Saturday, September 23, 2023

नागपुरात धुव्वाधार ; शहरात पुरस्थिति ; नागरिकांची तारांबळ ; एका महिलेचा मृत्यु ;

वेध माझा ऑनलाईन ; नागपूर शहरात फक्त चार तासांच्या आत १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळला.गेल्या आठवड्याभरापूर्वी दडी मारून बसलेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात धो धो बरसणाऱ्या पावसाने काही जिल्ह्यांत मात्र अजूनही विश्रांती घेतली आहे. अश्यातच, शुक्रवारी (22 सप्टेंबर) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पुरस्थिति निर्माण झाली. शहरात फक्त चार तासांच्या आत १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळला. यामुळे, ढगफुटीसादृश्य परीस्थिती निर्माण होऊन नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. यामध्ये एक वयोवृध्द्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

नागपूर शहरात चार तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळला. यामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे, शहरांमध्ये पुर परिस्थिति निर्माण झाली. पावसाच्या जोरामुळे अंबाझरी तलाव आणि गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाला. यामुळे, नागनदी, पिवळी नदीला पूर येऊन पुराचे पाणी सखल भागात शिरले. पुराचे पाणी झोपडपट्टींसह उच्चवर्गीय वसाहतींमध्येही शिरले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. महेश नगर येथील मिराबाई पिल्ले (वय ७०) या महिलेचा मृत्यू झाला.शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अजूनही काही लोक पुरात अडकले असून लष्कर तसेच अग्निशमक दलाच्या जवानांनी सगळी सूत्रे हातात घेतली आहेत. लष्कर तसेच अग्निशमक दलाच्या जवानांकडून बचावकार्याचे काम तेजीत चालू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष देत बचवकार्याचे आदेश दिले आहेत.अंबाझरी परिसरातील डागा ले-आऊईटमध्ये घरांमध्ये चार फुटांवर पाणी गेल्याने येथील नागरिकांना बचाव पथकाने बोटीने बाहेर काढले. रस्त्यांना नदीचेस्वरूप प्राप्त होऊन रस्त्यांवर पार्क केलेल्या कार पाण्यावर तरंगताना दिसल्या

No comments:

Post a Comment