वेध माझा ऑनलाइन। अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम जोरात चालू असून 24 जानेवारी 2024 ला मंदिराचे लोकार्पण होणार आहे. संपूर्ण भारतभरातील राम भक्त लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. परंतु, आता राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर अयोध्येत अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या बॉम्बहल्ल्याची सूचना एका शाळकरी मुलाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या क्रमांकावर दिली असून त्या मुलाने युट्यूबवर धमकीचा संबंधित विडिओ पहिल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या क्रमांकावर एक निनावी फोन आला होता. ज्यामध्ये, येत्या 21 सप्टेंबरला राम मंदिर बॉम्बने उडवणार आसल्याचे सांगितले होते. या फोन नंतर अयोध्येत अलर्ट जारी करण्यात आला. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा संस्थामध्येही खळबळ उडाली आहे पोलिसांनी शोध घेतला असता फोन करणारी व्यक्ति चक्क आठव्या इयत्तेत शिकणारा मुलगा निघाला.
या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा विडिओ त्याने यूट्यूब वर पाहिला होता. मंगळवारी, (19 सप्टेंबर) संबंधित विडिओ पाहिल्यानंतर त्याने पोलिसाना ही माहिती देण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने संबंधित माहिती पोलिस हेडक्वार्टरला दिली. “राम मंदिरात 21 सप्टेंबरला बॉम्बस्फोट होणार आहे.. ” एवढं बोलून त्याने फोन कट केला. पोलिस मुलाची चौकशी करत असून संबंधित विडिओ तपासत आहेत.
No comments:
Post a Comment