Thursday, August 8, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सातारा दौऱ्यावर; विधानसभा निवडणूक महिन्याभरात ;फडणवीस क़ाय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष ;


वेध माझा ऑनलाइन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा उद्या दिनांक 9 रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा निवडणूक महीनाभरात !
निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यकारणीमधील अंतर्गत खदखद अजूनही संपलेली नाही. माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून राजकीय हल्ले होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचा मुहूर्त साधून साताऱ्यात येत आहेत. भारतीय जनता पार्टीने जय जवान हाऊसिंग सोसायटीमध्ये 42 गुंठे जागा भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयासाठी राखीव ठेवली होती. या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे. त्यानंतर प्रतापसिंह शेती शाळेसमोरील मोकळ्या जागेमध्ये नवीन प्रांत आणि तहसीलदार कार्यालय उभारणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने प्रस्तावित आहे त्याही कार्यक्रमाचा नारळ ऑनलाईन फुटणार आहे.शिवराज पेट्रोल पंप नजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचा इमारतीचा नारळ फडणवीस यांच्या हस्ते फुटणार असून त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होणार आहे.या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत 

No comments:

Post a Comment