरी अवकाळीच्या तडाख्यात सापडला आहे. मोठ्याप्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. मात्र पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्यानं स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या वतीनं हे अनोख अंदोलन करण्यात आलं आहे.





Friday, April 21, 2023

कराडात समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने सर्वंरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन - येथील समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शनिवार दि.22 व सोमवार दि.24 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.24 रोजी येथील लाहोटी कन्या प्रशाला येथे कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या सहयोगाने सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये हृदयविकार, डोळ्यांचे आजार, त्वचारोग, दातांचे विकार, अस्थिरोग, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार अशा सर्व आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून संपूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या शिबीरात आलेल्या रुग्णांना पुढील एक महिन्यांमध्ये कृष्णा हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी व उपचारांमध्ये भरघोस सूट दिली जाणार आहे. तरी कराड व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन ब्राह्मण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त महिला व तरुणांनी रक्तदान शिबीरातही सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Thursday, April 20, 2023

देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका ; पृथ्वीराज चव्हाण यांनी केली लाईक ; राज्याच्या राजकारणात तर्क वितर्काने पुन्हा खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

‘उद्धव ठाकरे , कोण होतास तू , काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू ’अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती.
महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केलेल्या फडणवीसांच्या व्हीडिओला लाईक केले. या बातमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टीकरण दिले आहे. चव्हाण यावर बोलताना म्हणाले कि, ‘नक्की काय झालंय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात मी कधीही असं काही केले नाही, मला जर असे करायचे असते तर मी खुल्या मंचावरुन केले असते, माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्विटला लाईक का करेन’, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.

भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांचा विशेष सत्कार ;

वेध माझा ऑनलाइन - भाजप कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह भाजप शहर कार्यकारिणीने सरल अँप च्या माध्यमातून चारशेपन्नास इतकी नोंदणी केली आहे तसेच पंतप्रधान मोदींचा देशातील 99 वा मन की बात हा कार्यक्रम कराडमध्ये चांगला पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीआण्णा मोहोळ यांनी भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडीसह कार्यकारिणीचे देखील विशेष कौतुक करून अभिनंदन केले. 

यावेळी सातारा लोकसभा संयोजक मा. अतुल बाबा भोसले, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विक्रमजी पावस्कर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भरतनाना पाटील तसेच कराड दक्षिण मंडल, पाटण व कराड शहरातील सर्व शक्तिकेंद्र  प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते

कराड बाजार समिती निवडणूक ; आ बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत (काका) पाटील यांची निवडणुकीतून माघार ; पत्रकार परिषदेत आ बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती ; शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन । कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ बाळासाहेब पाटील आणि डॉ अतुल भोसले गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जाहीर केले.यावेळी आमदार पाटील यांचे बंधू जयंत (काका)पाटील यांचा या निवडणूकीतुन अर्ज मागे घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी आ पाटील यांनी दिली जयंत पाटील यांच्या उमेदवारीची मागणी असताना त्यांचा अर्ज मागे का घेण्यात आला, असे पत्रकारांनी विचारले असता सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आ बाळासाहेब पाटील म्हणाले या पत्रकार परिषदेला डॉ अतुल भोसले उपस्थित नव्हते

आ बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद  घेण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, जयंत काका पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, प्रशांत यादव आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले 
शेतकरी विकास पॅनल चे आज सर्व उमेदवार जाहीर केले आहेत या निवडणुकीत मागच्या आमच्या काळात केलेली कामे आम्ही लोकांसमोर आणणार आहोत तसेच गेल्या पंचवार्षिक मध्ये झालेल्या चुकाही आम्ही लोकांना दाखवून देणार आहोत आम्ही अनेक भागात आमचे मेळावे घेत आहोत लोकांचा प्रतिसाद व सहकार्य आम्हाला मिळत आहे आमचे उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका मांडत आहेत

यावेळी कृषी विकास सेवा सोसायटी मतदार संघातून जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे

उमेदवार सर्वसाधारण गटातून :- जगदीश दिनकरराव जगताप, मानसिंगराव वसंत जगदाळे, दयानंद भीमराव पाटील, उद्धवराव बाबुराव फाळके, विनोद रमेश जाधव, दत्तात्रय वसंतराव साळुंखे, जयवंत बबन मानकर. 

महिला प्रतिनिधी गटातून :- मालन देवाप्पा पिसाळ, रेखाताई दिलीप पवार. 
इतर मागास प्रवर्गातून :- फिरोज अल्ली इनामदार. 
विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून :- मारुती आनंदा बुधे.
पंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून :-  मानसिंग आनंदराव पाटील, प्रदीप रघुनाथ शिंदे. 
अनुसूचित जाती- जमाती गटातून :- अंकुश रामचंद्र हजारे. 
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून :- आनंदराव भीमराव मोहिते. तर
व्यापारी अडते मतदारसंघातून :-  संतोष कृष्णत पाटील, राजेश रणजीत शहा 
अशी नावे आज जाहीर करण्यात आली

Wednesday, April 19, 2023

साताऱ्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू ; मास्क वापरा ; जिल्हाधिकारी जयवंशी यांचे आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्हयात 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज बुधवारी दिली. . गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात 64 बाधित रुग्ण आहेत.सातारा जिल्ह्यात 24 तासांत 122 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 07 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानूसार सातारा जिल्ह्यात एकूण 64 जणांना काेराेनाची बाधा झाली आहे
एका काेराेनाबाधिताचा मृत्यू झाला आहे तर तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मास्क वापरा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.


यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर ; गायिका उषा मंगेशकर यांनी केली घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन -  नुकतंच यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन, गायक पंकज उदास, मराठी अभिनेता प्रशांत दामले, प्रसाद ओक यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे. दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

फडणवीसांच्या ट्विट ने खळबळ ; सरकार टिकणार की पडणार ? ; राज्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असा वावड्या उठल्या होत्या. अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या बातम्या फेटाळून लावल्या असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


फडणवीसांचे ट्विट नेमकं काय?
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून २ फोटो शेअर केले आहेत. या फोटो मध्ये ते कार्यालयीन कामकाज करताना दिसत आहेत. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी यावेळी दिला आहे. Office work. Clearing pendencies.. कार्यालयीन कामकाज.. असं त्यांनी म्हंटल आहे. फडणवीसांच्या टेबलावर ढीगभर फायली सुद्धा दिसत आहेत. या फायलींवर फडणवीस सह्या करत आहेत. फडणवीस सर्व पेंडिंग काम पूर्ण करत असल्याने ट्विट शेअर केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षवरील निकाल कधीही समोर येऊ शकतो. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाईल की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार भाजपसोबत जाणार अशा वावड्याही गेल्या काही दिवसांपासून उठत आहेत. मात्र आपण भाजपसोबत जाणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. अजितदादांच्या या स्पष्टीकरणानंतर काही तासांतच फडणवीसांनी पेंडिंग कामे पूर्ण करत असल्याचे ट्विट केलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सरकार टिकणार कि जाणार अशा चर्चाना उधाण आलं आहे.

