Friday, September 15, 2023

उद्या शनिवारी काढण्यात येणारा मूक मोर्चा प्रशासनाच्या विनंती नुसार रद्द करण्याचा सामाजिक संघटनांचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन। पुसेसावळी ता. खटाव येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 9 रोजी काढण्यात येणारा मूक  मोर्चा  प्रशासनाने केलेल्या विनंती नुसार रद्द करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संघटनांनी घेतला आहे.

पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनानी मुक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती.त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई,आमदार बाळासाहेब पाटील,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारचे सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये.यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती.या विनंतीला  सकारात्मक प्रतिसाद देत संघटनांनी उद्या शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा रद्द केला आहे.

No comments:

Post a Comment