Friday, August 2, 2024

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सजग पालक मंच कराडात पालकांशी विविध विषयांवर होणार चर्चा ;



वेध माझा ऑनलाइन।
मागील काही वर्षापासून मुलांची सर्वांगिण वाढ, आहार, व्यायाम, संगत यासह पालकांशी असणारा त्यांचा भावनिक बंध यावर आवश्यक त्या प्रमाणात चर्चाच होत नाही. त्यामुळेच आज अनेक बाबतीत पालकांशी चर्चा करणे. तसेच त्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन होणे काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या पुढाकारातून कराडमध्ये सजग पालक मंच स्थापन करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या पुढाकाराने सुरू होणार्‍या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारपरिषदेस सौरभ पाटील यांच्यासह डॉ. अनिल लाहोटी, डॉ. राहुल फासे, राहुल पुरोहित, अमोल पालेकर, सौ शिवानी भाटे, सौ प्रतीक्षा राकेश शहा, सौ अर्चना मुंढेकर, राघवेंद्र कोल्हापुरे राकेश शहा, श्री वास्के आदि मान्यवर उपस्थित होते.

सौरभ पाटील म्हणाले, पालकत्व हा जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व परिवर्तनकारी अनुभव असतो. मूल जन्माला येण्यापासून त्याच्या सर्वागिण विकासापर्यंत पालकत्वाच्या प्रवासात अनेक आनंददायी क्षण येतात. मात्र आज धावपळीच्या युगात पालकत्व आणि मुलांची सर्वांगिण वाढ यांचे संदर्श वेगाने बदलत आहेत. मुलांचा आहार, शिक्षण, मोबाईल वापराचे लागलेले वेढ, मैदानी खेळांबाबत उदासिनता, व्यायाम, संगत यासह आरोग्याकडे होणारे दुर्लंक्ष असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गंभीर प्रश्नांसोबतच पाल्याचा आई - वडिलांशी असणारा भावनिक बंध सुद्धा कमी होत चालल्याची जाणीव अनेकदा होते. त्यामुळे याबाबत पालकांशी विविध विषयावर चर्चा होण आवश्यक असून ती काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर तज्ञांकडून मार्गदर्शन होणे आवश्यक वाटते. वयाच्या विविध टप्प्यांवर मुलांना पालकांची वेगवेगळ्या प्रकारची गरज असते आणि यासाठीच सजग पालक मंच काम करणार असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.
यावेळी दो राहुल फासे, जगन पुरोहित, शिवानी भाटे, अर्चना मुंढेकर यांनीही आपले मत मांडले. 


No comments:

Post a Comment