वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे आणि भाजपचे एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. नवं सरकार स्थापन होवून आता एक महिन्याचा काळ उलटला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार कोसळून आणि नवं सरकार स्थापन होवून अवघे 50 दिवस होत नाही तेवढ्यात गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली आहे. अनंत करमुसे प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मानधिकार आयोगाने आव्हाडांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड याप्रकरणी काय प्रतिक्रिया मांडतात, त्यानंतर मानवाधिकार आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
No comments:
Post a Comment