Saturday, September 30, 2023

पाऊस वाढला : कोयना धरणात 4 हजार 309 क्युसेस पाण्याची आवक ;

वेध माझा ऑनलाइन। पावसाने रात्रीपासून चांगलाच जोर धरला असून कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.  कोयना धरणात प्रतिसेंकद 4 हजार 309 क्युसेस पाण्याची आवक सुरू असून धरणात 93. 34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी अजून 11. 66 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे कोयना धरण परिसरात 6 मिलीमीटर, नवजा 5 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 16 मिलीमीटर पाऊस झाला आहे 

राघव चड्ढा व अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार मुंबईत ; तारीख ठरली ;

वेध माझा ऑनलाइन । अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढाच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख आता समोर आली आहे. परिणीती आणि राघव ४ ऑकटोबरला मुंबईत बॉलिवूड कलाकारांसाठी लग्नाचं रिसेप्शन देणार असल्याची पक्की खबर आहे. २३ सप्टेंबरला राजस्थान येथील उदयपूर शहरात परिणीती आणि राघव लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिणीती दिल्लीत आपल्या सासरी परतली.

उदयपूर येथील महालात तीन दिवस लग्नसोहळा पार पडला. कुटुंबीय, जवळचा मित्रपरिवार आणि आप पक्षातील आणि इतर राजकीय पक्षातील राजकीय नेत्यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. लग्नातील फोटो मीडियात वेळेअगोदर लीक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली गेली. या लग्नसोहळ्यासाठी तब्ब्ल १५ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जाते. सध्या परिणीती आणि राघव दोघंही दिल्लीत आहे. त्यांनी हनिमूनसाठी परदेशात जाणं तूर्तास टाळलंय.

परिणीती आणि अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तातडीने पहिलं गाणंही प्रदर्शित करण्यात आलंय. परिणीतीला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हनिमून पुढे ढकलावं लागतंय. परिणीती मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यानंतर काही दिवस मुंबईतच राहणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत परिणीतीचं करियर फारसं बहरलं नाही. ती बराच काळ सिनेमापासून लांब होती. तिच्याकडे आताही फारसे चित्रपट नाही. परिणीतीच्या तुलनेत नवख्या सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार स्वगृही परतणार ; आमदार जयंत पाटील यांचा दावा; अजित पवारांवर केली टीका ; काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन । झाले ते चुकीचे असे सांगत अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला. काहीजण पक्ष स्थापन करणाऱ्या संस्थापक अध्यक्षांना पदावरून दूर करून आपलाच पक्ष खरा असल्याचा अविर्भाव आणत आहेत, अशी टीका त्यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केली.

कोणत्याही पक्षाचे आमदार दुसरीकडे गेले तर त्यांच्यासोबत पक्षही गेला ही भावनाच मुळात चुकीची आहे. दुसरीकडे गेलेले अनेक आमदार जे झाले ते चुकीचे झाल्याचे सांगत आमच्याकडे परत येण्याच्या विचारात आहेत, असे पाटील यांनी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाटील म्हणाले, निवडणूक आयोगापुढे आम्ही आमची बाजू स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. पण, त्यानंतरही निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली. दुसरा गटही शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगत आहे. पण, नंतर वेगळी भूमिका मांडत आहे. पण, निवडणूक आयोग सर्व जाणतो आहे. तो लवकरच योग्य तो निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास आहे. आगामी लोकसभा निवडणूक सहा महिन्यांत तर विधानसभा निवडणूक आठ ते दहा महिन्यांत होण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणी तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.




आनंदाचा शिधा वितरणात सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिधा वाटपाची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत सातारा जिल्ह्याने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सातारा जिल्ह्यात एक घडलेल्या घटनेमुळे तीन दिवस इंटरनेट सुविधा बंद होती. या कालावधीत सर्व पुरवठा विभाग अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी शिधा वाटपाचे काम हाती घेतले. या काळात त्यांनी परिश्रश्रम घेत आनंदाचा शिधा जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण केंद्रात पोहचविला. तसेच त्या माध्यमातून 97.44 टक्के शिधाचे वितरण करण्यात आले. कमी कालावधीत योग्य नियोजन करून वितरण केल्यामुळे सातारा जिल्हा शिधा वाटपात राज्यात प्रथम क्रमांकावर आला. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

सातारा जिल्ह्यात 3 लाख 88 हजार 907 पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी 3 लाख 78 हजार 934 शिधापत्रिकाधारक कुटूंबाना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने 97.37% तर गोंदिया जिल्ह्याने 96.53% वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जोरदार राडा ; खुर्च्यांची तोडफोड; वाचा बातमी..

वेध माझा ऑनलाइन। प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतमी पाटील तब्बल दोन तास उशीरा आल्याने नागपुरात हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालत तब्बल दोन डझन खुर्च्या तोडल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील हिल टॉप परिसरात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नागपुरातील हिल टॉप परिसरात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीला पाहण्यासाठी शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील तब्बल दोन तासांच्या उशीराने पोहचली. त्यामुळं काही तरुण संतापले. आरोपींनी घटनास्थळीच हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. हुल्लडबाजांनी प्लास्टिकच्या खुर्च्या तोडून गौतमीच्या दिशेने भिरकावल्या. कार्यक्रमात गोंधळ होत असल्याचं समजताच आयोजक आणि पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

कार्यक्रमात आणखी काही अनर्थ घडू नये, यासाठी पोलिसांनी हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार केला. समोरील बॅरिकेड कोसळल्यानंतर हुल्लडबाज तरुणांना कार्यक्रमातून काढून देण्यात आलं. त्यानंतर उरलेला लावणी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. 

येणाऱ्या १५-२० दिवसांत चमत्कार होईल, ...कोणी केले भाकीत ...? काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार बनल्याचे राज्याने पाहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत मविआ सरकार बनवले. अडीच वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि ठाकरे सरकार कोसळले. अलीकडेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अजित पवारांच्या भूमिकेमुळे फूट पडली. आता राज्याच्या राजकारणात येत्या १५-२० दिवसांत आणखी एक मोठी घटना घडणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रवी राणा यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

आमदार रवी राणा म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार जसे सरकारमध्ये सहभागी झाले त्याचपद्धतीने शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असं साकडे मी लालबागच्या राजाला घातले होते. राज्य आणि केंद्रातील विकासकामांना पवार साथ देतील. गेल्या १० दिवस मी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला आराधना केली. येणाऱ्या १५-२० दिवसांत चमत्कार होईल आणि शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असा विश्वास मला वाटतो. राज्यात आणि केंद्रातील सरकार शरद पवारांच्या मदतीने मजबूत होईल आणि राज्य, केंद्राचा विकास जोमाने होईल असंही राणा यांनी म्हटलं.

तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अजित पवार विरोधी पक्षनेते होते, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणात कुठलीही गोष्ट शक्य आहे. जर १५ दिवसांत शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात असंही आमदार रवी राणा यांनी सांगितले.  

