Thursday, August 18, 2022

कराड पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजपने काढलेल्या रॅलीच्या शक्तीप्रदर्शनाने स्पष्ट केली कराडकरांची मानसीकता ? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन - येथील पालिकेची निवडणूक थोड्याच दिवसांवर येऊन ठेपली आहे ही निवडणूक काँग्रेस व भाजप कडून पक्षीय स्तरावर लढली जाणार आहे तर काहीजण आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतील असे चित्र असणार आहे मात्र जनतेला ही निवडणूक कशी हवी आहे याचाही कानोसा घेणे आता गरजेचे आहे शिवजयंती व 15 ऑगस्ट रोजी शहरात पार पडलेल्या रॅलीमधील गर्दीने भाजप - काँग्रेसमधेच या निवडणुकीतून प्रमुख लढत होईल की काय ? अशी शंका निर्माण केली आहे...त्याचेही कारण आहे...!

आजपर्यंत शहरात आघाडी चे राजकारण सुरू आहे मात्र याच तालुक्यातील मलकापूर असेल किंवा राज्यस्तरीय झालेले पदवीधर चे ईलेक्शन असेल या दोन्ही स्तरावर निवडणुकीत पक्षीय लेव्हलवर लोकांची मतदानासाठी पसंती दिसून आली आहे याचाच अर्थ ग्रामीण किंवा शहरी पदवीधर मतदार हा आता पक्षीय राजकारणाकडे आकर्षित होत असल्याचे यातून दिसून येतय
ग्रामपंचायत असो, पंचायत समिती नगरपरिषद जिल्हा परिषद असो अशा ठिकाणीदेखील सध्या हीच पद्धत पुढे होताना दिसत आहे...

कोणत्याही पक्षीय धोरणांमध्ये विचारधारेला महत्व असते... म्हणजेच प्रत्येक  राजकीय पक्ष आपल्या विचारधारेशी बांधील असतो... त्यामुळे लोकांना कोणती विचारधारा निवडायची आणि मतदान करायचे याचाही चॉईस असतो...
आघाडीच्या राजकारणामध्ये व्यक्ती सापेक्ष मूव्हमेंट होतात... त्यामध्ये व्यक्तीकडे बघून मतदान व्हावे अशी अपेक्षा असते... त्याच प्रकारचे राजकारण आजपर्यंत येथे होत गेले आहे मात्र गेल्या काही टर्म पासून याच ट्रेंड ला बदलण्याची मानसिकता लोकांची दिसते आहे याचाच परिणाम म्हणून थेट लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडताना लोकांचा प्रतिसाद पक्षीय लेव्हलवर मिळताना दिसतोय... यामध्ये स्थानिक आघाडीला लोक पसंत करताना दिसत नाहीत... आघाडीच्या राजकारणात एका विशिष्ठ व्यक्तीचा विचार लादण्याचा काहीसा प्रकार अनेक ठिकाणी होताना दिसून येत असतो मात्र पक्षीय पातळीवर असे चालत नाही... तर पक्षीय विचार त्या व्यक्तींनी आपल्यात व समाजात रुजवावा लागतो असे होऊन जो लोकांना पटतो तो पक्ष निवडून येतो... अशी साधारण पद्धत असते

कराड शहराची मानसिकता पहायची झाल्यास शिवजयंती व 15 ऑगस्ट या दिवशी अनुक्रमे भाजप व काँग्रेस ची रॅली निघाली... त्यामधून या दोन्ही पक्षाचे शक्तिप्रदर्शन झाले... दोन्ही पक्षांना  जनतेचा हजारोच्या संख्येने प्रतिसाद मिळाला तर, दुसरीकडे 15 ऑगस्ट दिवशी इतर अनेक रॅली देखील झाल्या त्यातूनही निवडणुकीच्या तोंडावर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही झाला...  मात्र या दोन पक्षांच्या तुलनेत त्यामधून लोकांची गर्दी तितकीशी दिसली नाही... म्हणजेच काँग्रेस व भाजप या दोन विचारधारेकडे लोकांनी आपापल्या चॉईस ने गर्दी केली, त्यातूनच पक्षीय लेव्हलवर येथील निवडणूक व्हावी हीच मानसीकता लोकांची होणाऱ्या पालिका निवडणुकीला आहे का? असा शहराला प्रश्न पडला आहे...
लोकांना सध्या निवडणुकीबरोबर नेत्यांकडून विश्वासही हवा आहे आघाडीच्या राजकारणात तो सध्यातरी दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत... म्हणजेच आज  एकमेकांना विरोध करणारे उद्या एकाच स्टेजवर एकमेकांसाठी मते मागताना दिसतात... एवढे  विचारशून्य राजकारण राज्यात अनेक ठिकाणी होताना दिसते... आणि  हेच लोकांना नको आहे... लोक आता शहाणे झाले आहेत... सोशल मीडियामुळे लोकांच्यात विचार जागृति निर्माण होऊन काय चांगले -वाईट लोकांना कळू लागलंय त्यामुळे विचारांशी बांधील राजकारणाची लोक अपेक्षा करत आहेत...आणि म्हणून पक्षीय पातळीवरील निवडणुकीचा पर्याय लोकांनी निवडला आहे ? अशी चर्चा आहे...त्यासाठी कराडात भाजप -काँग्रेसच्या निघालेल्या रॅलीतून  त्या - त्या विचारधारेच्या लोकांनी केलेल्या गर्दीने येथील पालिका निवडणुकीसाठी पक्षीय निवडणूक हवी असल्याचा मेसेज शहराला दिला आहे का ? असाही प्रश्न जाणकारांना पडला आहे...

No comments:

Post a Comment