वेध माझा ऑनलाइन। शिवसेना पक्षनाव आणि पक्ष चिन्ह तसेच आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत तीन आठवड्यांनी सुनवाणी होणार असून आमदार अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही केस गांभीर्याने घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबत निर्णयाची केस आहे. मात्र ते याबाबत दिरंगाई करत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशाचा आदर करावा असे सांगत आतापर्यंत त्यांनी याबाबत काय केले यांचे उत्तर मागितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्देश देताना तीन महिनयांची मुदत दिली नव्हती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करायला हवा. आम्ही निश्चित कालमर्यादा दिली नसली तरी विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा असा त्याचा अर्थ होत नाही.
आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढची सुनावणी आता दोन आठवड्यांनी होणार असून या सुनावणीवेळी अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत काय केले? याची माहिती द्यावी. आम्ही निश्चित कालमर्यादा दिली नसली तरी या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष अनंतकाळ काम करु शकत नाही. तसेच आमदार अपात्रतेसंबंधी किती काळात हे काम पूर्ण केले जाईल याबाबत विधानसभा अध्यक्षांनी पुढच्या सुनावणीत माहिती द्यावी. याबाबतचे वेळापत्रक त्यांनी न्यायालयाला सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
No comments:
Post a Comment