वेध माझा ऑनलाइन। अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असते. इरा आपल्या प्रियकर नुपूर शिखरे सोबत पुढील वर्षात जानेवारीत विवाहबद्ध होणार आहे. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इरा आणि नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. एरवी प्रसार माध्यमांपासून लांब राहणाऱ्या इरानं स्वतःहूनच समोर येत आपण जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं.
इराचा मराठमोळा प्रियकर नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे इरा नैराश्यतेच्या गर्तेत अडकली होती. पहिल्या नातेसंबंधात अपयश मिळाल्यानं इरा पूर्णपणे खचली होती. या काळातच इराची आणि नुपूरची मैत्री झाली. नुपूरनंच आपल्याला नैराश्यतेच्या गर्तेतून बाहेर काढल्याचं इरा सांगते. येत्या जानेवारी महिन्यात राजस्थान येथील उदयपूर येथे दोघंही विवाहबद्ध होतील. 3 जानेवारी रोजी दोघांचं लग्न होईल. इरा मुस्लिम तर नुपूर मराठी आहे. लग्न कोणत्या पद्धतीत होईल याबाबत इराने माहिती नाही दिली. तीन दिवस लग्न सोहळा सुरू राहील.
No comments:
Post a Comment