वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. कुठून कुणाला उमेदवारी द्यायची यांची गणितं आता मांडली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये एकाचवेळी फडणवीस आणि अजित पवारांना धक्का देण्याचा प्लॅन केल्याचं बोललं जातंय. जित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेक मेट देण्यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या समरजित घाटगेंनाच ऑफर दिल्याची चर्चा रंगतेय.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार त्यांचे प्रत्येक पाऊल आर या पार अशा आवेगानंच टाकताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरशी यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीने प्रत्येक चाल चालताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचं बोललं जातंय. कारण, तिथून लढण्यासाठी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित घाटगे यांना गळ घातल्याची माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेक मेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे.
कशी आहे समरजित घाटगेंची कारकीर्द?
सीए असलेले समरजित घाटगे 2019 साली भाजपात आले. समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. पण, 2019 साली सेना-भाजप युतीमुळे तिकीट मिळालं नाही. त्यामुळे विधानसभेला बंडखोरी करत हसन मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले. पण, त्यांचा पराभव झाला. मात्र, पहिल्या निवडणुकीत 90 हजार मतं मिळवत त्यांनी लक्ष वेधलं आता शरद पवार गटाने समरजित घाटगेंना मैदानात उतरवण्याचा प्लॅन केल्याचं समजतंय.
No comments:
Post a Comment