वेध माझा ऑनलाइन । गणपती बाप्पाला उद्या गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जाणार आहे. या निमित्त कराड च्या वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
हे बदल गुरूवारी दि. 28 रोजी सकाळी 6 ते दि. 29 रोजी सकाळी 7 पर्यंत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.
वाचा...खालील ठिकाणी वाहतुकीत केले आहेत बदल...
1) कराड शहरातील कृष्णा नाका बाजुकडुन कराड शहरात सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाटकडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदिर – कमानी मारुती मंदीर- सोमवार पेठ पाण्याची टाकी- जनकल्याण बँक मार्गे सुरु राहणार आहे. तसेच सोमवार पेठ येथील नागरिक कराड शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
2) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक- आझाद चौक- सात शहीद चौक- शुक्रवार पेठ- बालाजी मंदीर या मार्गावरून वळविण्यात आली आहे.
3) दत्त चौक- यशवंत हायस्कूल- आझाद चौक- नेहरु चौक- चावडी चौक- बालाजी मंदीर- झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
4) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला आहे.
5) आपत्कालीन परस्थितीमध्ये नेहमीच मिरवणुक मार्गासाठी पर्यायी रस्ता कर्मवीर पतळा- पायल फुटवेअर- अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ ते नेहरु चौक या मार्गावरील दुर्तफा दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्कींग झोन करणेत आलेला आहे.
6) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने, पोलीस दलाची वाहने वगळुन इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल केलेला आहे.
No comments:
Post a Comment