वेध माझा ऑनलाइन। प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतमी पाटील तब्बल दोन तास उशीरा आल्याने नागपुरात हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालत तब्बल दोन डझन खुर्च्या तोडल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील हिल टॉप परिसरात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे.
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नागपुरातील हिल टॉप परिसरात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीला पाहण्यासाठी शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु कार्यक्रमस्थळी गौतमी पाटील तब्बल दोन तासांच्या उशीराने पोहचली. त्यामुळं काही तरुण संतापले. आरोपींनी घटनास्थळीच हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. हुल्लडबाजांनी प्लास्टिकच्या खुर्च्या तोडून गौतमीच्या दिशेने भिरकावल्या. कार्यक्रमात गोंधळ होत असल्याचं समजताच आयोजक आणि पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कार्यक्रमात आणखी काही अनर्थ घडू नये, यासाठी पोलिसांनी हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार केला. समोरील बॅरिकेड कोसळल्यानंतर हुल्लडबाज तरुणांना कार्यक्रमातून काढून देण्यात आलं. त्यानंतर उरलेला लावणी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment