वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी आगामी काळात सक्षमपणे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच पुढील निवडी जाहीर करण्यात येणार आहेत.
तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी केल्याने फलटण शहरात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.
No comments:
Post a Comment