वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहर व कराड दक्षिण, उत्तर भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ जयकुमार गोरे व डॉ अतुलबाबा भोसले यांच्या सह शहर व तालुक्यातून बहुतांशी पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर तिरंगा रॅली येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून सुरू झाली दत्त चौक आझाद चौक नेहरू चौक मार्गे ही रॅली कमानी मारुती पांढरा मारुती चौकातून विजय दिवस चौकामार्गे दत्त चौकातून कारवेनाका या ठिकाणी आली
यावेळी भारत माता की जय...वंदे मातरम... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला...यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले...
यावेळी डॉ अतुलबाबा बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा अभियान संपूर्ण देशात राबवून जगात भारताचा स्वाभिमान उंच केला आहे देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यानी आपले प्राण गमावले त्याचे स्मरण यानिमित्ताने संपूर्ण देशात केले जात आहे पुढच्या पिढीला यानिमित्ताने याबाबत माहिती होण्यास मदत होणार आहे आजचे हे अभियान यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले
यावेळी जिल्हाध्यक्ष आ जयकुमार गोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे देश प्रेम जागृत व्हावे नव्या पिढीला देश स्वातंत्र्याबद्दल अधिक माहिती व्हावी तसेच देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे हा मुख्य उद्देश या संकल्पनेतून साकार होणार आहे या संकल्पनेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय मी स्वतः कराड सातारा वाईसह संपूर्ण जिल्ह्यातून अशा रॅलीतून सहभागी होत आहे असेही यावेळी जयकुमार गोरे यांनी सांगितले
उमेश शिंदेंची तत्परता...
आज भाजप ची तिरंगा रॅली पार पडली यावेळी जयकुमार गोरेसह शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते... या ठिकाणी बराच काळ डॉ अतुल भोसले दिसत नव्हते आणि त्याविषयी चर्चा देखील पत्रकारांच्यात सुरूही होती... तेवढ्यात डॉ अतुलबाबा यांची गाडी दत्त चौकात आली मात्र त्यावेळी ही रॅली दत्त चौकातून पुढील मार्गावर निघून गेली होती... मात्र उमेश शिंदे यांना डॉ अतुलबाबा त्याठिकाणी आल्याचे समजले... अतुलबाबा याना रॅलीत जॉईन व्हायला दुचाकी उपलब्ध नव्हती हे देखील शिंदे यांच्या लक्षात आले... तेव्हा ते रॅलीतून पुन्हा मागे फिरून आले त्यांनी अतुलबाबाना आपल्या दुचाकीवर घेत त्यांना रॅलीला जॉईन करून दिले... नंतर अतुलबाबा रॅलीत जॉईन होऊन आ जयकुमार गोरे यांच्या दुचाकीवर स्वार झाले... उमेश शिंदेंनी दाखवलेली ही तत्परता यावेळी चर्चेत राहिली
No comments:
Post a Comment