वेध माझा ऑनलाइन। कराड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून शंकर खंदारे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी अकोला महानगरपालिकेत त्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश आले होते. मात्र आता पुन्हा खंदारे कराड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत
वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिलेल्या शंकर खंदारे यांची नेमणूक कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आल्यानंतर त्यांनी येथील काम काही काळ पाहिले नंतर ते अकोला येथे पदोन्नती घेऊन गेले होते मात्र आता पुन्हा खंदारे यांची कराडचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
दरम्यान यापूर्वी खंदारे यांनी कराडमध्ये काहीकाळ जे काही काम केले आहे त्यात त्यांनी शिस्तीचे अधिकारी म्हणन नाव कमावले आहे पालिकेच्या जलशुद्धीकरण विभागातील कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराबाबतचा प्रश्न सोडवून त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळत आपले एक वेगळे इम्प्रेशन शहरापुढे पाडले आहे... त्याची आजही चर्चा शहरात होत असते
No comments:
Post a Comment