दरम्यान राणांनी चुकीचे दावे करणे योग्य नाही. रवी राणा हे भाजपाचे प्रवक्ते नाहीत. परंतु राणा यांना भाजपाने काही बोलायला सांगितले असेल तर त्याची कल्पना नाही. परंतु असे बेफाट वक्तव्ये करून दरवेळी चर्चेत राहणे योग्य नाही. ते जर इथे आले तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे आखाडे बांधणे रवी राणा यांना शोभत नाही. युतीमध्ये असेल आणि अधिकृतरित्या तुम्हाला बोलायची परवानगी असेल तर तुम्ही निश्चित बोला. परंतु असे आखाडे बांधून उगाच आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात राणा यांचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी फेटाळला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
रवी राणा यांच्या विधानाची मला खरेच काही माहिती नाही. मी माझ्या कामांत आहे मी इतर कामात व्यस्त असल्याने फारसा वेळ इतर गोष्टीवर लक्ष ठेवायला जमत नाही असं सांगत राणा यांच्या विधानावर भाष्य करणे टाळले.

रवी राणांचे जुने भाकीत खरे ठरले
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रवी राणा यांनी म्हटलं होतं की, जेव्हा मोदी-शाह हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार हे सरकारसोबत येतील. कोणत्याही क्षणी हा हिरवा कंदील मिळू शकतो...

२ हजाराच्या नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ; नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय,

वेध माझा ऑनलाइन। तुमच्याकडे अजूनही २ हजार रुपयांची नोट किंवा नोटा असतील आणि एवढ्या दिवसांत २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नसेल, तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. कारण २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. त्यानंतर मात्र, २ हजार रुपयांची नोट व्यवहारात चालणार नाही, असे आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत २ हजारांच्या नोटा व्यवहारात वापरण्याची मुभा सर्वांना मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यंदा १९ मे रोजी २ हजार रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली आणि या सर्व परत करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आजपर्यंतच्या मुदतीत ३.४२ लाख कोटींच्या २ हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. तर म्हणजेच ९६ टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. याचाच अर्थ चार टक्के म्हणजेच १४ लाख कोटींच्या नोटा अजून चलनात आहेत. त्या नोटा परत याव्यात यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.

Friday, September 29, 2023

35 वर्षापूर्वी खून करून फरार असलेल्या संशयितास पोलिसांनी पकडले ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। पाल ता. कराड येथे सुमारे 35 वर्षापूर्वी खून करून फरार असलेल्या एका संशयितास पोलिसांनी पकडले आहे.  लाला सिद्ध्राम तेली असे संशयित आरोपीचे नाव आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनव गावच्या भीमराव सिद्धाम तेली याचा त्याच गावातील बाळू सरगर, दत्तू यलमारे या लोकांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी खून केला होता त्याचा बदला म्हणून सिद्ध्राम तेली व त्याच्या काही सहकाऱ्यांनी मिळून दत्तू ज्ञानू यलमारे रा. पाल, ता. कराड याचा निर्घृण खून केला होता. त्याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. गुन्ह्यातील संशयित लाला सिद्ध्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान लाला सिद्धाम तेली हा त्याचे घरी आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून संशयितास त्याचे राहते घरातून मध्यरात्रीचे सुमारास पकडले 



अजित पवार छगन भुजबळ यांच्यावर संतापले, दोघांमध्ये जोरदार खडाजंगी ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मु्द्दा पेटला आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केलीय. पण राज्य सरकारने तसं करु नये, यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे. याच मुद्द्यांवरुन ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते या बैठकीला हजर होते. यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसींच्या आकडेवारीवरून दोघांमध्ये बैठकीतच खडाजंगी झाली. छगन भुजबळ यांनी मांडलेली अशी कोणतीही आकडेवारी खरी नाही. तशी आकडेवारी असेल तर दाखवून द्यावी, असं थेट आव्हान अजित पवारांनी भुजबळांना दिलं.

नेमकं काय घडलं?
ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी नेत्यांची सरकारसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. छगन भुजबळ यांनी बैठकीत मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. ओबीसींवर अन्याय होतोय. ओबीसी समाजाचे कमी अधिकारी मंत्रालयात आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ही माहिती साफ चुकीची आहे. ही माहिती खरी असेल तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावे, असं अजित पवार बैठकीत म्हणाले. यानंतर पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बैठकीत काही क्षणासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

खंदारे पुन्हा कराडचे मुख्याधिकारी म्हणून झाले रुजू ; लवकरच घेणार चार्ज ;

 


वेध माझा ऑनलाइन। कराड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून शंकर खंदारे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी अकोला महानगरपालिकेत त्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश आले होते. मात्र आता पुन्हा खंदारे कराड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत 

वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिलेल्या शंकर खंदारे यांची नेमणूक कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आल्यानंतर त्यांनी येथील काम काही काळ पाहिले नंतर ते अकोला येथे पदोन्नती घेऊन गेले होते मात्र आता पुन्हा खंदारे यांची कराडचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

दरम्यान यापूर्वी खंदारे यांनी कराडमध्ये काहीकाळ जे काही काम केले आहे त्यात त्यांनी शिस्तीचे अधिकारी म्हणन नाव कमावले आहे पालिकेच्या जलशुद्धीकरण विभागातील कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराबाबतचा प्रश्न सोडवून  त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळत आपले एक वेगळे इम्प्रेशन शहरापुढे पाडले आहे... त्याची आजही चर्चा शहरात होत असते

कराडात रणजित नानांच्या दातृत्वाचे कौतुक ; सुमारे 52 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; रणजितनाना पाटील मित्र परिवाराने गणपती विसर्जनादिवशी राबवला महाप्रसाद वाटपाचा उपक्रम :

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने सलग नवव्या वर्षी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी प्रीतिसंगमावर येणाऱया भाविक व सार्वजनिक मंडळांना श्रमपरिहार (महाप्रसाद) देण्यात आला. सकाळी अकरापासून रात्री तीनपर्यंत अव्याहत सुरू असलेल्या या उपक्रमात सुमारे 52 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  

अनंत चतुर्दशीला शहर व परिसरातील भाविक व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कृष्णा घाटावर होत असते. या भाविक व कार्यकर्त्यांना श्रमपरिहार म्हणून महाप्रसाद देण्याचा उपक्रम रणजितनाना पाटील यांनी 2015 साली सुरू केला. यावर्षीही मोठी तयारी करण्यात आली होती. महाप्रसादाबरोबर पाणी बॉटलही  देण्यात येत होती. गेल्या वर्षी सुमारे 40 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी हा आकडा सुमारे 52 हजारांपर्यंत पोहोचला. पहाटे तीनपर्यंत मंडळांचे कार्यकर्ते याचा लाभ घेत होते. दिवसभरात विसर्जनासाठी आलेले नागरिक, भाविक, महिला, मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांनी याचा लाभ घेतला. महाप्रसाद देण्याबरोबरच अन्न पाकिटेही देण्यात येत होती.  

खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व भाजपचे पदाधिकारी यांनी उपक्रमास भेट दिली.  

या उपक्रमात स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. 25 महिला स्वच्छतेसाठी कार्यरत होत्या. जागीच जेवण बनवण्याचे काम दिवसरात्र सुरू होते. वाढपी, रणजितनाना पाटील मित्रपरिवारातील कार्यकर्ते असे सुमारे 300 जणांचे पथक हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते.

भाविकांकडून कौतुक
रणजितनाना पाटील गेली 9 वर्षे हा उपक्रम आयोजित करत आहेत. गणेश विसर्जनानंतर मोफत श्रमपरिहाराची सोय असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील लोक आवर्जुन याचा लाभ घेत होते. त्यांना पाणी बॉटलही देण्यात येत होती. एकूण या उपक्रमातील जय्यत तयारी पासून भाविकांनी रणजितनाना पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

कुणाचं मैदान भरणार, कुणाच्या खुर्च्या रिकाम्या राहणार? दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच ; ठाकरे गटाचा प्लॅन तयार!

