वेध माझा ऑनलाइन। ईद ए मिलाद हा सण गुरुवारी सर्वत्र उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. अनेक पक्षांनी मुस्लिमांनी जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यात राष्ट्रवादी मागे नव्हती. राष्ट्रवादी शरद पवार गटाने ईद निमित्त दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीवर फक्त राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचाच फोटो आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक याचे फोटो आहेत.
या जाहिरातीतून जयंत पाटील यांनी स्वतःचीच टिमकी वाजवली आहे. केवळ स्वतःवरच फोकस केल्याचे बोलले जाते. तर अजितदादांच्या गटात सर्व समान पातळीवर आहेत. नवाब मलिकांनाही स्थान दिलंय. अल्पसंख्यक मतांवर पोळी भाजणारे नेमके कोण आहे... हे आता ओळखायला हवे अशी चर्चा आहे.
२ जुलै रोजी अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादी कॉँग्रेससच्या ९ आमदारांनी भाजपा- शिंदे सरकारला पाठिंबा डेट मंत्री पदे पदरात पाडून घेतली. अजित पवार यांनी आमचाच पक्ष अधिकृत आहे, असा दावा राज्य निवडणूक आयोगाकडे केला. त्यामुळे शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. असे सगळे काही असताना राष्ट्रवादीत अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पहिले जाते.जयंत पाटील पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाल्यावर अजित पवार गट नाराज होता. तो अजूनही नाराज आहे. जयंत पाटील हे एककल्ली कारभार करतात. ते कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेत नाहीत. कायम आपली टिमकी वाजवत असतात. असा त्यांच्यावर नेहमी आरोप होतही असतो आणि याचीच प्रचिती यानिमित्ताने आली आहे अशी चर्चा आता होताना दिसते आहे.
No comments:
Post a Comment