वेध माझा ऑनलाइन। पाल ता. कराड येथे सुमारे 35 वर्षापूर्वी खून करून फरार असलेल्या एका संशयितास पोलिसांनी पकडले आहे. लाला सिद्ध्राम तेली असे संशयित आरोपीचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनव गावच्या भीमराव सिद्धाम तेली याचा त्याच गावातील बाळू सरगर, दत्तू यलमारे या लोकांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी खून केला होता त्याचा बदला म्हणून सिद्ध्राम तेली व त्याच्या काही सहकाऱ्यांनी मिळून दत्तू ज्ञानू यलमारे रा. पाल, ता. कराड याचा निर्घृण खून केला होता. त्याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. गुन्ह्यातील संशयित लाला सिद्ध्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान लाला सिद्धाम तेली हा त्याचे घरी आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून संशयितास त्याचे राहते घरातून मध्यरात्रीचे सुमारास पकडले
No comments:
Post a Comment