Tuesday, April 18, 2023

कराडात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन व तिकीट विक्री शुभारंभ

वेध माझा ऑनलाइन - कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित श्री. महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दशित व डॉ. अमोल कोल्हे याच्यासह २५० हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजाचा पराक्रम आणि ख्याती सांगणारे " शिवपुत्र संभाजी" हे महानाट्य आपल्या यशवंतनगरी - कराड मध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे दि. २८ एप्रिल ते ३ मे २०२३ रोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे.सदर महानाट्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन खासदार व प्रसिद्ध कलाकार डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.  तिकीट विक्रीचा शुभारंभ सुनील बामणे व श्री आण्णा सावंत यांना पहिले मानाचे तिकीट देवून करण्यात आले आहे.
 
मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ पासून कराड मध्ये १) सेंटर ऑफिस, साईनाथ वडापाव शेजारी, २) सई फोटो स्टुडिओ, मंगळवार पेठ, ३) कृष्णाई प्ले पार्क, प्रितीसंगम कृष्णामाई संगम, ४) साई पूजा कम्प्युटर महा ई सेवा केद्रा नाडे - नवा रस्ता, ५) गीतांजली मोबाइल शॉपी, कार्वे नाका कराड. या ठिकाणी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत तिकीट उपलब्ध आहेत. ऑनलाइन तिकीट विक्री बुक माय शो या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थीसाठी पहिले २ दिवस दिनाक २८ व २९ एप्रिल २०२३ रोजी विशेष २० % सवलत देण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमास डॉ. अमोल कोल्हे, श्री महेंद्र महाडीक, श्री घनश्याम राव, श्री ओंकार केंडे, श्री वासू पाटील, श्री दिपक शिंदे, श्री प्रसाद देशपांडे, श्री विनायक कवडे आणि तमाम शिवप्रेमी उपस्थित होते. तरी सर्वांनी संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी एक वेळ अवश्य शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पहावे. असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे आणि संयोजक कृष्णाई क्रिएटीव्हज ग्रुप कराड यांनी केलेले आहे.

कराडात गेल्या 4 दिवसापासून 150 कुत्र्यांचे तर गेल्या तीन वर्षांपासून 2800 कुत्र्यांचे निरबीजीकरण झाल्याची पालिका अभियंता आर डी भालदार यांची माहिती ;


वेध माझा ऑनलाइन - 
कराड नगरपरिषद व एनिमल प्रोटेक्शन क्लब यांच्या वतीने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निरबीजीकरणं करण्याच्या प्रक्रियेला गेल्या 4 दिवसापासून सुरुवात झाली असल्याचे अभियंता आर डी भालदार यांनी सांगितले गेल्या 4 दिवसापासून 150 कुत्र्यांचे निरबीजीकरण झाल्याचे भालदार म्हणाले आणि गेल्या तीन वर्षांपासून 2800 कुत्र्यांचे निरबीजीकरण झाल्याचेही त्यांनी सांगितले

शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे मागील काही दिवसांपासून लहान मुले महिला तसेच काही नागरिक या कुत्र्यांच्या हिंस्र वृत्तीचे बळी पडले आहेत एका चिमुक्याचा या कुत्र्यांच्या हल्यात जीव गेला आहे त्यामुळे शहरात व परिसरात या मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे अनेक लोकांच्या या कुत्र्यांसंदर्भात तक्रारी येऊ लागल्याने कराड पालिकेने खम्बीर पाऊल उचलत एनिमल प्रोटेक्शन क्लब च्या सहकार्याने या मोकाट कुत्र्यांचे निरबीजीकरण करण्याची प्रक्रिया गेल्या 4 दिवसापासून पुन्हा सुरू केली आहे मागील 3 वर्षांपासून शहर व परिसरातील एकूण 2800 कुत्र्यांचे निरबीजीकरण झाल्याचे पालिका अभियंता भालदार यांनी वेध-माझाशी बोलताना सांगितले दरम्यान गेल्या 4 दिवसापासून 150 कुत्र्यांचे निरबीजीकरण झाले आहे असेही भालदार म्हणाले

40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमच्या सहनशिलता अंत होऊ देऊ नका ; जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे काम करत राहणार - अजित पवार

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत  जाण्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्क गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. आता या गोष्टीचा तुकडा पाडा, कारण नसताना गैरसमज करु देऊ नका. 40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमची सहनशिलता संपते, त्याचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांनी केली. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सर्वजण राष्ट्रवादीतच राहणार आहे. तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मला कामासाठी आमदार भेटले. यामधून वेगळा अर्थ काढू नका. मी राष्ट्रवादीमध्ये आहे. हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. काळजी करु नका पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादीत अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यथाकिंचीतही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितल

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार अल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल त्यांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा असेही अजित पवार यांनी म्हटले.

संजय राऊतांना टोला
इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, इतर पक्षाचे प्रवक्तेसुद्धा राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.यावेळी अजित पवारांनी संताप व्यक्त केला. 

Monday, April 17, 2023

कराडमध्ये येऊन आमदार सत्यजित तांबेनी गायले फडणवीसांचे गोडवे ; काँग्रेसवर अद्याप नाराज असल्याचे आले दिसून - बाळासाहेब थोरात यांचा विजयात मोठा वाटा असल्याचे केले विधान ;

वेध माझा ऑनलाइन ; नाशिकचे आमदार सत्यजित तांबे आज कराडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गात सर्वानाच आसचर्य चकित केले ते म्हणाले फडणवीस यांनी माझ्या उमेदवारी साठी मोठा आग्रह धरला होता माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही मी त्यांचे राजकारण खूप जवळून अनुभवत आलो आहे निवडणुकीच्या काळात मी त्यांचे भाषणातुन वारंवार कौतुक केले आहे अशा शब्दात तांबे यांनी आज कराडमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गायले इतर राजकीय पक्षांनी देखील आपल्याला विरोध केला नाही हेही ते म्हणाले दरम्यान काँग्रेस नेते व आ. तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात मोठा वाटा आहे असेही ते म्हणाले मात्र शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसने निलंबित केलं आहे यामुळे तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून आले माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी नाराजी तेव्हाच दूर होईल जेव्हा मला कोण चर्चेला बोलवेल अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद बाहेर काढली 

आ. सत्यजित तांबे यांनी  आज कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले  ठराविक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले. त्याच्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. आणि पक्षाने मला बाहेर काढलं. परंतु शेवटी आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्षात काम करणारी लोक आहोत. शंभर वर्षे आमच्या कुटूंबाला काँग्रेसमध्ये होत आहेत. माझी देखील 10 ते 20 वर्षे हे विद्यार्थी ते युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला. त्याच्या विरुद्ध आमची लढाई होती

सध्याच्या राज्यसरकार बाबत भाष्य करताना त्यांनी सावध प्रतिक्रिया देत दोन प्रकारची सरकारे असतात असे सांगितले... त्यापैकी एक डोकी मोजणारे म्हणजे संख्याबळाचे असते... तर दुसरे नीतिमत्तेचे राजकारण करणारे असते...  तुम्हाला यापैकी हे सरकार कोणते वाटते असे विचारले असता,... ते म्हणाले... ते नंतर सांगेन... पत्रकारांना शब्दात सापडायचे नसते असे म्हणत त्यांनी हा संवाद थांबवला 

Sunday, April 16, 2023

उद्या 18 एप्रिलला साजरा होणार स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा ; विजय यादव यांनी दिली माहिती ; स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ; यादव बंधूंचे भक्तांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन -  यशवन्त आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच त्यांचे बंधू विजय यादव संजय यादव प्रशांत यादव व भाचे संग्राम सणस यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्या 18 एप्रिल रोजी साजरा होणार आहे अशी माहिती विजय यादव यांनी दिली तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन यादव बंधूनी समस्त भक्त भाविकांना केले आहे

दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन याठिकाणी यादव बंधूंकडून होत असते यावेळी शहर व परिसरातील भाविक याठिकाणी प्रसादाचा लाभ घेत असतात विविध क्षेत्रातील अनेकांची या सोहळ्यास मोठी उपस्थिती असते याहीवर्षी हा सोहळा उद्या 18 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत येथील अर्बन बँक तळभाग शाखेसमोर सम्पन्न होणार आहे भाविकांनी यावेळी उपस्थित राहून स्वामींची पूजा, आरती व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यादव बंधूंच्या वतीने करण्यात आले आहे

प्रकाश जाधव (मेहरबान) यांना राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ... कराडात परिट समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान ; प्रकाश जाधव झाले भावुक, म्हणाले... हा सन्मान संपूर्ण समाजाचा ; यापुढेही समाजकार्य करत राहीन ;

वेध माझा ऑनलाइन - अखिल भारतीय परीट सेवा समाज मंडळाच्या वतीने कराड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव (मेहरबान) यांना नुकताच परिट समाजाचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार देण्यात आला त्यानिमित्ताने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे यांच्या हस्ते आज त्यांचा परिट समाजाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रकाश जाधव भावुक झालेले पहायला मिळाले  

यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले परीट समाज बांधव आणि मित्रपरिवाराने केलेला हा माझा सन्मान पाहून मी भारावून गेलो आहे हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून आपणा सर्व समाज बांधवांचा आहे असे मी मानतो माझ्या हातून यापुढेही जास्तीत जास्त सामाजिक कार्य करण्याचा मी प्रयत्न करेन

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे म्हणाले परीट समाजातील प्रकाश जाधव यांच्यासारख्या व्यक्तीने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही परीट समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे संत गाडगेबाबा यांच्या तत्त्वाने त्यांचे कार्य चालू आहे ही बाब देखील आदर्शवत आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाश जाधव यांना सन्मानपत्र संत गाडगेबाबांची मूर्ती शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील परीट यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत महेश सुळे अजित गायकवाड गणेश जाधव यांनी केले केदार रसाळ यांनी आभार मानले.
यावेळी पेरले पोलीस पाटील प्रवीण राक्षे उत्तम राऊत तांबवे, खंडू इंगळे दिगंबर यादव अजित गायकवाड अण्णा वाघ अजिंक्य राऊत दिलीप नलवडे  यांच्यासह प्रकाश जाधव यांचा मित्रपरिवार मान्यवर व परीट समाज बांधव उपस्थित होते

Saturday, April 15, 2023

योगींच्या राज्यात जो नडला, तो संपला; पोरापाठोपाठ अतिकचा खेळ खल्लास


वेध माझा ऑनलाइन - गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याआधी अतिकचा मुलगा असदचाही गेम करण्यात आला होता.उत्तरप्रदेशमध्ये ज्याच्या नावाने न्यायाधीश सुद्धा सुनावणी घ्यायचे नाही त्या कुख्यात गुंड अतिक अहमदच्या मुलाचा याआधीच उत्तर प्रदेश पोलिसांनी खात्मा केला.

माफिया अतीक अहमदचा मुलगा असद याचा उत्तर प्रदेशातील पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. उमेश पाल हत्याकांडांत असद गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. असद अहमद हा 23 वर्षाचा होता.

दोघांवर पाच लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. पोलिसांकडून देखील गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर झाशीमध्ये पोलीस अधिकारी विमल आणि नवेंदु याच्या नेत्वृत्वातील पथकासोबत झालेल्या चकमकीमध्ये असद आणि गुलाम यांचा खात्मा केला गेला.

माफिया अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.
25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांचा भरदिवसा खून केल्याचा आरोप झाला. 28 फेब्रुवारी 2006 रोजी, राजू पाल खून खटल्यातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला त्याच्या साक्षीशी संबंधित प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली. 2007 मध्ये अतिकने सोनिया गांधी यांच्या नातेवाईकाची मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, पीएमओच्या नाराजीनंतर ताबा सोडला.

2012 मध्ये अतिकच्या भीतीमुळे, 10 न्यायाधीशांनी त्याच्या खटल्याच्या सुनावणीपासून स्वतःला दूर केले. 2018 मध्ये अतिक अहमदवर लखनऊमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला देवरिया तुरुंगात नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यूपीच्या तुरुंगात असतानाही अतिक तुरुंगातूनच आपला गुन्हेगारी व्यवसाय चालवत होता. अतिक अहमदवर कारवाई करण्यासाठी त्याला गुजरातमधील साबरमती कारागृहात हलवण्यात आले.

2019 मध्ये अतिक अहमद याने वाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. गुजरातच्या साबरमती कारागृहातूनही अतिकच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. 24 फेब्रुवारी 2023 रोजी राजू पाल खून प्रकरणाचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्यासह त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन हवालदारांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर झाला.





कराडच्या स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण : पालिकेतर्फे 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन - कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कराड नगरपालिकेच्यावतीने 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके दिली.

कराड पालिकेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डाके म्हणाले की, कराडला पालिकेच्यावतीने आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धां घेण्यात येत आहेत. यामध्ये नगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि कोविड योध्दे यांच्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंट, टेबल टेनिस, मार्शल आर्ट्स, कराटे, फुटबॉल, लेदर बॉल क्रिकेट, बॉडी बिल्डिंग, स्विमिंग, कबड्डी, टेनिस क्रिकेट, कुस्ती, स्केटिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच स्पर्धांदरम्यान राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंच्या सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 23 एप्रिल ते दि. 29 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता सर्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कराड येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांवेळी कराड नगरपालिकेच्या मागणीतून कराड येथील स्टेडियमसाठी जमिनी देणाऱ्या दानशूरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ऑलम्पिक खेळाडू ललिता बाबर- भोसले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध मान्यवरांना देखील या बक्षीस समारंभ कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

Friday, April 14, 2023

राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे आता राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार नाहीत ? अमोल कोल्हेचे कराडात संकेत ? ;

वेध माझा ऑनलाइन - तुम्ही राष्ट्रवादी मधूनच निवडणूक लढवणार का ? मोदींनी तुमचं सभागृहात कौतुक केलं याकडे पत्रकारांनी अमोल कोल्हे यांचे लक्ष वेधले असता पंतप्रधान मोदींनी माझं सभागृहात कौतुक केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अशा शब्दात पंतप्रधान मोदींचे अमोल कोल्हेनी आभार मानले. पण खोदून खोदून विचारले तरी मी राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढणार... असे मात्र त्यांनी स्पष्ट आणि ठामपणे सांगितलेच नाही. सध्या ते राष्ट्रवादी चे खासदार असले तरी भाजपशी त्यांचे सूत जुलळ्याची राज्यभर चर्चा आहे त्याच धर्तीवर त्यांना छेडले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले

कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी दिपक शिंदे, वासू पाटील, प्रसाद देशपांडे, विनायक कवडे आदींची उपस्थिती होती.

कोल्हे म्हणाले मी शेतकऱ्याचा पोरगा आहे अगोदर आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नंतर नांगरायचं... असं म्हणत लोकसभा निवडणूक लढवायची मात्र ते वारं बघून ठरवायचं... असं सूचक विधान करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी करत राष्ट्रवादी कडूनच आपण निवडणूक लढणार आहोत असे ठामपणे सांगितलेच नाही त्यामुळे सध्या ते राष्ट्रवादी चे खासदार असले तरी काही दिवसांपासून त्यांच्या भाजपशी  जवळीक वाढल्याच्या चर्चेला यामुळे एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे अशी चर्चा आहे 

राष्ट्रवादी मध्ये तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नवर त्यांनी फक्त हसणे च पसंत केले... तर औरंगजेबच्या कबरीवर  कोण माथा टेकत असेल तर ते चूकच आहे असे सांगून कोल्हेनी औरंगजेब कधीही आमचा नव्हता त्यामुळे त्याच्या कबरीवर डोकं टेकण्याचे समर्थन होऊ शकत नाही अस स्पष्टपणे सांगितले

काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मधल्या काळात महापुरुषांच्या बदनामी करण्याच्या कृत्यावर बोलताना कोल्हे यांनी सावध पवित्रा घेत यावर कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही तर संभाजी महाराजांबद्दल याच राजकीय नेत्यांनी  धर्मवीर की स्वराज्य रक्षक असा सवाल खडा केला होता त्यावर मत विचारले असता याविषयी
आपल्या मताने काय फरक पडतो... असे गुळगुळीत उत्तर देऊन वेळ मारून नेली एकूणच या पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांच्यामध्ये अभिनेत्यापेक्षा एक कसलेला राजकीय नेताच अधिक झळकत होता असे दिसून आले
दरम्यान त्यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे शेकडो हुन अधिक शो करून संपूर्ण देशात वाहवा मिळवली आहे 28 एप्रिल ते 3 मे या कालावधीत याच नाटकाचे कराडमध्ये शो होणार आहेत त्याचीच माहिती देण्यासाठी कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करत आपली राजकीय भूमिका देखील मांडली 


कराडात येत्या २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत सादर होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य ; अभिनेते अमोल कोल्हे यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह २५० हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजाच्या पराक्रम आणि ख्याती सांगणारे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कराड येथील कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे दि. २८ एप्रिल ते ३ मे २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे. अशी माहिती दिग्दर्शित महेंद्र महाडिक व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (शुक्रवारी) बोलत होते. यावेळी वासू पाटील उपस्थित होते.ते म्हणाले,या दिमाखदार महानाट्यसाठी सातारा जिल्हा व कराड परिसरातील नाट्य रसिक व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. कराडमध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे या महानाट्याचे भव्य नियोजन केले आहे. महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा गौरवशाली इतिहास २५० हून अधिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण २ तास ३० मिनिटे करणार आहेत. महानाट्यमध्ये चित्त थरारक घोडे स्वारी, शानदार फटाक्याची आतिषबाजी, नवीन तीन मजली भव्य रंगमंच, चित्त थरारक युदध प्रात्याक्षिके याचे थेट सादरीकरण केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी पहिले २ दिवस २० टक्के विशेष सवलत देण्यात आलेली आहे.

तरी सर्वांनी संभाजी महाराजाचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य पहावे. असे आवाहन यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व महेंद्र महाडिक यांनी केले आहे.

प्रकाश जाधव राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित...

वेध माझा ऑनलाइन - अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांना सन्मानित करण्यात आले.शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे 

अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना आज (शुक्रवारी) मुंबई- भाईंदर येथे राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनौजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे शानदार वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना कृष्णकुमार कनौजिया म्हणाले, आज ज्या समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ती सर्व जण परीट समाजाचे राज्याचे भविष्य आहेत.त्याच्या खांद्यावर हा समाज पुढे यशस्वी वाटचाल करेल.या पुरस्कारामुळे  राज्यातील धोबी समाजात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.याचा मला विशेष आनंद आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे म्हणाले की,  राज्यातील काना-कोपऱ्यातून आज या ठिकाणी समाज बांधव जमले व हा पुरस्कार सन्मानपुर्वक स्विकारला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
पुरस्काराला उत्तर देताना प्रकाश जाधव (मेहरबान) म्हणाले की, आज जो पुरस्कार मिळाला आहे,तो संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे. हा पुरस्कार आपण परीट समाजासाठी माझ्याबरोबर अहोरात्र झटणाऱ्या माझ्या समाज बांधवांना समर्पित करतो. असे त्यांनी नमूद केले.
 
यावेळी उद्योजक व आरक्षण समिती प्रमुख आशिषभाऊ कदम ,राजेंद्रशेठ आहेर, उद्योजक मार्गदर्शक राजाराम महाडिक, ज्येष्ठ नेते शांतीलाल कारंडे, अखिल भारतीय धोबी महासंघ कोकण विभाग प्रमुख संतोष शिंदे, अरुण धोबी,उपाध्यक्ष  हसमुख पांगारकर, ज्येष्ठ नेते मुरलीधर शिंदे, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष सदाशिवराव ठाकरे, प्राध्यापक मार्गदर्शक किसनराव नार्वेकर, ज्येष्ठ नेते संतोष भालेराव,  सुषमाताई अमनकर,  डॉ.प्रा.रजनीताई लुमसे, वरिष्ठ मार्गदर्शिका सनद वाडिया, कार्याध्यक्ष रमेश लांबस्कर, रवींद्र आंबेलकर, लॉन्ड्री संघटना अध्यक्ष बळवंतराव साळुंखे यांच्यासह राज्यभरातील परीट समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता‌.

Thursday, April 13, 2023

आमदार सतेज पाटील यांच्यावर काँग्रेसकडून आणखी एक जबाबदारी

वेध माझा ऑनलाइन - राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदेमधील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पक्षाकडून आणखी एक जबाबदारी मिळाली आहे. राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पाटील यांचा 51 वा वाढदिवस काल 12 एप्रिल रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. याचदिवशी त्यांना पक्षाकडून आणखी एक संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.  
निवडणूक समितीमध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण 17 सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. अन्य सदस्यांमध्ये बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. तसेच नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.
यापूर्वी, आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे सतेज पाटील काँग्रेसचा चेहरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे.  भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी पहिली जाहीर सभा कोल्हापुरात त्यांच्याच नेतृत्वात पार पडली होती. सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. आघाडी सरकारमध्ये 2010 ते 14 या कालावधीत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न आणि औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.






जिल्हाधिकाऱ्यांनी केला 14 एप्रिल हा दिवस मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषित ; राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश ; संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन - 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे या दिवशी मद्यपान बंदी दिवस घोषित करावा .या मागणीचे निवेदन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटने कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख ,यांना पाठवण्यात आले होते. तसेच प्रांताधिकारी, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 13 रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रूचेश जयवंशी यांनी मद्यपान बंदी दिवस घोषित केला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिली जिल्हाधिकारी जयवंशी यांनी याबाबतचा आदेश देखील जारी केल्याचे त्यांनी सांगितले

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महारुद्र तीकुंडे यांच्या आदेशाने हे निवेदन सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या शिष्टमंडळाने दिले होते या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे कराड तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड कराड तालुका उपाध्यक्ष मुकेश मोरे कराड शहर अध्यक्ष विकी शहा कराड शहर सरचिटणीस सौरभ गाजी कराड शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला खटाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब मुल्ला सामाजिक कार्यकर्ते सुमित कांबळे राकेश पवार अनिकेत तडाके तोफिक बागवान यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले होते . 
जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले संघटनेच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे संघटनेवर समाजातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे पदाधिकारी कार्यकर्ते आनंदित झाले असून पुढील काम करण्यासाठी एक प्रकारे ऊर्जा मिळाली असल्याचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला म्हणाले

आज 16 जण सापडले बाधित ; जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 74

वेध माझा ऑनलाइन - आज सातारा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ आढळून आली आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 74 एवढी सक्रिय कोरोना बाधित रुग्णसंख्या झाली आहे आज डिस्चार्ज रुग्णसंख्या वाढली आहे

Wednesday, April 12, 2023

आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट ; केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते ; राजकीय वर्तुळात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन - ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या विधानानतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बंडखोरीबाबतचा आरोप-प्रत्यारोपाचा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.


आज 15 जण बाधित ; सक्रिय रुग्णसंख्या 83

वेध माझा ऑनलाइन - आज सातारा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ आढळून आली आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज 15 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 83 एवढी सक्रिय कोरोना बाधित रुग्णसंख्या झाली आहे आज डिस्चार्ज रुग्णसंख्या वाढली आहे

शंभूराज देसाई हे कधीही शिवसेनेशी इमानदार नव्हते ; हर्षद कदम यांचा घणाघात

वेध माझा ऑनलाइन ; शंभूराज देसाई याना शिवसेना कळली नाही, कळणारही नाही त्यांनी कधीही शिवसेनेशी इमानदारी दाखवली नाही त्यामुळे आता त्यांच्या तोंडात स्वाभिमान असले शब्द शोभत नाहीत अशा शब्दांत शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी आज हल्लाबोल केला

उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला सिल्व्हर ओक वर गेले त्यावर शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली त्याचा समाचार हर्षद कदम यांनी नुकताच घेतला 

कदम म्हणाले ज्यांनी कधीही शिवसेनेशी इमान राखला नाही नेहमीच पक्ष विरोधी काम केले अशांनी उद्धव ठाकरे शरद पवारांना सिल्व्हर ओक वर भेटायला गेले म्हणून टीका करतात मग हे जेव्हा महाविकास आघाडीत होते तेव्हा पवारांकडे लॉबिंग करायला का गेले होते?असा सवाल करत त्यांनी शंभूराज देसाई यांनी फक्त आपल्या मतदार संघातच लक्ष घालावे असा सल्लाही देसाई याना दिला आहे

Tuesday, April 11, 2023

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी रु. ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर.



वेध माझा ऑनलाइन -  कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण च्या गावामधील विकासकामांसाठी स्थानिक विकास निधीतून ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे, मागासवर्गीय वस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत. मंजूर निधीतून खालील कामे केली जाणार आहेत. 

सैदापूर-राधाकृष्णनगर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.-रु. १० लाख, रेठरे खुर्द-अंतर्गत रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण करणे-रु.७ लाख, मुठ्ठलवाडी (भूरभूशी) येथे अंतर्गत गटर बांधणे- रु. ५ लाख, शिंदेवाडी, (कोळेवाडी) - अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे-रु. ५ लाख, दुशेरे - विकासमळा रोड उत्तम तुकाराम पाटील यांच्या शेतापासून कोडोली हद्दीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- रु. १० लाख, गोळेश्वर - गोळेश्वर फाटा ते जि. प. शाळा ते मारुती मंदिर पर्यंत मुख्यरस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट करणे-रु. १० लाख, कालेटेक - ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे-रु. १५ लाख, ओंड-विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे-रु. १० लाख, येरवळे - जुने गावठाण येरवळे येथे मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण  व गटर बांधणे. बदल - रु. १० लाख, वारुंजी - उत्तम बळवंत पाटील ते किसन यशवंत पाटील रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, वारुंजी - राजेंद्र श्रीरंग पाटील ते उध्दव मधूकर पाटील यांचे शेड पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, पाचपुतेवाडी (तुळसण) - येथे अंतर्गत आर. सी. सी. गटर करणे - रु. ५ लाख, सवादे - हनुमान सांस्कृतिक भवना शेजारील ग्रामपंचायत जागेत स्वछता गृह व स्वयंपाकगृह बांधणे - रु. १० लाख, आटके - मागासवर्गीय वस्ती अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी - रु. ६ लाख, जखीणवाडी - किशोर नलवडे यांचे घरापासून बनपुरीकर विहिर ओढ्यापर्यंत आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटर बांधणे. - रु. ५ लाख, जखीणवाडी - विष्णुपुरम अपार्टमेंट ते बचपन स्कूल पर्यंत आर. सी. सी. गटर - रु. १० लाख, सैदापूर - पानंद कार्नर ते हणमंत नाईक यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण - रु. ५ लाख, मालखेड - सुनिल घाटे यांच्या घरापासून ते बाळासो कुलकर्णी यांच्या घरापर्यंत गटर - रु. १० लाख, बेलवडे बु. - वार्ड क्र. 3 व 4 मध्ये अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. बदल - रु. १० लाख, वार्ड क्र. 1 व 2 मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर करणे. बदल - रु. ७ लाख, गोटे - पाटण रोड वजनकाटा ते सुरेश धुमाळ यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, नांदगाव - नांदगाव शिरंबेरोड पासून पोपट पाटील‍ यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे. बदल - रु. १० लाख, चचेगाव - कृष्णराव पाटील यांच्या घरापासून ते शिराज पठाण यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, मनव - येथील प्राथमिक शाळा ते बौध्द वस्तीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण - रु. १० लाख, कार्वे - येथील मातंगवस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर - रु. १० लाख, शिंगणवाडी - येथील स्मशानभूमी सूधारणा व संरक्षणभिंत बांधणे. - रु. ७ लाख, सैदापूर - येथे अंतर्गत रस्ता कक्रीटीकरण व गटर बांधणे. - रु. १०. लाख, गोवारे - कृष्णा कॅनॉल-सैदापूर ते गोवारे गावाकडे जाणारा कॅनॉल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रु. १० लाख, येवती - मेनरोड पासून कुंभार वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण - रु. ७ लाख वहागाव - र्येथील किल्ला परिसर येथे  आर. सी. सी. गटर बांधणे.- रु. ७ लाख, येथील लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व गटर -  रु. ८ लाख, धोंडेवाडी - येथील अंतर्गत आर. सी. सी. गटर बांधणे. - रु. १० लाख, मुंढे - जि. प. शाळा ते चाँद शिकलगार यांचे घरापर्यंत जाणारा रस्त्यास बंदिस्त काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर बांधणे. - रु. ७ लाख, 
नांदलापूर - येथील गोपाळ वस्तीतील आर. सी. सी. बंदिस्त गटर बांधणे. - रु. ७ लाख, कालवडे - येथील बेघर वस्तीमध्ये आर. सी. सी गटर बांधणे. - रु. ७ लाख, ओंड - कोयना बँकेपासून मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, मुनावळे - येथील केदारेश्वर मंदिर ते विश्वजीत बॅकवेट हॉलपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, गोळेश्वर - येथील गोळेश्वर फाटा जि. प. शाळा ते मारुती मंदिर मुख्य रस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट उर्वरित काम - रु. ५ लाख, भैरवनाथनगर (काले) - येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ७ लाख, विंग - चचेगांव-धोंडेवाडी  रस्ता ते सुतारकी वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.-रु. १५ लाख, झुंजारवाडी - येथील यमाई मंदिर येथील बंदिस्त गटर बांधणे. - रु. ३ लाख,येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, टाळगाव - येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ७ लाख, गोळेश्वर - सुयोगनगर कॉलनी  व कॉलनी परिसर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे. - रु. ७ लाख, येळगाव - येथील येळोबा मंदिर ते साईबाबा मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, घारेवाडी - येथे जुने गावठाणातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ५ लाख, जखीणवाडी - येथे किशोर नलवडे ते दत्तू संतू नलवडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, घराळवाडी - अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.- रु. ७ लाख,  हणमंतवाडी - अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.-रु. ७ लाख, वहागाव - लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर - रु. ५ लाख, रेठरे खुर्द - कुंभार पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रु. १० लाख, कालवडे - स्मशानभूमी नुतनीकरण व सुशोभिकरण करणे. - रु. १० लाख, गोंदी - कॅनाल ते श्री. तानाजी पोपट पवार यांचे शेतापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. - रु. १० लाख, आणे - विकासनगर ते रस्त्याच्या ओढ्याकडेला संरक्षकभिंत - रु. १० लाख, बेलवडे बु. - मागासवर्गीय वस्तीमध्ये दयानंद सखाराम वाघमारे यांचे घरापासून ते महेंद्र दिनकर कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, गोटे - वलीशा देसाई यांचे घरापासून राजू आगा व आल्लाउद्दीन देसाई यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, मुंडे - येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये श्री. संतोष माने व श्री जालिंदर माने यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे. - रु. १० लाख.

Monday, April 10, 2023

आ पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजार समिती निवडणुकीत उघड भूमिका घेतली...ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे परगावी गेले नाहीत, हेच नशीब...अतुलबाबांची पृथ्वीराज बाबांवर खोचक टीका ;

वेध माझा ऑनलाइन - कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आम्ही राजकारण विरहीत आघाडी स्थापन केली आहे. शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या निवडणुकीत आमच्या पॅनेलला यश मिळेल असा विश्‍वास माजी सहकारमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.दरम्यान डॉ अतुल भोसलेंनी आ पृथ्वीराज चव्हाण यांची यावेळी खिल्ली उडवली, ...ते म्हणाले या निवडणुकीत आ पृथ्वीराज चव्हाण उघड आमच्यासमोर आले ते बरेच झाले नाहीतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे परगावी गेले नाहीत हेच नशीब... अशी खोचक टीका डॉ अतुल भोसलेंनी यावेळी केली ... 

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.बाळासाहेब पाटील व भाजप नेते डॉ.अतुल भोसले यांनी आज (सोमवारी) संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी माजी आ.आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, अ‍ॅड.राजाभाऊ पाटील, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, जगदीश जगताप, धोंडीराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की, कराड तालुका हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. या तालुक्यात कराड दक्षिण आणि कराड उत्तर यासह सुपने, तांबवे हा विभाग पाटण विधानसभा मतदार संघातील येतो. त्यामुळे विविधता ही मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत आम्ही डॉ. अतुल भोसले, आनंदराव पाटील, जगदीश जगताप, मदनदादा मोहिते अशी सर्व तालुक्यातील मंडळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस सामोरे जात आहोत.
आम्हाला ही निवडणूक काही नवीन नाही. ज्यावेळी बाजार समिती आमच्याकडे होती. त्याकाळी आम्ही शेतकर्‍यांसाठी भरीव अशी कामे केली. त्यानंतर काही राजकीय संदर्भ बदलले. ते आता आम्ही सुधारलेली आहेत.कराडपासून कोकण जवळ आहे,  पुणे-मुंबई हायवेही जवळ आहे. या ठिकाणचा जो शेतमाल आहे. तो गतीने राज्याच्या तसेच परराज्याचे इतर भागात जावा यासाठी आम्ही त्या काळात काही शेड उभे केले, विकास कामे केली. ती आता अधिक गतिमान करायची आहेत.
राज्यात काही ठिकाणी खासगी मार्केटचा प्रयोग आला. परंतु त्यामध्ये त्यातील अपयश हे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांचा उद्देश हा शेती उत्पन्न बाजार समितीच्याकडे राहिलेला आहे. या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या योजना त्या ठिकाणी राबविणार आहोत. आम्ही ज्या ज्या संस्थेत काम करतो त्या राजकारण विरहित म्हणून काम करतो. आणि याही मार्केट कमिटीमध्ये आम्ही राजकारण विरहित पद्धतीने काम करणार असल्याचे आ.बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

रस्ता रुंदीकरण करताना व सहापदरीकरणाचा पुल उभा करीत असताना स्थानिक नागरिकांच्या भावनांचा विचार व्हावा, ; जिल्हाधिकार्‍यांसमवेत याविषयी लवकरच बैठक घेणार ; खा. उदयनराजे


वेध माझा ऑनलाइन - महामार्ग रुंदीकरण करताना व सहापदरीकरणाचा पुल उभा करीत असताना स्थानिक नागरिकांच्या भावनांचा विचार व्हावा, लोणावळ्या सारखी स्थिती कराड शहराची होऊ नये तसेच कराड शहराची ओळख कायम रहावी यासाठी डी.पी.जैन कंपनीच्या अधिकार्‍यांना सुचना दिलेल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून कराडकरांच्या भावना पोहोचवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खा.उदयनराजे भोसले यांनी दिली.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावरील सध्याचा उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी सहापदरीकरणासाठी दुहेरी वाहतूकीचा एकच नवीन पुल पाडण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी व स्थानिकांना येणार्‍या अडचणी याबाबत चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) खा.उदयनराजे भोसले यांनी पुलाच्या कामाची पाहणी करून सहापदरीकरण कामाचे कंत्राटदार डी.पी.जैन तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, डॉ.अतुल भोसले, माजी आ.आनंदराव पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी बांधकाम सभापती हणमंतराव पवार,  सुनिल काटकर, माजी नगरसेविका सौ.स्मिता हुलवान,  नितीन काशिद, आर.टी.स्वामी, गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे,  शिवसेनेच्या सुलोचना पवार, प्रदीप जैन, वाहतूक अधिकारी सरोजिनी पाटील, प्राधिकरणाचे अधिकारी व नागरिक यांची उपस्थिती होती.
सध्या सुरू असणार्‍या पुलाच्या कामाबाबतचा नक्की आराखडा काय आहे? याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याबाबी राजेंद्रसिंह यादव यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे खा.उदयनराजे भोसले यांनी याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच हा प्लॅन नक्की काय आहे? तसेच या महामार्ग कामांमध्ये भूसंपादीत केलेल्या जागा याबाबत ही चर्चा करण्यात आली. सातारावरून कोल्हापूरकडे जाताना अन्नपूर्णा हॉटेलजवळ पॉईंट आहे. तसेच लोटस फर्निचर येथे दुसरा पॉईंट आहे. या ठिकाणी जर एखादा नवखा वाहनधारक वाहतूक करत असेल आणि जर चुकून तो पुढे गेला तर त्याला मागे  कराड शहरात येण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचा टप्पा पार पाडावा लागणार आहे. हा टप्पा पार पाडावा लागू नये यासाठी यु टर्नची गरज असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच हा पूल करत असताना यामध्ये अनेक नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्या नागरिकांना अद्यापही मोबदला दिला गेला नाही. याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी पुढील आठवड्यामध्ये मीटिंग आयोजित केली आहे. त्यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. या महामार्गाला कोणत्याही नागरिकाचा विरोध नाही. परंतु नागरिकांचे व्यवसाय बंद पडू नये व भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा याबाबत चर्चा करण्यात आली. महामार्ग रुंदीकरण करताना या सर्व बाबींचा विचार व्हावा , लोणावळ्या सारखी स्थिती कराड शहराची होऊ नये तसेच कराड शहराची ओळख कायम रहावी यासाठी अधिकार्‍यांना खा.उदयनराजे भोसले यांनी सूचना दिल्या. तसेच महामार्गाचे काम व्यवस्थित करा, लोकांना त्रास होता कामा नये ही अधिकार्‍यांची जबाबदारी आहे. याबाबतही खा.उदयनराजे  भोसले यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द : निवडणूकांच्या तोंडावरच शरद पवार यांना मोठा झटका

वेध माझा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यामुळे निवडणूकांच्या तोंडावरच शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सह कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.

आजघडीला राज्यात राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार आहेत. तसेच राज्यात 54 आमदार असून नागालँडमध्ये त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा दर्जा रद्द केल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
खर तर कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी निवडणूकीत एकूण मतांपैकी 6 टक्के मतांची आवश्यकता असते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित अस यश मिळाले नाही आणि त्यांची मतांची टक्केवारी घसरली अस म्हंटलं जातंय. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.

 



शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील रस्त्यांच्या कामांना प्रारंभ ; रणजितनाना पाटील यांच्या प्रयत्नाने हायटेक रस्ते


शिवाजी सोसायटीच्या रहिवाश्यांनी रणजित पाटील यांचा सत्कार केला


वेध माझा ऑनलाइन ; 
येथील शिंदे गटाचे युवा नेते रणजितनाना पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून कराड शहरासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीअंतर्गत शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील बहुतांश रस्ते कारपेट आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सोसायटीतील राम मंदिरसमोर मान्यवरांच्या हस्ते झाले.

मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके,शिवसेना जिल्हा प्रमुख. जयवंत शेलार(माऊली) रणजितनाना पाटील, माजी नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर,बाबासो शिंदे मदन भोसले. बंडा मोहीते.रमेश जाधव, सुधीर शिराळकर,भावेश शहा.सुनिल निगडीकर.विजय देसाई.माजी नगरसेवक. घन:श्याम पेंढारकर,रविराज शिंदे प्रकाश शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, सुलोचन पवार, शंभूराज रैनाक. गुलाब पाटील. यांच्यासह सोसायटीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.

रणजितनाना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे शहरास निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी वैशिष्टय़पूर्ण योजना, दलित वस्ती सुधार, जिल्हा नियोजन या माध्यमातून सुमारे 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून शहरातील विविध रस्ते होणार आहेत. शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील बहुतांश रस्ते हायटेक रस्ते होणार आहेत. सोसायटीतील सर्व रस्ते मोठे असून हे रस्ते हायटेक होणार आहेत. याबरोबरच वाखाण शिवारातील रस्तेही होणार आहेत. सोलर पथदिवेही बसवणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी 8 कोटींचा निधी दिला आहे. त्याची लोकवर्गणीही माफ केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून शहरासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लागणार आहेत.
सोसायटीतील रस्ते नव्याने होणार असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल रणजितनाना पाटील यांचा सत्कार रहिवाशांच्या वतीने करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Sunday, April 9, 2023

कराडच्या सातशहिद चौक येथील महारुद्र हनुमान जयंती उत्सवास डॉ अतुलबाबांची उपस्थिती ; अतुलबाबांनी साधला नागरिकांशी सुसंवाद;


वेध माझा ऑनलाईन - 
 कराडच्या सात शहिद चौक येथील महारुद्र हनुमान मंदिरात सात शहीद मराठा समाज मंडळ (ट्रस्ट) च्या वतीने हनुमान जयंती उत्सव गुरुवार दि 6 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास कराड दक्षिणचे नेते व महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थिती लावली होती अतुलबाबांच्या हस्ते यावेळी आरती घेण्यात आली

डॉ अतुलबाबांनी  हनुमंताची आरती करून मनोभावे दर्शन घेतले व नागरिकांशी सुसंवाद साधला. त्यावेळी सात शहिद मराठा समाज मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विनोद ढेब-पवार, खजिनदार सचिन पवार (महाराज), सचिव विनोद जामदार, सदस्य विनायक बाबर तसेच परिसरातील नागरिक सचिन गायकवाड, प्रताप इंगवले ,राजेंद्र जाधव, पै. राजेंद्र यादव, अमित चोथे, संभाजीराव जाधव, रामचंद्र यादव, विठ्ठल पवार, विनोद पवार, आण्णा शेलार, रामभाऊ शेलार, सुहास शिंगण, मोहन शिंगण, बबनराव गायकवाड, प्रमोद शेलार, संतोष शिंदे, संजय शिंदे, गजानन भोपते, अविनाश पवार, विक्रम तुळसणकर, संभाजी इंगवले, अमर भोपते, सुदाम शिंगण, दादा मस्के, अमर बोंद्रे, दादा भोसले, सोनू ढेब तसेच युवानेते किरण मुळे, समाधान चव्हाण, सिद्धार्थ पाटणकर, धीरज पवार, वाजिदभाई मुल्ला तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिकांची तसेच महिलांची उपस्थिती होती.

विरोधी पक्षनेते अजितदादांकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचे कौतुक ; बँकेने केला अजितदादांचा सत्कार;


वेध माझा ऑनलाइन - 
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज राज्यातच नव्हे तर देशात अत्यंत चांगले आहे असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले. 
यावेळी बँकेचे बँकेचे अध्यक्ष श्री.नितीन पाटील,उपाध्यक्ष श्री.अनिल देसाई, संचालक आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील,श्री.राजेंद्र राजपुरे,श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर,श्री.प्रदिप विधाते,श्री.सत्यजित पाटणकर,श्री.सुनिल खत्री,श्री.रामराव लेंभे,श्री.सुरेश सावंत, श्री.लहुराज जाधव,संचालिका सौ.कांचन साळुंखे,सौ.ऋतुजा पाटील,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री.राजेंद्र गाढवे,श्री.राजेंद्र भिलारे उपस्थित होते.

याप्रसंगी अजितदादा पवार यांचा बँकेमार्फत यथोचित सत्कार करणेत आला.

यावेळी अजितदादा म्हणाले,बँकेने चांगला नावलौकिक मिळविला असून तो कायम टिकविणेसाठी सातत्य व गुणात्मक कामकाज करणे आवश्यक आहे.बँकेचे प्रशासन व व्यवस्थापन उत्तम आहे.बँकेत आर्थिक शिस्त पाळली जाते.कर्ज वाटप करताना निकष विचारात घेवूनच कर्ज वाटप केले जाते व राजकारणविरहीत कामकाज केले जाते,त्यामुळे बँक सक्षम आहे. बँकेची कर्ज वसुली चांगली आहे. एनपीए चे प्रमाण अत्यंत कमी आहे.बँकेला चालू वर्षी नफा चांगला झालेला आहे.सहकारी साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देत आहेत.साखर कारखाने कर्ज मागणी कमी झाल्यामुळे बँकेचा कर्जपुरवठा कमी होत आहे.बँकेने उत्पन्न वाढीसाठी थेट कर्ज वाढीसाठी नवीन पर्याय शोधले पाहिजेत. बँकेने सोलर प्रोजेक्टला प्राधान्य दयावे.दुग्ध व्यवसाय,पोल्ट्री,कृषी पर्यटन,गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज इ.योजनांचे माध्यमातून चांगले काम होत असून अधिक काम करावे. बँक संलग्न विकास सेवा संस्थांमार्फत केल्या जाणारे कर्ज पुरवठ्याचा व्याजदर महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅनमध्ये बँकेचा 70 टक्केपेक्षा अधिक वाटा आहे ही चांगली बाब आहे. बँक संलग्न ९५३ विकास सेवा संस्थांपैकी ९१५ विकास संस्था मागील वर्षी नफ्यात आलेल्या आहेत ही अत्यंत चांगली बाब आहे.बँकेने स्वनिधी वाढविणेस प्राधान्य दयावे.अमृतमहोत्सवी वर्षात बँकेने चांगले कार्यक्रमांचे आयोजन करावे.बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळाबरोबरच अधिकारी व सेवकांचे सुध्दा योगदान असलेचे सांगून पुढील वर्षाच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली.सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उत्कृष्ट आहे त्यामुळेच बँक देशामध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी बँकेला गौरविले असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून या बँकेची नोंद झालेली आहे असेही ते म्हणाले