वेध माझा ऑनलाइन। वर्ल्डकप ची तयारी म्हणून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना आज शुक्रवारी, 22 सप्टेंबर मोहाली येथे खेळवला जात आहे. मोहालीतील आय एस बिंद्रा स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शामीने जबरदस्त कामगिरी करत 10 षटकांत 51 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. शमीची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली असून तो भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स मिळवणारा गोलंदाज ठरला आहे.
प्रथम फलंदाजिस उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच षटकांत धक्का बसला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श आउट झाला. मिचेल मार्शने चार चेंडूत चार धावा केल्या. शमीच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने मार्शचा स्लिप्समध्ये झेल घेतला.
यानंतर, डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत 106 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 53 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावांवर झेलबाद झाला. जाडेजाने वॉर्नरची विकेट मिळवली.
मोहम्मद शमिने स्टिव स्मिथला 41 धावांवर असताना क्लीन बोल्ड केले. यानंतर, मारनस लेबुशेन आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अश्विनच्या गोलंदाजीवर रिवर्स स्वीप मारण्याच्या नादात लेबुशेन बाद झाला. लेबुशेनने 39 धावा केल्या. नंतर, जोस इंग्लिस आणि मार्कस स्टॉयनिस यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. शमिने पुन्हा भेदक गोलंदाजी करत स्टॉयनिसचा दांडा उडवला. ऑस्ट्रेलियाच संपूर्ण संघ 276 धावांवर माघारी परतला. भारताला सामना जिंकण्यासाठी 277 धावांचे आव्हान आहे.
No comments:
Post a Comment