Saturday, August 31, 2024

महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला सुरुवात; पवार- ठाकरेंसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

वेध माझा ऑनलाइन।
आठ महिन्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा सुरु आहे. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा संपेन. यावेळी महाविकास आघाडीचे नेते संबोधित करतील.

शिवरायांच्या नावाचा जयजयकार….
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला आहे.

मविआचा मोर्चा का?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.

अजितदादा 60 जागांवर राजी ? कार्यकर्त्यांना कामाला लागा म्हणून दादांच्या सूचना...

वेध माझा ऑनलाइन।
जागा वाटपावरुन अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. 60 जागांवर कामाला लागा, असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणालेत. याआधी अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं, आता त्यामुळं आता दादा 60 जागांवर राजी झालेत का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कारण अजित पवारांनी उघडपणे 60 जागांचं गणित मांडून, कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात. 2019 च्या निकालानुसार राष्ट्रवादीचे 54, 3 अपक्षासह काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धीकी आणि सुलभा खोडके आपल्यासोबतच आहेत, असं अजित पवार म्हणालेत. मात्र आता चर्चा अशी आहे, 90 जागांवरुन दादा 60 जागांवर आलेत का? दरम्यान, महायुतीत सहभागी होताच, अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केल्यानं, विजय वडेट्टीवारांनी खिल्ली उडवलीय. 60 वरुन आता 40 वरही येतील, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत, 27 पैकी 19 मतदारसंघ असे आहेत. जिथं भाजपच्या उमेदवारांना पराभूत करुन राष्ट्रवादीनं विजय मिळवला. आणि हे 19 आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळं या 19 जागा पूर्णच्या पूर्ण दादांच्या राष्ट्र्वादी ला सोडणार का? हेच पहायच आहे

मलकापुर येथील हौसाई विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या वतीने,"ती उमलताना"या विषयावर डॉ सौ शैलजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान -

वेध माझां ऑनलाइन।
नुकतेच मलकापुर येथील हौसाई विद्यालय येथे इनरव्हील क्लब ऑफ कराड  यांच्या वतीने,"ती उमलताना"या विषयावर प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ शैलजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ सौ कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना स्पर्श या विषयावरील माहिती दिली "चांगला आणि वाईट स्पर्श" या मधील फरक अतिशय सोप्या भाषेत त्यानी समजून सांगितला. तसेच वयात येताना घ्यावयाची काळजी, याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. 

तसेच यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जीवन पवार यांनी "व्यवसायाच्या वाटा"याविषयीचे मार्गदर्शन केले तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भातदेखील त्यांनी मार्गदर्शन केले

याप्रसंगी प्राचार्य जीवन फुके, मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक, प्राचार्य जोशी मॅडम, कल्याण कुलकर्णी, पद्मावती पाटील, अंजना जानुगडे, ऋषिकेश पोटे, वीरभद्र खुरपे, रघुनाथ पाटील, विकास शिंगाडे, किरण कुंभार, महिंद्रा आंबवडे, साठे मामा आदि उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी

वेध माझा ऑनलाइन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले आहे. सोळा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे पकड वॉरंट जारी केलंय. महामंडळाची बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. याबाबतचे हे प्रकरण आहे. 

 न्यायालयात हजर रहावे लागणार 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. यापूर्वी ही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. सोळा वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड  केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी  2008 मध्ये  उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते.  वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख आणि इतर तीन जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचे काढलेले वॉरंट विना तामील झाले होते त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता.

पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रितसर वकिलामार्फत काल जामीन  मिळाला आहे. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.


राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका ; हर्षवर्धन पाटील यांचा अजितदादा पवारांना इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सध्या महायुतीत महाभारत सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

इंदापूर मतदारसंघावरून मोठा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. ज्यासाठी पक्ष सोडला त्याच मुद्द्यावरून पुन्हा पक्ष सोडण्याची वेळ हर्षवर्धन पाटलांवर आली आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतून इंदापूरात मोठी ताकद दाखवली. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.

मला अडाणी समजू नका- हर्षवर्धन पाटील
इंदापूर च्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही तालुक्यापूर्ती मर्यादित राहिली नाही. राजकीय वातावरणावर महाराष्ट्रात चर्चा आहे. इंदापूर तालुक्यात बदल होणार आहे, हे नागरिकांनी ठरवलं आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणालेत.
राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा खणखणीत इशाराच त्यांनी नेतृत्वाला दिला आहे. उद्याची निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आहे. उद्याच्या आमदारकीच्या निकालापेक्षा दहा वर्षे काही नसताना सोबत राहिली, ते निष्ठावन्त सोबत आहेत. म्हणून आज वेगळी ताकद निर्माण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अपमान सहन करणार नाही”
राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचं आहे. कुणाला कुठलं जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितलं. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असं अजित पवार म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केलं. इंदापूर च्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

सगळ्यांचे फोन येत आहेत. याचा अर्थ काय घ्याचा तो घ्या. मी कुणाला होकार दिलेला नाही. जी चर्चा लोकसभेच्या वेळी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी मैत्री आहे. त्यांना भेटणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं ; एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल ;क़ाय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून कडक शब्दात प्रतिक्रिया उमटली होती. या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट तानाजी सावंत यांना मुंबईला भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सावंत हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या बाजूला बसल्यावर उल्टी आल्यासारखं होतंय, असं विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्याने आणि सरकारमधील मंत्र्याने हे विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याचीच दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी सावंत यांना भेटायला बोलावलं असल्याचं समजतं. या भेटीत शिंदे यांच्याकडून सावंत यांना समज दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्या विधानावरून मीडियावरच खापर फोडलं. तुमच्या मीडियाने नेरेटिव्ह सेट केला आहे. तो चुकीचा आहे. त्या भाषणाची क्लिप परत ऐका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसताना उलटी होते हा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार 2022च्या अगोदर होतं. तुम्ही जे तोडमोड करून दाखवताना, जरा सदसदविवेकबुद्धीला जागून बातम्या द्यायला शिका. एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

पुण्यात धक्कादायक घटना ; 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील महिला आणि तरूणींवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या  अत्याचारांच्या घटनेनंतर रोज प्रत्येक जिल्ह्यामधून अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. अशाताच पुण्यातील घोरपडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील आरोपी अल्पवयीन मुलाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या आईने यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावरून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडी येथे हा सर्व प्रकार मार्च 2024 ते मे 2024 यादरम्यान घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

३ आमदार काँग्रेसला सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; स्वतः अजित पवारांनीच त्या आमदारांची नावे जाहीर केली

वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेतेमंडळी तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. कालच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी ३ आमदार काँग्रेसला सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. स्वता अजित पवारांनीच याबाबत माहिती देत सदर आमदारांची नावेच जाहीर केली आहेत. त्यामुळे काँग्रेस मध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.


मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आगामी प्लॅनयाबाबत सांगितलं. अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपल्याला ६० जागांवर तयारी करायची आहे. आपल्याकडे सध्या ५४ जागा आहेत, त्या तर आपण लढायच्याच आहेत. मात्र इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके हे सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत असं अजित पवारांनी म्हंटल. याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, करमाळ्याचे संजयमामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे लवकरच हे सर्व नेते जाहीररीत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
दरम्यान, महायुतीत आपल्याला ज्या काही जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असेही अजित पवारांनी म्हंटल. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या, डोळ्यात तेल घालून काम करा, हलगर्जी पणा करु नका, लोकसभेचं नरेटीव आपल्याला बदलायचं आहे अशा सूचना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बाहेर येऊन स्टेटमेंट द्या असं अजित पवारांनी सांगितलं आहे. अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेवर असून त्यांची गुलाबी थीम चांगलीच चर्चेत आहे.

Friday, August 30, 2024

भाजपमध्ये धुसफूस, पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईत महत्त्वाची बैठक, नेत्यांची नाराजी दूर होणार का ?

वेध माझा ऑनलाइन।
भाजपमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर जाहीर माफी मागितली आहे. मोदींनी शिवप्रेमींचीदेखील जाहीर माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी यांचा आजचा महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर मुंबईत भाजपच्या गोटात महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीत पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती असेल. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची आज संध्याकाळी मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भाजपचे महत्त्वाचे नेते आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित असतील. हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. राज्यातील इतर भाजप नेत्यांच्या नाराजीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत नेत्यांबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, किंवा बैठकीमधूनच भाजप नेत्यांना संपर्क केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


Thursday, August 29, 2024

माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे, रणजितसिंह देशमुख हेच उमेदवार असतील, ; आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा ;


वेध माझा ऑनलाइन।
देशाला आत्तापर्यंत काँग्रेसनेच तारले आहे. भविष्यातही काँग्रेसच तारेल. माणमध्ये नेतृत्व वाढविण्यात माझी चूक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार असून, रणजितसिंह देशमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पिंगळी येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार रामहरी रूपनवर, राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख, एम. के. भोसले, नकुसाताई जाधव, बाबासाहेब माने, संतोष गोडसे, बाळासाहेब माने, डॉ. महेश गुरव, जयवंत खराडे, विजय शिंदे, विष्णुपंत अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.


