Saturday, August 13, 2022

बच्चू कडू हा आमचा विषय नाही...ते आमच्या पक्षाचे नाहीत...मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर मंत्री सुरेश खाडेंनी हात झटकले...

वेध माझा ऑनलाइन - आज संध्याकाळी किंवा उद्या राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप होण्याची शक्यता आहे दरम्यान मंत्रीपद न मिळाल्याने सरकारमधील सहकारी मित्रपक्षाचे बच्चू कडू नाराज आहेत याबाबत बोलताना ... ते आमच्या पक्षाचे नाहीत...तो आमचा विषय नाही... असे सांगत कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेले सुरेश खाडे यांनी आज येथे याप्रश्नी आपले हात झटकले...

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्री सुरेश खाडे मिरजेला जात असताना येथील पंकज हॉटेल येथे काही काळ थांबले असता कराडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते

शिंदे गटात सामील असलेले आमदार बच्चू कडू हे मंत्रिपद न मिळाल्याने सध्या नाराज असल्याच्या बातम्या आहेत...मंत्रीपद आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” हे सरकार मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही.
अशा शब्दात त्यांनी याबाबतची नाराजी माध्यमांसमोर उघड करून पुढील महिन्यात होणाऱ्या "विस्तारात' आम्हाला संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे...असे असताना आज मंत्री खाडे यांनी बच्चू कडू यांचा विषय आमचा नाही...ते आमच्या पक्षाचे नाहीत...असे म्हणत या प्रश्नी आपले हात झटकले आहेत...

एकीकडे आमदार बच्चू कडूसह अनेकांना दुसऱ्या टप्यात संधी मिळेल अशा समजुतदार भूमिकेत वरिष्ठ भाजप नेते दिसत असताना... मंत्री खाडे यांनी याविषयी... तो आमचा विषयच नाही असे उडते उत्तर दिले...याचा अर्थ काय घ्यायचा.?... अशी चर्चा आता सुरू आहे...

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सध्याच्या या राज्यसरकारच्या भविष्यबद्दल काही दिवसांपूर्वी भाकीत केले होते...या सरकारमध्ये मंत्रिमंडळ निर्मितीवेळी धुसफूस होऊन हे सरकार पडेल... आणि मध्यावती निवडणुका होतील...असे दोन्ही काँग्रेसचे नेते म्हणाले होते... आणि तशीच परिस्थीती भविष्यात निर्माण होते की काय...? अशी भीती यानिमित्ताने व्यक्त होताना दिसतेय...

दरम्यान पंकजा मुंढे याना नक्कीच संधी मिळेल
त्यांचे दिल्लीत मोठं काम आहे...सध्या त्यांना पक्षाची जबाबदारी आहे... शिंदे गटाचे संजय राठोड यांच्या मंत्रीपदाबाबचा निर्णय हा सर्वस्वी मित्र पक्षाचा आहे...मात्र आम्ही ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही...अशांना मंत्रीपद देण्याचा प्रयत्न केला आहे...असेही मंत्री खाडे यावेळी म्हणाले... 

भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर  ईडी चौकशी थांबते...तो आमदार मग स्वच्छ कसा होतो... असा विरोधक प्रश्न विचारतात ...याबाबत मंत्री खाडे यांनी समर्पक उत्तर न देता गोलगोल उत्तर देत वेळ मारून नेली...तसेच ईडी चौकशीत सध्या जे ताब्यात आहेत, ते आता लवकर बाहेर येणार नाहीत... असे भाकीतही मंत्री खाडे यांनी आज येथे बोलताना करून टाकले...

दरम्यान, यावेळी मंत्री सुरेश खाडे यांचे कराड शहर,कराड उत्तर, कराड दक्षिण भाजप मंडलाच्या वतीने येथील पंकज हॉटेल येथे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले 
यावेळी सातारा जिल्हा संयोजक विक्रम पावसकर,  शहराध्यक्ष एकनाथ बागडी,माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, झेडपी सदस्य सागर शिवदास,भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, भरत देसाई, उमेश शिंदे, भूषण जगताप,कराड शहर उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष मुकुंद चरेगावकर, उपाध्यक्ष उमेश शिंदे, नितीन वास्के,अल्पसंख्याक आघाडी, अध्यक्ष नितीन शहा, महिला आघाडी सौ. अनघा कुलकर्णी, सौ. सारिका गावडे,सौ. राधिका पन्हाळे माजी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे,,सौ.सुमन बागडी, कामगार आघाडी विश्वनाथ फुटाणे, भूषण जगताप ,गणेश कापसे आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment