Friday, September 15, 2023

कराड नगरपरिषद व एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन स्वच्छता लिग २.०, स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाइन। कराड नगरपरिषद व एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन स्वच्छता लिग २.०, स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ व एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचा १५व्या वर्धापन दिनानिमित्त  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन( टाऊन हॉल) या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.यावेळी त्या परिसरातील गवत,झुडपे,कचरा साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर,सौरभ पाटील (तात्या),आरोग्य अभियंता आर.डी.भालदार,जल निस्सारण अधिकारी ए.आर.पवार,सिटी कॉर्डिनेटर आशिष रोकडे,अधिकारी,एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद व सदस्य,हेड मुकादम,मुकादम ,कर्मचारी आणि कराड नगरपरिषद जनजागृती टीम उपस्थित होती.

No comments:

Post a Comment