वेध माझा ऑनलाइन। पुणे-बंगळूर महामार्ग सहापदरीकरणाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या मुख्य महामार्ग व सेवा रस्ता यामधील नाल्यात वनवासमाची हद्दीत अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला आहे.वनवासमाची गावच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे या लेनलगतच्या नाल्यात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली. त्यांनतर या घटनेची माहिती पोलीस पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाला देण्यात आली.
अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेह शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुष जातीचा असावा असा कयास व्यक्त होत आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीची ओळख स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment