वेध माझा ऑनलाइन। तुमच्याकडे अजूनही २ हजार रुपयांची नोट किंवा नोटा असतील आणि एवढ्या दिवसांत २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नसेल, तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. कारण २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. त्यानंतर मात्र, २ हजार रुपयांची नोट व्यवहारात चालणार नाही, असे आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत २ हजारांच्या नोटा व्यवहारात वापरण्याची मुभा सर्वांना मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यंदा १९ मे रोजी २ हजार रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली आणि या सर्व परत करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आजपर्यंतच्या मुदतीत ३.४२ लाख कोटींच्या २ हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. तर म्हणजेच ९६ टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. याचाच अर्थ चार टक्के म्हणजेच १४ लाख कोटींच्या नोटा अजून चलनात आहेत. त्या नोटा परत याव्यात यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment