वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे गटातील शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. भावना गवळी यांनी फेसबुकवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधतानाचा फोटो पोस्ट केलाय. त्याशिवाय एक मेसेजही लिहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भावना गवळी यांच्यामध्ये यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
अनेक वर्षापासून पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छोटी बहिण या नात्याने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी राखी बांधतात. यंदाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून आपलं बहीण भावाचं वेगळे नाते जपले. यावेळी कौटुंबिक विचारपूसेसह मतदासंघांच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा झाल्याच कळते. दरम्यान, ईडीने गवळींना नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मोदींसोबतचे हे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले आहे.
No comments:
Post a Comment