 वेध माझा ऑनलाइन। गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या दसरा मेळाव्यावरूनही शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांससमोर आल्याचं चित्र आहे. आपला दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच व्हावा यासाठी दोन्ही गटाकडून महापालिकेला पत्रक देण्यात आले आहेत. पण परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आणि त्यासाठी प्लॅनही तयार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येतंय. 

गेल्या वर्षी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा ठाकरे गटाकडून घेण्यात आला होता, यंदाही त्या ठिकाणी आम्हाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी अडचण येणार नाही असा विश्वास ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी व्यक्त केला आहे. आता महापालिकेला आम्ही पत्र दिलं आहे, त्यांचा निर्णय काय होतो याची वाट पाहू आणि त्यानंतर वरिष्ठ नेते भूमिका घेतील असंही ते म्हणाले. 

शिवाजी पार्कवर यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षीही यावरून वाद झाला होता आणि ठाकरे गटाने न्यायालयाची दारं धडकावली होती. त्यानंतर ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळवा हा बीकेसीमध्ये पार पडला होता. आताही दोन्ही गटांनी आपल्यालाच शिवाजी पार्क मिळावं अशी मागणी करत महापालिकेकडे पत्र दिलं आहे. 

शिवाजी पार्क आम्हालाच मिळणार
ठाकरे गटाचे नेते महेश सावंत म्हणाले की, मागच्या वर्षी थाटामाटात आम्ही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा केला होता. मागच्या वर्षी शेवटपर्यंत मुंबई महापालिकेने आम्हाला शिवाजी पार्कसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो. 
मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्याकडे आहे. त्याची परवानगी आम्ही या वर्षीच्या पत्रात जोडली आहे दीड महिन्यापूर्वीच आम्ही पत्र मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही असा विश्वास आहे. 

... शिवाजी पार्क नाकारलं तर, 
महेश सावंत पुढे म्हणाले की, शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी पत्र दिलं आहे की नाही याची माहिती नाही. आम्ही वॉर्ड ऑफिसरला आता सुद्धा भेटून आलो. त्यांचा असं म्हणणं आहे की तुमचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही विधी विभागाला या संदर्भात मार्गदर्शनासाठी पाठवलं आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय घेईल तोपर्यंत वाट बघू. जर आम्हाला शिवाजी पार्क नाकारलं तर पुढे काय करायचं याचा निर्णय आमची वरिष्ठ नेते घेतील

कराडात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान जैन युवा फोरम व सॅटरडे ट्रेकिंगच्या वतीने गणेश भक्तांसाठी अल्पोपहाराची सोय ; उपक्रमाचे सर्वत्र होतय कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन। काल अनंत चतुर्थीच्या निमित्ताने झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कराड मधील जैन युवा फोरम तसेच सॅटरडे ट्रेकिंगच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्व गणेश भक्तभाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती  यावेळी जवळपास 4500  पेक्षा जास्त  भाविकांनी याउपक्रमाचा लाभ घेतला याठिकाणी  अनेक मान्यवरांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना शुभेछा दिल्या व सदर उपक्रमाचे कौतुक केले
     
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,तसेच सातारा चे आडीशनल पोलिस अधिकारी बापू बांगर कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी याठिकाणी सदिच्छा भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले

मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव कठोर नियम ; यावरून मंत्रालयातील नोकरशाहीवर टीका ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर नियम करण्यात आले आहेत. या नियमावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. आता मंत्रालयात येणाऱ्या जिथे जायचे आहे त्याच मजल्यावरचा पास दिला जाईल. त्यासाठी विशिष्ट रंगाचा पास असेल. या नियमावरूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी घणाघाती टीका केलीय. असा आदेश काढणाऱ्या नोकरशाहीचा ‘वरचा मजला’ रिकामा आहे काय? असा थेट सवाल शेजवळकर यांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आलेल्या एक युवकाने शिक्षक भरतीसाठी जाळीवर उडी मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार वारंवार घडत असल्याने सरकारने लगेचच मंत्रालयाची सुरक्षा कडक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तातडीने काही नियम बनवण्यात आले. या नियमांमध्ये भेटीसाठी आलेल्यांना ज्या मजल्यावर जायचे आहे त्याच मजल्याचा पास दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. एवढेच नाही तर प्रत्येक मजल्यासाठी रंग ठरवला जाईल आणि त्याच रंगाचा पास अभ्यागतांना दिला जाईल. म्हणजे ही मंडळी मंत्रालयात भटकत राहणार नाहीत.

पण ज्यांना अनेक विभागांमध्ये कामे आहेत, त्यांनी काय करायचे याबाबत नियमांमध्ये काहीही स्पष्टता नाही. मंत्रालयात येणारे अनेकवेळा तीन-चार खात्यांची कामे घेऊन येतात. संबंधित खात्यांची कार्यालये एकाच मजल्यावर असण्याची शक्यताही नाही. अशा लोकांची खूप गैरसोय होणार आहे. त्यांना एका विभागाचे काम झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या मजल्यावरील विभागाचा पुन्हा पास काढावा लागेल. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी वेळखाऊ आणि किचकट ठरू शकते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी मंडळी मंत्रालयात रोज येत असतात. सुरक्षेच्या नव्या नियमामुळे गरजू लोकांची खूप  अडचण होणार आहे. म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून मंत्रालयातील नोकरशाहीवर सडकून टीका केली आहे.

ईदच्या दिवशी पाकिस्तानात बॉम्बस्फोट ; बॉंबस्फोटात 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी ;

वेध माझा ऑनलाइन। ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला असून बलुचिस्तान प्रांतामध्ये एका बॉंब स्फोटामध्ये  52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. या बॉंब स्फोटाची माहिती पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिली आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड बॉंबरने हल्ला केल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग....

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाजवली स्वतःचीच टिमकी! ; अजित पवार गटाने घेतले सर्वांना सामावून ;

वेध माझा ऑनलाइन। ईद ए मिलाद हा सण गुरुवारी सर्वत्र उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. अनेक पक्षांनी मुस्लिमांनी जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यात राष्ट्रवादी मागे नव्हती. राष्ट्रवादी शरद पवार गटाने ईद निमित्त दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीवर फक्त राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचाच फोटो आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक याचे फोटो आहेत.

या जाहिरातीतून जयंत पाटील यांनी स्वतःचीच टिमकी वाजवली आहे. केवळ स्वतःवरच फोकस केल्याचे बोलले जाते. तर अजितदादांच्या गटात सर्व समान पातळीवर आहेत. नवाब मलिकांनाही स्थान दिलंय. अल्पसंख्यक मतांवर पोळी भाजणारे नेमके कोण आहे... हे आता ओळखायला हवे अशी चर्चा आहे.

२ जुलै रोजी अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादी कॉँग्रेससच्या ९ आमदारांनी भाजपा- शिंदे सरकारला पाठिंबा डेट मंत्री पदे पदरात पाडून घेतली. अजित पवार यांनी आमचाच पक्ष अधिकृत आहे, असा दावा राज्य निवडणूक आयोगाकडे केला. त्यामुळे शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. असे सगळे काही असताना राष्ट्रवादीत अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पहिले जाते.जयंत पाटील पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाल्यावर अजित पवार गट  नाराज होता. तो अजूनही नाराज आहे. जयंत पाटील हे एककल्ली कारभार करतात. ते कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेत नाहीत. कायम आपली टिमकी वाजवत असतात. असा त्यांच्यावर नेहमी आरोप होतही असतो आणि याचीच प्रचिती यानिमित्ताने आली आहे अशी चर्चा आता होताना दिसते आहे.

आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच? विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून टाकणाऱ्या आमदार अपात्रतेचा निकाल यंदा म्हणजेच २०२३ मध्ये लागण्याची शक्यता मावळली आहे. कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या ५४ आमदारांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर कशी सुनावणी करणार, याचे वेळापत्रक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे दिले आहे. हे वेळापत्रक ५ ऑक्टोबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर करायचे आहे. या वेळापत्रकानुसार उलटतपासणी २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दोन्ही पक्षांच्या वकिलांना सोयीनुसार तारखा देण्यात येतील. ही प्रक्रिया संपल्यानंतर दोन आठवड्यांनी सुनावणीची तारीख निश्चित होईल. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेळापत्रकावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘न्यायाला उशीर म्हणजे अन्याय’, अशी टीका केली आहे.

आमदार अपात्रतेची पहिली सुनावणी २५ सप्टेंबरला झाली. त्यानंतर पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयाला विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतून केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. एवढेच नाही तर राहुल नार्वेकर या प्रकरणात एक लवाद म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याचेही स्पष्ट केले होते.या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे दिले आहे. हे वेळापत्रक कसे आहे, कोणत्या दिवशी कोणते कामकाज केले जाईल, पाहुया...

१३ ऑक्टोबर २०२३ – या आधी २५ सप्टेंबरच्या सुनावणीत सर्व याचिका एकत्र करून सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, तर प्रत्येक याचिकेवर वेगळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. त्यामुळे या दोन्ही मागण्यांवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली जाईल.
१३ ते २० ऑक्टोबर – दोन्ही पक्षांच्या वकिलांना कागदपत्रे तसेच आदेशांची पाहणी करण्यासाठी संधी देण्यात येईल
२० ऑक्टोबर – याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घ्यावी की एकत्रित यावर अध्यक्ष निर्णय जाहीर करणार
२७ ऑक्टोबर – कोणती कागदपत्रे स्वीकारायची आणि कोणती कागदपत्रे नाकारायची, यावर शिंदे गट आणि ठाकरे गट म्हणणे मांडतील
६ नोव्हेंबर – अपात्रतेबाबत दोन्ही पक्ष त्यांची भूमिका लेखी स्वरुपात स्पष्ट करतील
१० नोव्हेंबर – आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील
२० नोव्हेंबर – दोन्ही बाजूंच्या पक्षाकडून साक्षीदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र सादर केली जातील
२३ नोव्हेंबर – आठवड्यातून दोनदा अशा पद्धतीने उलटतपासणीला सुरुवात होईल. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या आमदारांना आणि वकिलांना त्यांच्या सोयीनुसार तारीख दिली जाईल.

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन
आठवड्यांनी सुनावणीची अंतिम तारीख ठरेल.

उदयनराजेंनी पुन्हा उडवली कॉलर, मै हु डॉन गाण्यावर धरला ठेका ; साताऱ्यातील गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा व्हीडिओ व्हायरल ;

वेध माझा ऑनलाइन। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा गणेशभक्तांना पुन्हा एकदा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. 

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी काल सहभाग घेतला. यावेळी त्यांनी डीजेच्या गाण्यावर दिलेली फ्लाईंग किस्स आणि उडवलेली कॉलर यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. 
काल पार पडलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेंनी चाहत्यांसाठी मै हु डॉन गाण्यावर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळाले यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपली कॉलर उडवली व चाहत्यांची मने जिंकली

गणपती विसर्जन करायला गेलेला युवक बुडाला ; कराड तालुक्यात घडली घटना ...

वेध माझा ऑनलाइन। खराडे ता कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करण्यास गेलेला युवक बुडाला. गणेश संतोष जाधव वय- 19 असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप मुलाचा शोध सुरू आहे 

याबाबत मिळालेली माहिती अशी, घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गणेश जाधव गेला असताना नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला पोहता येत नव्हते असेही समजते काल अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या नदीपात्रात त्याचा शोध सुरू आहे. 


कराडजवळ वनवासमाची हद्दीत अर्धवट अवस्थेत जळालेला आढळून आला मृतदेह ; घातपाताची शक्यता?

वेध माझा ऑनलाइन।  पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरणाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या मुख्य महामार्ग व सेवा रस्ता यामधील नाल्यात वनवासमाची हद्दीत अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला आहे.वनवासमाची गावच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे या लेनलगतच्या नाल्यात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली. त्यांनतर या घटनेची माहिती पोलीस पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाला देण्यात आली. 

अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेह शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुष जातीचा असावा असा कयास व्यक्त होत आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीची ओळख स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बारामती ऍग्रो वरील कारवाईवर शरद पवारांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रीया ! काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली. राज्यातील २ मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांना पत्रकारांनी बारामतीमध्ये प्रश्न विचारला. त्यावर, पवारांनी एका वाक्यात उत्तर प्रतिक्रिया देत उत्तर देणं टाळलं. 

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे. मात्र, याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई होत असल्याचा आरोपही केला होता. त्यासंदर्भात आता शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

शरद पवार बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आज दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी, शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला असता, त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी स्पष्टपणे टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया देत पवारांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

Thursday, September 28, 2023

पुण्यात यंदाही मोठ्या गणपतीचे विसर्जन लांबलं,

वेध माझा ऑनलाइन।   पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी यावर्षी पुणे पोलीस आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले मात्र त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू,  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. कारण दगडूशेठ नंतर या मंडळांएवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरुच झाली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. यानिमित्ताने पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनलाय.

मिरवणूक लवकर संपेल हाअंदाज चुकला 
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन काल  बाप्पांनी निरोप घेतला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणांनी आपल्या बाप्पाला निरोप  देत आहे. मात्र, पुण्यात एक वेगळीच चर्चा सुरु होती  ती म्हणजे यंदा कोणत्या मंडळाचा गणपती विसर्जनासाठी किती वाजता निघणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणेही यंदा गणेश विसर्जन दोन दिवस चालणार का? कारण अखिल मंडई, बाबू गेनू,  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. 

दगडूशेठ हलवाई गणपतीनंतरची मंडळे रेंगाळली
गेल्या गणेशविसर्जनाच्यावेळी पुण्यातील मिरवणुका ह्या तब्बल तीस तास चालल्या होत्या. दरवर्षी हि मिरवणुकीला लागणार वेळ वाढत वाढत तीस तासांवर गेला. या वर्षी  तसे होऊ नये म्हणून गणपती विराजमान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या कार्यक्रमांवर बैठका सुरु झाल्या. पुणे पोलिस आणि गणेश मंडळांच्या चर्चांनंतर उद्याच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कसं नियोजन असणार? याच्या चर्चा झाल्या. एवढच नाही तर यंदा विसर्जन मिरवणुका वेळेत होण्याचा विश्वास अनेक मंडळांकडून व्यक्त  करण्यात आला. कारण, दरवर्षी पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जित होण्यास संध्याकाळ होते.  दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन नऊ वाजण्याच्या आत झाले. मात्र पुढची मंडळे रेंगाळली त्यामुळे  पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनलाय.

