Sunday, August 21, 2022

उद्धव- राज एकत्र येणार...? शर्मिला ठाकरेंच सूचक विधान...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा काहीसा सूर काही कार्यकर्त्यांकडून येत होता. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? हा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, "साद घातली तर येऊदेत." त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं असून राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार घेऊन शिवसेनेला बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता शिवसेना आपली संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होतं. या चर्चेविषयी विचारले असता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी, "त्यांनी साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य केलं.

No comments:

Post a Comment