रणजितसिंह देशमुख म्हणाले, ”दुष्काळी माण-खटाव भागात पाणी आणणारे खरे जलनायक पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यामुळे सध्या या भागातून वाहणाऱ्या पाण्याचे श्रेय कुणीही लाटू नये.”यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, राजेंद्र शेलार, अजित चिखलीकर यांचीही भाषणे झाली. डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले. एम. के. भोसले यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब माने यांनी आभार मानले.

सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार ; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही...

वेध माझा ऑनलाइन ।
गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला यश आलं असं म्हणावं लागेल.

सरपंचाचे मानधन वाढावं, सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे, ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी मिळावा यांसारख्या विविध मागण्या करत अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरु होते. यानंतर सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंच्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत आंदोलनाला बसलेल्या सरपंच्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आठवड्यात मान्य करणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिलीय.

सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात , नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीच्या आधारे, “विद्यार्थी आत्महत्या: एक महामारी स्वीपिंग इंडिया” या नावाच्या अहवालात बुधवारी वार्षिक आयसी 3 परिषद आणि एक्सपो 2024 दरम्यान जाहीर करण्यात आले. या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांपेक्षाही विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आहे.


आयसी३ संस्था ही एक बिगर सरकारी संस्था असून जगभरातील शालेय शिक्षण संस्थांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. आयसी 3 इन्स्टिट्यूटने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दरवर्षी 4 टक्के दराने वाढत आहेत. जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. 2022 मध्ये, पुरुष विद्यार्थ्यांनी एकूण विद्यार्थ्यांपैकी 53 टक्के आत्महत्या केली. 2021 ते 2022 दरम्यान पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत 6 टक्क्यांनी घट झाली तर महिला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 7 टक्क्यांनी वाढल्या. (Student Suicides Report)

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूणच आत्महत्येच्या ट्रेंडला मागे टाकले जात आहे. गेल्या दशकात, 0-24 वर्षांच्या मुलांची लोकसंख्या 582 दशलक्ष वरून 581 दशलक्षांवर गेली आहे, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची संख्या 6,654 वरून 13,044 पर्यंत वाढली आहे, ”असे आयसी 3 संस्थेने संकलित केलेल्या अहवालात नमूद केले आहे. भारतात 15 ते 24 वर्षे वयोगटातील सातपैकी एका तरुणांना नैराश्य आणि असंतोषाची लक्षणे समाविष्ट आहेत. धक्कादायक म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी केवळ 41 % लोकांना आधार घेण्याची गरज वाटली. या अहवालात असे दिसून आलं आहे की महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत . देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येच्या प्रमाणात एक तृतीयांश आत्महत्या याच ३ राज्यात होत आहेत.दक्षिणेकडील राज्ये आणि युनियन प्रांतमध्ये विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण 29% आहेत.

स्मृति इराणी कडून राहुल गांधीचे कौतुक ; चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाइन।
काँग्रेसच्या कट्टर विरोधक आणि एकेकाळी थेट राहुल गांधी याना होमपीच असलेल्या अमेठीमधून पराभूत करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी आता चक्क त्याच राहुल गांधींचे कौतुक केलं आहे. आता राहुल गांधींचे राजकारण बदलले आहे. सध्या राहुल गांधी हे वेगळे राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो ही गोष्ट वेगळी असं स्मृती इराणी यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितलं. स्मृती इराणी यांनी पत्रकारांच्या पॉडकास्ट टॉप अँगल या कार्यक्रमात विविध विषयांवर थेट भाष्य केलं.

स्मृती इराणी म्हणाल्या, राहुल गांधी जातीच्या राजकारणातही ते अत्यंत जपून बोलत आहेत. राहुल यांनी संसदेत टी-शर्ट घातला तर तरुण पिढीला काय संदेश जाईल हे त्यांना माहीत आहे. यासोबतच त्यांनी भाजपला सावध करत राहुल यांनी उचललेले कोणतेही पाऊल चांगले, वाईट किंवा बालिश आहे, अशा गैरसमजात राहू नये, पण आता ते वेगळे राजकारण करत आहेत असं म्हंटल. स्मृती इराणी यांनी एकप्रकारे राहुल गांधी यांचे कौतुक केलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्यांमुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. सातत्याने गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून देशभरात त्यांची ओळख आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अमेठीच्या जनतेने स्मृती इराणी याना नाकारलं. भलेही याठिकाणी राहुल गांधी पुन्हा निवडणुकीला उभे राहिले नाहीत मात्र काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव करत 2019 मधील राहुल गांधींच्या पराभवाचा वचपा काढला.

मनोज जरांगे यांचा भाजपा च्या नेत्यांना इशारा ; कोंण आहेत हे नेते ?

वेध माझां ऑनलाइन 
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला वेढीस धरल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. अशातच आता मराठवाड्यातील भाजप नेत्याला सुद्धा त्यांनी थेट इशारा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यातील चिंता वाढली आहे. कारण रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली आहे. मी रावसाहेब दानवेंना आतापर्यंत दादा म्हणत होतो. मी नेहमी त्यांचा आदर करत आहे. मात्र त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आत्ता केली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी रावसाहेब दानवेंना थेट इशाराही दिला आहे.

येत्या विधानसभेला तुमचं कोणी तरी उभं राहील ना मग दाखवतो कचका. त्यामुळे कर कुणालाही उभं, असं इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी आणि विषय लांबवू नये. तसेच नागपूरची देखील सीट पण पडत असते, याशिवाय मला जेल मध्ये टाकले तर पोर हनुमान सारखे जेल उचलून आणतील. तर मी भोकरदनमध्ये देखील ऑफिस उघडतो असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

भोकरदन या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे निवडून आले आहेत. मात्र आता तुम्हाला देशोधडीला लावतो. रावसाहेब दानवे यांनी माझ्या नादाला लागु नये. तसेच माझ्यावर केस करायला लावली, आता तुझे कोणी उभे राहिले ना दाखवतो कचका काय असतो असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगेच्या या इशाऱ्यामुळे भोकरदन मतदारसंघात देखील टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार याकडे संपूर्ण राज्यच लक्ष असणार आहे.


छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब - आ. पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाइन।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यामातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्दघाटनचा घाट घातला. त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला. महाराष्ट्राच्या अस्मीतेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे त्या विरोधात राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चीत करावी. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरातील दत्त चौक येथे केली.

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्या घटनेच्या विरोधात आज शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर कॉग्रेसतर्फे आंदोलन झाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवकचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे झाकीर पठाण, माजी नगरसेवक अशोक पाटील, विद्याताई थोरवडे, दिग्विजय पाटील, नाना जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीच्या सरकारच करायच काय खाली डोकं वर पाय, हटा हटा दो बांधकाम मंत्री हटा दो, भष्ट्राचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाय हाय, भष्ट्राचारी भाजप सरकारचा निषेध असो, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तब्बल तासभर ठिय्या मारून बसले होते. त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी त्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. आमदार चव्हाण म्हणाले, मालवण येथे पुतळा उभारण्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होते. त्या पुतळ्याच्या माध्यमातून भाजपला लोकसभा निवडणूकीआधी इव्हेंट करायचा होता. राज्यातील मते मिळविण्याची खटपट त्यामागे होती. मात्र असे निकृष्ठ काम केल्याने आज त्याचा विपरीत परिणाम दिसतो आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ केल्याचे उघड झाले आहे. छत्रपती हे संबंध हिंदुस्थानचे दैवत आहेत त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध नोंदवित राज्यभर आंदोलन करणार आहोत. आमचे काही सहकारी मालवण येथे परिसराची पाहणी करायला गेले आहेत. ते परतले की, आंदलनाची पुढची दिशा निश्चीत करण्यात येईल. नौदल दिना दिवशीच छत्रपतींचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उभा करण्याची घाई केली गेली. मुळ निवीदेत किती दिवसांचा कालवधी होता. त्या दिवसाआधी काम पूर्ण झाले का, त्यासाठी कसले साहित्य वापरले असें अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचा जाब सरकारला विचारलाच पाहिजे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्याच्या अस्मितेवर घाला घातला आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने भ्रष्टाचारी सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे.

तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार झाला आहे. वास्तविक नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला गेल्याची आमची माहिती आहे. तो पुतळा नौदलाच्या जागेत असला तरी त्याची जबाबादारी राज्य शासनाकडे आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय करत होते, याचाही खुलासा होण्याची गरज आहे. पुतळा उभारण्याचा कालावधी किती होता, स्ट्रक्चर कुणी आणि का बदलले याचीही माहिती जनतेला देण्याची गरज आहे. या साऱ्या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे. नौदल जबाबदार असेल तर त्याची नैतिक जबाबादारी स्विकारून संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी त्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे.
 वेध माझा ऑनलाइन।
रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजवर उतरायचे होते. मात्र, चालकाने तेथे रिक्षा न थांबवता पुढे नेली. त्याचवेळी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली. विद्यानगर-कराड परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबधीत रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करीत असल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगीतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून तीन मुली रिक्षातून विद्यानगर येथील कॉलेज परिसरात निघाल्या होत्या. त्यातील दोघी गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात उतरल्या. तिसरी मुलगी आयटीआय कॉलेजकडे जानाऱ्या रस्त्यावर उतरणार होती.
मात्र, तेथे गेल्यानंतर चालकाने त्या थांब्यावर न थांबता रिक्षा तशीच पुढे नेली. माझा स्टॉप आला आहे, रिक्षा थांबवा, असे त्या मुलीने सांगूनही त्याने रिक्षा थांबवली नाही. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने ओरडत रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेतली. रिक्षातून उडी मारल्याने मुलीला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरीक त्याठिकाणी जमले. घटनेची माहिती समजताच पोलिसही तेथे पोचले. त्यांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक ठाकूर, पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अजितदादा तिसरी आघाडी करतील : या आघाडीत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष असण्याची शक्यता ;रोहित पवारांचे विधान :

वेध माझा ऑनलाइन।
दिल्लीचे नेते मतं खाण्यासठी काही पक्षांना उभं करतात.तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनिती आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. ते पुढे असेही म्हणाले की, अजित दादांच्या भूमिकेवरून वाटतं की, ते तिसरी आघाडी करतील तर या तिसऱ्या आघाडीत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष देखील असण्याची शक्यता असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. 

या तिसऱ्या आघाडीचं काम मते खायची असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेतायेत. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला तर या तिसऱ्या आघाडीत मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील, असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.

शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झाललेी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.  
या सर्व पार्श्वभूमीवर आज (29 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकदा नव्हे, तर शंभरवेळा शिवरायांची माफी मागायला तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शिवरायांची एकदा नवे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाकडून महाराजांचा पुतळा बनवला आला होता. काल झालेल्या बैठकीला सरकारमधील मंत्री तसेच नेव्हीचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये नेव्हीचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. 


पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा : तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि साहित्य जप्त :

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

का उभारले बनावट टेलिफोन एक्सचेंज
पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपणीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
कुठे सुरु होता प्रकार
कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड एटीएसला मिळाले. तसेच सात सिम बॉक्स, वायफाय इतर साहित्य पोलिसांना मिळाले. कोंढव्यात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Wednesday, August 28, 2024

सध्या कोयना धरणात किती टीएमसी पाणीसाठा...



वेध माझा ऑनलाइन ।
सध्या कोयना धरणामध्ये एकूण १०३.४०(98.24) टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान आज सकाळी ६:०० वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फूटावर उघडून सांडव्यावरून ३०,९५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

दरम्यान पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

अजित पवारांनी मागितली महाराष्ट्राच्या जनतेची माफी ; क़ाय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हणत अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या  जनसन्मान यात्रेदरम्यान  लातूरच्या   सभेवेळी गोंधळ झाला. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर काही मराठा आंदोलक आले आणि त्यांनी अजित यांना भूमिका स्पष्ट करायला सांगितलं. हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळी हा प्रकार घडला. अजित पवार  बोलत असताना काही मराठा कार्यकर्तांनी गोंधळ केला. अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची  भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणांवरुन महिलावर्गात चांगलाच रोष आहे.  लातूरात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली. अजित पवारांच्या भाषणावेळी एका महिलेने भर सभेत उठून 'दादा महिलांना सुरक्षा द्या' अशी मागणी केली. 


अजित दादांना धक्का?; राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये ;

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित निकाला पाहायला मिळाला, तर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा करिश्मा दिसून आलं. त्यामुळे, लोकसभेला महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून शरद पवारांकडे विधानसभा निवडणुकांसाठी अनेक नेतेमंडळी जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, काही नेते शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत. इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वी परभणीत बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता, अजित पवार यांच्या गटातील आमदाराने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत कारमधून एकत्र प्रवास केला.  

सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, शरद पवारांची या जिल्ह्यावरील पकड आजही कायम आहे. त्यामुळेच, लोकसभा निवडणुकीत ऐनेवळी मोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. माढ्याचे बबन शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने दोघेही अजित पवारांसमवेत आहेत. मात्र, आज यशवंत माने यांनी सुप्रिया सुळेंसोबत एकत्र प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  

मोहोळचे आमदार यशवंत माने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर यांच्या वडिलांचे काल निधन झाले. त्यांच्या घरी सुप्रिया सुळे सांत्वन भेटीसाठी गेले होत्या. त्यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने देखील तिथेच होते. या सांत्वन भेटीनंतर सुळे आणि आमदार यशवंत माने यांनी भिगवण ते बारामती असा एकाच कारमधून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटातील काही आमदार शरद पवारांकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा सातत्याने होत असते. तर, जयंत पाटील व रोहित पवार यांच्याकडून या वृत्तांना दुजोराही दिला जातो. त्यातच, आजही ही भेट ठरवून होती की अचानक झाली, याचीही चर्चा आता होत आहे. कारण, अजितदादांचा आमदार थेट सुप्रियाताईंच्या कारमध्ये बसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

शरद पवार गटाचं टेन्शन वाढल? भाजपने केली खेळी, विनोद तावडे पोहोचले सांगलीत बड्या नेत्याच्या घरी ;

वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजपला मोठा झटका दिलाय. कारण भाजपचे कागलचे नेते समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात वळवण्यात शरद पवार गटाला यश मिळताना दिसतंय. त्यामुळे भाजपकडून शरद पवार गटाला पोखरण्याचं काम सुरु झालं आहे. भाजप शरद पवार गटाकडून कागलचा वचपा काढणार का? ते आगामी काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण सांगलीत आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगतील शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची भेट घेतली आहे.

भाजपाचे नेते तथा माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे. विनोद तावडे यांनी शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवाजीराव नाईक भाजपाच्या वाटेवर?
काही वर्षांपूर्वीच माजी मंत्री आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज शिवाजीराव नाईक यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेटीमुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपाच्या वाटेवर तर नाहीत ना? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

Tuesday, August 27, 2024

कराड़मध्ये नवनिर्वाचित खासदार नितिन पाटील यांचे यादव बन्धुनी केले जंगी स्वागत ; डीजेचा ताल आणि जेसीबीने पुष्पवृष्टि ; नितिन पाटील गेले भारावून;

वेध माझां ऑनलाइन।
कराडातील अजितदादा पवार गटाचे युवा नेते विजयसिंह यादव व त्यांचे बन्धु यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना नेते राजेन्द्रसिंह यादव यांच्या वतीने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नितीन पाटील यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले  त्यांचे आगमन होताच येथील दत्त चौकात जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टि करण्यात आली त्यावेळी नितिन पाटील अक्षरशः भारावून गेल्याचे दिसले


सातारा जिल्ह्याचे दूसरे खासदार म्हणून ज्यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे ते जिल्हा बैंकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधु नितिन पाटील यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्यानंन्तर... आज ते पहिल्यांदा येथील स्व यशवन्तराव चव्हाण साहेबांच्या समाधिस्थली नतमस्तक होण्याकरिता आले होते... त्यांचा गाड्यांचा ताफ़ा शहरातील दत्त चौकात थाम्बला... त्यावेळी युवा नेते विजयसिंह यादव व राजेन्द्रसिंह यादव मित्र परिवारातर्फे त्याचे डी जे च्या तालावार  वाजत-गाजत मोठ्या दिमाखात जंगी स्वागत करण्यात आले... विजय यादव यानी खासदार नितिन पाटील यांना आलिंगन देताच नितिन पाटील यांच्यावर जेसीबी च्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला... या वर्षावाने न्हावुन जात नवनिर्वाचित खासदार नितिन पाटील अक्षरशः भारावून गेले... त्यावेळी त्यांचे समस्त यादव मित्र परिवाराच्या वतीने जोरदार अभिनंदन करण्यात आले...उपस्थित हितचिंतकांशी हस्तांदोलन करत खासदार नितिन पाटील यांनी सर्वांचे त्याठिकानी आभार मानले...आणि त्यानन्तर खासदार पाटील यांचा ताफ़ा स्व चव्हाण साहेबांच्या दर्शनासाठी प्रितिसंगम घाटाकडे रवाना झाला...