Saturday, August 13, 2022

कराडात युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने उद्या तिरंगा रॅलीचे आयोजन ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा...प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू पाटसकर यांचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता येथील युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने तिरंगा रॕलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू पाटसकर यांनी दिली आहे

सदर रॅली दत्त चौक- येथून सुरू होऊन आझाद चौक मार्गे चावडी चौक येथे येणार आहे  त्यानंतर चावडी चौक येथे आजी-माजी सैनिकांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता होणार आहे

सदर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment