वेध माझा ऑनलाइन - आज बाजार समितीचा निकाल जाहीर होऊन काँग्रेस च्या विचाराला लोकांनी निवडून दिले आहे यावरून कराड तालुक्यातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे ओळखले पाहिजे पैशाच्या जोरावर निवडणूक लढून सगळी सत्ता आपल्या घरात ठेवू पाहणाऱ्यांना मतदारांनी या निवडणुकीत चपराक दिली असल्याचे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं
कराड बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित रयत पॅनल चे 12 उमेदवार निवडून आले त्यानंतर आ पृथ्वीराज चव्हाण यांनी या विजयाबद्दल पत्रकारांना प्रतिक्रिया दिली
ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी- भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही निवडणूक झाली उत्तरेतील काही बाहेरच्या लोकांनी देखील आम्हाला साथ दिली हे देखील बोलायला ते विसरले नाहीत एकूणच चांगल्या विचारांच्या लोकांना व विकास कामाला मतदारांनी आपला कौल देत हा निवडणूक निकाल दिला आहे त्या सर्वांचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी आभार मानले व पैशाच्या जोरावर निवडणूक लढणार्यांना मतदारांनी चपराक दिली असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले
No comments:
Post a Comment