Saturday, August 20, 2022

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन - युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात जाणार आहेत पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रा दौरा आज दुपारच्या दरम्यान धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना आणि युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.  शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून हे बॅनर फाडल्याचा प्रकार घडला आहे. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत.  या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. 

No comments:

Post a Comment