Sunday, September 17, 2023

पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर एक संशयित पोलिसांच्या ताब्यात ; अजून एकाचा शोध सुरू -

वेध माझा ऑनलाइन। 
पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्ट वरून राडा होऊन यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता सातारा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांना अटक केली असून यामध्ये 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुसेसावळी प्रकरणातील दोन प्रमुख सूत्रधारांपैकी राहुल कदम या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे
या आरोपींवर नुकसान करणे,शासकीय कामात अडथळा  जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले आहेत. पुसेसावळी प्रकरणातील अजून एक संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

No comments:

Post a Comment