पुढल्या वर्षी लवकर या...मुंबईत बाप्पाना वाजत- गाजत निरोप ;

वेध माझा ऑनलाइन। मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला मुंबईत वाजत, गाजत निरोप दिला जात आहे. मुंबईतील चौपाट्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे. तर, लालबाग-परळ परिसरात गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागचा राजासह  इतर गणपतींना याची देही याची डोळा पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी उसळली आहे. विसर्जनाच्या दिवशी वरुण राजानेदेखील दमदार हजेरी लावली. 

मागील दहा दिवस भक्तांकडून पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आज आपल्या घरी मार्गस्थ होत आहेत. बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईतील चौपाट्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...या घोषणांचा जयघोष सुरू होता. बाप्पाच्या मनमोहक मूर्ती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. मुंबईत गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गिरगाव, दादर, जुहू, अक्सा, आदी चौपाट्यांवर गणेश विसर्जन सुरू आहे. दुपारनंतर समुद्रकिनारी विसर्जनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. या समुद्रकिनारी घरगुती त्याचबरोबर मोठ्या मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी लगबग सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणारे हे भक्तिमय वातावरण पाहण्यासाठी मुंबई आणि त्याचबरोबर इतर शहरातून भाविक ह्या ठिकाणी जमले आहेत. 

वरुण राजाची हजेरी
मुंबईसह राज्यभरात एकीकडे गणेश विसर्जनासाठी धामधूम सुरु असताना, दुसरीकडे वरुणराजा तुफान बरसला. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. याआधी हवामान विभागानेही पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं. 

मुंबई पोलिसांची चोख व्यवस्था
गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदतदेखील होत आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही मोठी गर्दी उसळली आहे. त्यासाठीदेखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मुंबई महापालिकेची तयारी
मुंबई महापालिकेने यंदाही जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी झटत आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. घरगुती बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येत आहे. अनेकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाच्या विसर्जनाला प्राधान्य दिले आहे. 


उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? ...पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा घामाघूम ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। सातारा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारपरिषद नुकतीच साताऱ्यात पार पडली यावेळी उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्याचे उत्तर देताना मिश्रा याना बरीच कसरत करावी लागली. 

भाजप खासदार उदयनराजे भोसले कधी काॅलर उडवण्यासाठी, कधी गाड्या रेस करणे तर कधी कधी खूर्चीत खूर्ची घालून बसण्यासाठी तर कधी बिनधास्त डान्स करण्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत.अलीकडेच सातारमधील एका दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजे भोसले स्टेजवर मुलींसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री अजय शर्मा याना याबाबतचा प्रश्न उदयनराजेंच्या समोरच पत्रकारांनी विचारला त्यावेळी नेहमी बिनधास्त असणारे राजे चांगलेच धीरगंभीर झाल्याचे दिसून आले

या पत्रकार परिषदेत मंत्री अजय मिश्रा यांना उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? अशी विचारणा करण्यात आली. अचानक प्रश्न समोर आल्यानंतर डावीकडे बाजूलाच बसलेल्या उदयनराजे यांच्याकडून पाहून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्य असल्याचे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अजय मिश्रा म्हणाले की,इथ बसलेल्यांमध्ये शिस्त आहे, वैयक्तिकरित्या कोण काय करतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही.मात्र,उदयनराजे भोसले भाजपचा चेहरा आहेत,असे विचारण्यात आले असता त्यांनी हा व्यक्तीगत आरोप असल्याचे म्हणाले.पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी डान्स केलेला नाही. व्हिडिओ आपल्याला दाखवू का? अशी विचारणा संबंधित पत्रकाराकडून करण्यात आल्यानंतर आमच्या पक्षातील सर्व शिस्तप्रिय आहेत. त्यांनी डान्स केलेला कार्यक्रम हा व्यक्तीगत कार्यक्रम होता, पक्षाचा नव्हता असेही ते म्हणाले 

एमआयडीसी घेणार ५ विमानतळांचा ताबा, अजित पवारांनी दिले निर्देश ;

वेध माझा ऑनलाइन। एमआयडीसीने राज्यातील पाच विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्टीवर चालवण्यास दिली होती. खासगी कंपनीकडून या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काहीही न झाल्याने ही पाचही विमानतळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच एमआयडीसीने ताब्यात घ्यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. रखडलेल्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती विमानतळांची कामे मार्गी लावण्यात यावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. खासगी कंपनीने या पाचही विमानतळांचे आधुनिकीकरण करून तेथे विमानसेवा सुरू करावी, यासाठी एमआयडीसीने ही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवायला दिली होती.

काही वर्षांपूर्वी एमआयडीसीने नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी तसेच या पाचही विमानतळांचे सक्षमीकरण करतानाच तेथे हवाई सेवा सुरू करण्यासाठी या पाच विमानतळांचे २००९ मध्ये खासगी कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ वर्षांनंतरही या विमानतळांवर विमानसेवा सुरु होऊ शकली नाही. एवढेच नाही तर या विमानतळांची अवस्थाही दयनीय  झाली आहे. हे एकप्रकारे अपयश आहे. म्हणूनच या पाचही विमानतळांचा ताबा एमआयडीसीने घ्यावा, त्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

एमआयडीसीने विकसित केलेल्या विमानतळांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. राज्यातील वाहतूक व्यवस्थेचा विकास करतानाच छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महानगरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित भागात विमानसेवा सुरू झाली पाहिजे. विमानतळासाठी जागा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा उभारल्या पाहिजेत. काही ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत, त्यांच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. काही विमानतळांवर धावपट्ट्या वाढवल्या पाहिजेत, तर काही ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणे गरजेची आहे, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.



छगन भुजबळ हे शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे ; माजी आमदार रमेश कदम यांचा खळबळजनक दावा ;

वेध माझा ऑनलाइन।  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी केला. रमेश कदम यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम तुरुंगात होते. 

रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना हे खळबळजनक वक्तव्य केले. रमेश कदम यांनी म्हटले,  छगन भुजबळ शरद पवार यांना जेल मधून ब्लॅक मेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कदम यांनी केला. 

छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्याशी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे असं म्हणत नाराजी बोलून दाखवायचे, असेही कदम यांनी म्हटले. 

सत्तेतील आताचे छगन भुजबळ आणि तुरुंगातील मधील छगन भुजबळ खूप फरक आहे असल्याचे रमेश कदम यांनी म्हटले. जेलमध्ये ते रोज आजारी पडायचे. काकूळतीला यायचे त्यांना रोज उपचाराची गरज होती. जेल मधून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही छगन भुजबक यांच्या छातीत दुखतंय असं म्हणत कदम यांनी टोला लगावला. जेलमध्ये गेलं की लोक आजारी पडतात त्यांना माहीत आहे. सहानुभूती मिळवून कशी बेल मिळवायची हे देखील त्यांना माहित आहे. परंतु जेल ही कोणाच्या नशिबात येऊ नये नरक आहे असेही त्यांनी म्हटले. 

माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्व गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला. रमेश कदम यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मोहोळ मध्ये परतल्यानंतर कदम यांचे त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. कदम यांनी तूर्तास कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही.

Wednesday, September 27, 2023

आज कराडच्या प्रीतिसंगमावर गणेशभक्तांसाठी मिळणार मोफत जेवण ; शिंदे गटाचे युवा नेते रणजितनाना पाटील यांचा सलग नवव्या वर्षी उपक्रम ;

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने सलग नवव्या वर्षी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी प्रीतिसंगमावर येणाऱया भाविक व सार्वजनिक मंडळांना श्रमपरिहार (महाप्रसाद) देण्यात येणार आहे. गुरूवारी 28 रोजी सकाळपासून रात्री शेवटचे गणेश विसर्जन होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. भाविक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रणजितनाना पाटील यांनी केले आहे.

अनंत चतुर्दशीला शहर व परिसरातील भाविक व सार्वजनिक मंडळे प्रामुख्याने प्रीतिसंगमावर कृष्णा नदीत गणेश विसर्जन करतात. विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. या भाविकांना व कार्यकर्त्यांना श्रमपरिहार म्हणून महाप्रसाद देण्याचा उपक्रम रणजितनाना पाटील यांनी 2015 साली सुरू केला. कृष्णा घाटावर हा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. गेल्या वर्षी सुमारे 40 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाबरोबरच भाविकांना पाणी बॉटलही देण्यात येते.  

यावर्षी गुरूवारी 28 रोजी अनंत चतुर्दशी असून कृष्णा घाटावर येणाऱया सर्व भाविकांना महाप्रसाद व पाणी बॉटल देण्यात येणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार आदींना या उपक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. भाविक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजितनाना पाटील यांनी केले आहे.

उद्या गणेश विसर्जनानिमित कराड शहरातील वाहतुकीत बदल ; पहा...कुठे कुठे आहे बदल...

वेध माझा ऑनलाइन । गणपती बाप्पाला उद्या गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जाणार आहे. या निमित्त कराड च्या वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 
हे बदल गुरूवारी दि. 28 रोजी सकाळी 6 ते दि. 29 रोजी सकाळी 7 पर्यंत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. 

 वाचा...खालील ठिकाणी वाहतुकीत केले आहेत बदल...

1) कराड शहरातील कृष्णा नाका बाजुकडुन कराड शहरात सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाटकडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदिर – कमानी मारुती मंदीर- सोमवार पेठ पाण्याची टाकी- जनकल्याण बँक मार्गे सुरु राहणार आहे. तसेच सोमवार पेठ येथील नागरिक कराड शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

2) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक- आझाद चौक- सात शहीद चौक- शुक्रवार पेठ- बालाजी मंदीर या मार्गावरून वळविण्यात आली आहे.

3) दत्त चौक- यशवंत हायस्कूल- आझाद चौक- नेहरु चौक- चावडी चौक- बालाजी मंदीर- झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

4) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला आहे.

5) आपत्कालीन परस्थितीमध्ये नेहमीच मिरवणुक मार्गासाठी पर्यायी रस्ता कर्मवीर पतळा- पायल फुटवेअर- अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ ते नेहरु चौक या मार्गावरील दुर्तफा दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्कींग झोन करणेत आलेला आहे.

6) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने, पोलीस दलाची वाहने वगळुन इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल केलेला आहे.

दूषित रक्त चढवल्याने हवाई दलातील अधिकाऱ्याला HIV ची बाधा, लष्करी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; सर्वोच्च न्यायालयाने 1.54 कोटींचा ठोठावला दंड :

वेध माझा ऑनलाइन दूषित रक्त संक्रमणामुळे हवाई दलातील अधिकारी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला 1.54 कोटींचा दंड ठोठावला आहे.

लष्करी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. दूषित रक्त संक्रमणामुळे हवाई दलातील अधिकारी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत लष्कर आणि हवाई दलाला दंड ठोठावला आहे. लष्करी रुग्णालयाच्या निष्काळजीपणा हवाई दलातील माजी अधिकारी एचआयव्ही संक्रमित झाले होते. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला 1.54 कोटींचा दंड ठोठावला आहे.

संक्रमित रक्त चढवल्याने हवाई दलातील अधिकारी HIV बाधित
लष्कराच्या रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेल्या वायुसेनेच्या एका माजी अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लष्कराच्या रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हवाई दलाचे माजी अधिकारी 2002 मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी पार पडली. भारतीय हवाई दलाला माजी हवाई दल अधिकाऱ्याला 1.54 कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश भारतीय लष्कर आणि हवाई दलाला देण्यात आले आहेत.

'निष्काळजीपणासाठी हवाई दल आणि लष्कर जबाबदार'
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "वैद्यकीय निष्काळजीपणामुळे याचिकाकर्ता 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. यासाठी व्यक्ती कोणालाही जबाबदार धरू शकत नाही, त्यामुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर या निष्काळजीपणासाठी जबाबदार आहे. ही रक्कम भारतीय हवाई दल 6 आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला देईल. भारतीय हवाई दल लष्कराकडून अर्धी रक्कम मागू शकतात. या माजी हवाई दल अधिकाऱ्याची सर्व देणी 6 आठवड्यांच्या आत देय केले जावे." सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांच्या संदर्भात सरकार, न्यायालये, न्यायाधिकरण, आयोग आणि अर्ध-न्यायिक संस्थांसाठी HIV कायदा, 2017 अंतर्गत काही मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.

नेमकं प्रकरण काय?
याचिकाकर्ते माजी हवाई दल अधिकाऱ्यावर 2002 साली लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. हे अधिकारी 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या 'ऑपरेशन पराक्रम' चा एक भाग होते. माजी हवाई दल अधिकारी 'ऑपरेशन पराक्रम' दरम्यान ड्युटीवर असताना आजारी पडले होते. त्यांना जुलै 2002 मध्ये लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि यावेळी त्यांना रक्त चढवण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं.



मणिपूर पुन्हा चिघळले ; सरकारने केली मोठी घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन। मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेले मणिपूर पुन्हा एकदा आगीच्या झळीमुळे चर्चेत आले आहे. ईशान्येकडील मणिपूर राज्यात परिस्थिती गंभीर झाली असून राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर सरकारने अलीकडेच २३ सप्टेंबर रोजी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. पण, पुन्हा एकदा हिंसेची आग वाढत चालली आहे.  मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. खरं तर पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
मणिपूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. यामध्ये राजधानी इम्फाल, लॅम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामासांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पट, हिंगांग, लमलाई, इरिलबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम यांचाही समावेश आहे. मात्र, राज्यातील १९ पोलीस स्थानकांमध्ये शांतता असून अशा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. 


सह्याद्री सहकारी साखर कारखाना महिन्याला सात किलो साखर दहा रुपये दराने देणार ; आ. बाळासाहेब पाटील यांची घोषणा

वेध माझा ऑनलाइन। सभासदांनी पाच- सहा वर्षापासून वाढीव साखरेची मागणी केली होती. सभासदांच्या मागणीचा विचार करत सह्याद्री सहकारी साखर कारखाना महिन्याला सात किलो साखर दहा रुपये दराने देणार असल्याची घोषणा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी सहकार व पणनमंत्री कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली. यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, शहाजीराव क्षिरसागर, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, राष्ट्रवादीचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, कारखान्याच्या उपाध्यक्ष लक्ष्मीताई गायकवाड, संचालक माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, कांतीलाल पाटील, अविनाश माने आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व माजी संचालक उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे अन् ऊस मात्र खाजगीकडे घालायचा ही गंभीर बाब आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व सभासद ऊस उत्पादकांचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी सहकारी साखर कारखाना पार पाडत असतो.दरम्यान या सरकारने सप्टेबर संपत आला तरी मंत्री समितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीचे धोरण अद्याप ठरलेले नसल्याने मोठी अडचण होणार असून काही खाजगी कारखाने मात्र सुरू झाले आहेत. पण ते कारखाने नसून खांडसरी आहे. त्यांना एफआरपी अॅक्ट लागू होत नाही.धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हणबरवाडी शहापूर योजना सुरू झाली आहे. सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. अहवाल वाचन चिफ अकाउंटंट जी. व्ही. पिसाळ यांनी केले. आभार मानसिंगराव जगदाळे यांनी मानले

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा दोन दिवस सातारा दौऱ्यावर

वेध माझा ऑनलाईन। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आजपासून दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे आज बुधवारी दुपारी साडेचार वाजता खंडाळा येथे आगमन होईल. तेथील विकासकामांची ते पाहणी करतील. त्यानंतर पावणेसहा वाजता त्यांचे साताऱ्यात आगमन होईल. यावेळी ते विविध गणेश मंडळांना भेटी देणार आहेत, तसेच सायंकाळी साडेसहा वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर साडेसात ते रात्री नऊ यावेळेत ते विविध गणेशमंडळांना भेटी तसेच बुध कमिटी अध्यक्षांच्या मंडळांना भेटी देतील.
रात्री सव्वानऊ वाजता हॉटल फर्न येथे भाजपच्या कोअर कमिटी बैठकीस उपस्थित राहून सातारा लोकसभेचा आढावा घेतील. तेथेच मुक्कामी थांबतील. गुरुवारी (दि. २८ सकाळी ९ वाजता दत्ताजी थोरात यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर चार भिंती या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ देतील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहात राखीव राहील. तेथून ते पुण्याकडे रवाना होतील.

Tuesday, September 26, 2023

डी जे च्या दणदणाटात दोघांचा मृत्यू ; नाचतानाच खाली कोसळले ; डॉक्टरांनी केले मृत घोषित ;

वेध माझा ऑनलाईन।  अवघ्या १० दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाली असतानाही तो गणेश विसर्जन मिरवणुकीला गेला पण...डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली. शेखर सुखदेव पावशे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरी घटना जिल्ह्यातच दुधारी (ता. वाळवा) येथे घडली. तिथेही आवाजाच्या दणदणाटाने ३५ वर्षीय यवकाचा मृत्यू झाला. 

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला. संपूर्ण गावात डीजेचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात येताच भोवळ येऊन ताे खाली पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला तासगावला खासगी रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वाळव्यातही एका तरुणाचा मृत्यू 
 दुधारी (ता. वाळवा) येथे प्रवीण यशवंत शिरतोडे (३५) याचा मृत्यू झाला. शिरताेडे याचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. साेमवारी सायंकाळी कामावरून घरी पोहोचला. त्यानंतर  विसर्जन मिरवणुकीत गेला. काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने त्याला अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसाेबत नाचत असतानाच चक्कर येऊन खाली पडला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात नेले परंतु डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

आ पृथ्वीराज चव्हाण व डॉ अतुल भोसले दिसले शेजारी-शेजारी बसलेले ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। आ. पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले हे दोघे राजकीय  विरोधक काल रात्री कराडात एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले लग्गेच याविषयीची चर्चादेखील शहरात सुरू झाली आहे

मंगळवारी रात्री शहरातील एका गणेश मंडळात  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आणि भाजपचे लोकसभा प्रभारी व कराड दक्षिणचे विधानसभा उमेदवार डाॅ. अतुल भोसले एकमेकांच्या शेजारी बसलेले पहायला मिळाले. गणेशोत्सव सुरू असल्याने आरती निमित्त या दोन्ही नेत्यांच्या शहर व परिसरातील गणेश मंडळांना भेटी देणे सध्या सुरू आहे याच निमित्ताने हे दोघेही याठिकाणी आले होते तेथे उपस्थितांच्या नजरा या दोघांकडेच लागून राहिल्या होत्या पण या दोघांमध्ये कोणतीही चर्चा किंवा काहीच घडले नाही. तरीही हे दोन्ही नेते एकत्र पहायला मिळाल्याची चर्चा मात्र जोरदार झाली...इतकंच!

तलवारीचा धाक दाखवून मागितली खंडणी ; खंडणीखोर अवघ्या 4 तासात पोलिसांच्या ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन । फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील एका व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेपाच सुमारास घडली होती. या घटनेनंतर अवघ्या चार तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास १३५ रविवारपेठ उघडया मारुती मंदीरासमोर फलटण येथे मॅचिंग सेंटर दुकानात अरिजय दोशी हे गि-हाईकाला अस्तर देत होते. यावेळी आदित्य अहिवळे या युवक हातात कोयता तर त्याचा मित्र हातात तलवार घेऊन आला. काही कळणार इतक्यात आदित्य अहिवळे याने अरिजय यांच्या अंगावर कोयता उघारुन दुकानाच्या काऊन्टर मधुन अंदाजे २५ हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेवुन गेला.
तसेच वैभव रमनलाल दोशी (वय ५३) यांच्या फुलचंद दुलचंद दोशी यांचे किराणा मालाच्या दुकानात जावुन वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवुन “प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये हप्ता दिला पाहिजे तरच तुम्ही धंदा करुन शकाल व तुम्ही जर ही रक्कम आम्हास दिली नाही तर याच कोयत्याने तुम्हाला जिवे मारु,” अशी धमकी देत दमदाटी केली. त्यानंतर तौसिफ निजामुद्दीन शेख यांच्या दुकानातुन बॅट हिसकावुन घेवुन दुकानातुन बाहेर जावुन दुकानावर दगडफेक केली. या सर्व घडलेल्या प्रकरणात आरोपी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस ठाणे कडील महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तात्काळ जाऊन सदर ठिकाणी उपलब्ध असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी सदरचा आरोपी हा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत २ आरोपी असुन त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. 

साताऱ्यातील ६१ जण हद्दपार ;

वेध माझा ऑनलाइन ।  सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखविले जात आहेत. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांकडून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान, सातारा शहर परिसरातील ६१ जणांनी जिल्हा पोलीस सार्वजनिक ठिकाणी वावर न करण्याचे आदेश सातारा पोलिसांकडून पारित करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापूसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८/०९/२०२३ रोजी गणेश विसर्जन असल्याने गणेश विर्सजना दरम्यान, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्या अनुषंगाने सातारा शहर व तालुक्यातील असलेल्या व सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगारावर सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांनी ६१ सराईत गुन्हेगाराना दि. २७ सप्टेंबर ते दि. २९ तारखेच्या सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुका हद्दीत थांबणेस मनाई आदेश जारी केला आहे. सदर कालावधीत नमुद सराईत गुन्हेगार सातारा तालुका हद्दीत मिळुन आल्यास त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरीकांना गणेश उत्सवादरम्यान प्रशासनाकडुन देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याचेवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

सोयाबीन, कापूस, ऊस उत्पादनवाढीसाठी प्रयत्न; धनंजय मुंडे जाणार ब्राझीलला!

वेध माझा ऑनलाइन। ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी, (26 सप्टेंबर) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुंबई येथे झालेल्या या भेटीत कृषी, कृषी व्यापार आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी, धनंजय मुंडे यांनी पारंपरिक पद्धतीने ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

ब्राझीलच्या या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगनर, भारतीय दूतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज हे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये आणि कृषिमंत्री मुंडे यांच्यामध्ये कृषीविषयक अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेची उपरती म्हणुन ब्राझिलीयन शिष्टमंडळाकडून धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय, मुंडे यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
ब्राझीलच्या शिष्टमंडळाने भारतीय दूतावासाच्या मार्फत आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली. 
ब्राझिलीयन शिष्टमंडळ आणि कृषिमंत्र्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली?
ब्राझीलमधील कृषिविषयक विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरणातील बदल आणि त्यानुसार शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधक यांना ब्राझीलला पाठवण्याबाबत चर्चा झाली.

अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर;

वेध माझा ऑनलाइन। ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे. त्यानंतर वहिदा रेहमान यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वहिदा रेहमान यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शरद पवारांनीही ट्वीट करत वहिदा रेहमान यांचे कौतुक केले आहे.

ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि नृत्याचा ठसा उमटवणाऱ्या वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यामुळे योग्य व्यक्तिचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वहिदा रेहमान अभिनेत्री म्हणून जेवढ्या मोठ्या आहेत, तेवढ्याच एक व्यक्ती म्हणूनदेखील मोठ्या आहेत. देवआनंद यांचे हा 100वा जन्मदिवस आहे. या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दोन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. गुरुदत्त, देवआनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत काम करूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. असे कलाकार फार दुर्मिळ असतात.
भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल व उत्कृष्ट अशा अभिनयाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
प्यासा, कागज के फुल, चौदवी का चांद, साहेब बिवी और गुलाम, गाईड, खामोशी, बीस साल बाद आदी शेकडो चित्रपटांमध्ये अभियनाचे चार चांद लावणाऱ्या वहिदा रेहमान अगदी अलीकडच्या ‘दिल्ली 6’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. 

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ;

वेध माझा ऑनलाइन।  सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी आगामी काळात सक्षमपणे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच पुढील निवडी जाहीर करण्यात येणार आहेत.

तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी केल्याने फलटण शहरात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.

भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अखिल मराठी पत्रकार संघाच्यावतीने निषेध व्यक्त ; पत्रकारांचा अपमान केल्याप्रकरणी कराड दौऱ्यात त्यांना जाब विचारणार ; कराडच्या पत्रकारांच्या बैठकीत निर्धार ;


वेध माझा ऑनलाइन। भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पत्रकारांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल संपुर्ण राज्यात   विविध पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध होत असतानाच अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाच्या वतीने देखील बावनकुळे यांचा आज निषेध करण्यात आला


 तसेच बावनकुळे हे कराड दौऱ्यावर यापुढे   केव्हाही येतील त्यावेळी त्यांनी पत्रकारांबाबत   केलेल्या या अपमानकारक  वक्तव्याबाबत त्यांना  रोखठोक जाबही विचारण्यात येईल असा   निर्धारही यावेळी कराडच्या पत्रकारांच्या     वतीने करण्यात आला

 यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे   जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर सचिव अतुल   होणकळसे कार्याध्यक्ष दिनकर थोरात शहर   अध्यक्ष सौ प्रगती पिसाळ उपाध्यक्ष सुहास   पाटील  हरून मुलाणी विकास साळुंखे   प्रकाश   पिसाळ कैलास थोरवडे सागर दंडवते आदी   उपस्थित  होते

‘जयवंत शुगर्स’चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाइन।  धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी कारखान्याचे पर्यावरण अधिकारी रोहित कोळेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. कोमल कोळेकर यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, जनरल मॅनेजर (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर, पर्चेस मॅनेजर वैभव थोरात, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, इ.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी इनचार्ज व्ही. जी. म्हसवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एम. सोमदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Monday, September 25, 2023

कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांशबँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट

वेध माझा ऑनलाइन।  कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. विशेष म्हणजे सभा सुरू असतानाच अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत, एका क्लिकवर बँकेच्या सभासदांच्या खात्यावर तात्काळ लाभांश रक्कम जमा करण्यात आली.  

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विराज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत बोलताना चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, गेली सलग ११ वर्षे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेने ८७६ कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून, बँकेकडे ५७६ कोटींच्या ठेवी आहेत; तर २९९ कोटींचे कर्जवितरण केले आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने ११५० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेच्या प्रगतीत सेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असून, सेवकांच्या हितासाठी बँकेने पगारवाढ, बोनस यासह प्रोत्साहनपर भत्त्याच्या रुपाने चांगले आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन दिले आहे. कृष्णा बँकेसह सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला सहकारी पतसंस्था व वित्तपेठा अशा संस्थाचा मिळून तयार झालेल्या कृष्णा आर्थिक परिवाराने ३१ मार्च २०२३ अखेर १४९० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, येत्या मार्चअखेर २००० कोटी व्यवसायपूर्तीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ५२ वर्षात बँकेच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, पण प्रत्येक संकटावर मात करत कृष्णा बँक आज प्रगतीपथावर पोहचली आहे. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत, कृष्णा बँक पुढे वाटचाल करत आहे. बँकेने सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करत, देशपातळीवर आपली ओळख निर्माण करावी.

सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजित लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अभिजीत दोशी, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, दिलीपरावजी पाटील, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक क्लिक अन्‌ सभासदांच्या खात्यावर एकूण ८३ लाख लाभांश वर्ग 
कृष्णा सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर एकूण ८३ लाख रुपये लाभांश रक्कम वर्ग झाली. सभेतच बहुतांश सभासदांनी मोबाईल उंचावून दाखवित लाभांश रक्कम मिळाल्याचा एस.एम.एस. आल्याचे जाहीर केल्याने, कृष्णा बँकेच्या या कृतीचे कौतुक सभास्थळी होत होते.


आमदार अपात्रता प्रकरण ; ...आता 13 ऑक्टोबरला सुनावणी ; 54 आमदारांची चिंता वाढली ;


वेध माझा ऑनलाईन। आमदार अपात्रतेची टांगती तलवार आता १३  ऑक्टोबरपर्यंत लटकत राहणार आहे. त्यामुळे नोटीस दिलेल्या ५४  आमदारांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर जात असल्याने ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात आज (२५ सप्टेंबर) पहिली सुनावणी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार होते. पण प्रकरण एकच असल्यामुळे सर्व याचिका एकत्रित कराव्यात आणि सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. तर या मागणीला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय. दरम्यान, दोन्ही बाजूंचं म्हणणे ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केले आहे
ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला. याचिकांचा विषय एकच असल्यामुळे त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यास निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल, असा दावा त्यांनी केला. तर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत, अशी भूमिका घेत वेगवेगळ्या सुनावणी घ्या, अशी मागणी लावून धरली.
आता आमदार अपात्रतेवर तब्बल १८  दिवसांनी सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. परंतु, विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीला विलंब होत असल्याचा दावा करत ठाकरे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली आणि विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.