वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रासह 13 राज्यांवर आधीची देयकं न दिल्यामुळे लोडशेडिंगचं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्र, तामीळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, मिझोराम, झारखंड, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांना आधीची बिलं न भरल्यामुळे पॉवर एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विजेची खरेदी आणि विक्री करता येणार नाही, अशी माहिती आहे.
विजेची खरेदी विक्री न करता आल्यामुळे विजेचा तुटवडा भासला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाने बिल न भरणाऱ्या डिसकॉम आणि जेनको यांच्याबाबत केलेल्या नियमांमुळे या राज्यांना विजेचा तुटवडा जाणवू शकतो. 19 ऑगस्टपासून उर्जा मंत्रालयाचा लेट पेमेंट सरचार्ज म्हणजेच एलपीएस नियम लागू होणार आहे. एलपीएस नियमानुसार डिसकॉमनी मागच्या 7 महिन्यांचे बिल जेनकोंना दिलं नाही तर त्यांना पॉवर एक्सचेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वीज खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. या नियमामुळे 13 राज्यांच्या डिसकॉमवर कारवाईची टांगती तलवार आहे. डिसकॉमकडून मोठ्या प्रमाणावर बिलं भरली न गेल्यामुळे निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.एक डझनपेक्षा जास्त राज्यांची बिलं अजूनही भरण्यात आलेली नाहीत, या 13 राज्यांचे जवळपास 5,085 कोटी रुपयांचं बिल देणं बाकी आहे.
No comments:
Post a Comment