Thursday, September 28, 2023

उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? ...पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा घामाघूम ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। सातारा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारपरिषद नुकतीच साताऱ्यात पार पडली यावेळी उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्याचे उत्तर देताना मिश्रा याना बरीच कसरत करावी लागली. 

भाजप खासदार उदयनराजे भोसले कधी काॅलर उडवण्यासाठी, कधी गाड्या रेस करणे तर कधी कधी खूर्चीत खूर्ची घालून बसण्यासाठी तर कधी बिनधास्त डान्स करण्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत.अलीकडेच सातारमधील एका दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजे भोसले स्टेजवर मुलींसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री अजय शर्मा याना याबाबतचा प्रश्न उदयनराजेंच्या समोरच पत्रकारांनी विचारला त्यावेळी नेहमी बिनधास्त असणारे राजे चांगलेच धीरगंभीर झाल्याचे दिसून आले

या पत्रकार परिषदेत मंत्री अजय मिश्रा यांना उदयनराजे काॅलर उडवतात, स्टेजवर नाचतात ही भाजपची शिस्त आहे का? अशी विचारणा करण्यात आली. अचानक प्रश्न समोर आल्यानंतर डावीकडे बाजूलाच बसलेल्या उदयनराजे यांच्याकडून पाहून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्य असल्याचे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अजय मिश्रा म्हणाले की,इथ बसलेल्यांमध्ये शिस्त आहे, वैयक्तिकरित्या कोण काय करतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही.मात्र,उदयनराजे भोसले भाजपचा चेहरा आहेत,असे विचारण्यात आले असता त्यांनी हा व्यक्तीगत आरोप असल्याचे म्हणाले.पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी डान्स केलेला नाही. व्हिडिओ आपल्याला दाखवू का? अशी विचारणा संबंधित पत्रकाराकडून करण्यात आल्यानंतर आमच्या पक्षातील सर्व शिस्तप्रिय आहेत. त्यांनी डान्स केलेला कार्यक्रम हा व्यक्तीगत कार्यक्रम होता, पक्षाचा नव्हता असेही ते म्हणाले 

No comments:

Post a Comment