आज सोमवार दि.१५ आॅगस्ट रोजी स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षाच्या दैदिप्यमान वाटचालीस अभिवादन करण्यासाठी येथील यशवन्त आघाडी च्या वतीने शहरांतील प्रमुख रस्त्यावरून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
महात्मा गांधी पुतळा येथून सदर रॅलीस प्रारंभ झाला कोल्हापुर नाका येथुन सुरु झालेली ही रॅली शाहु चौक, दत्त चौक,आझाद चौक, चावडी चौक,मार्गे जोतिबा मंदिर, डाॅ.आंबेडकर पुतळा, महात्मा जोतिबा फुले पुतळा अशा मार्गे जाऊन शहरातील हेड पोस्टाजवळ गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आली असता त्याठिकाणी राष्र्टगीत झाले आणि या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी
देशभक्तीपर गीतांनी तसेच भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता
त्यानंतर गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या हस्ते बाळासाहेब देशमाने (कॅप्टन ), बाजीराव मोरे, संभाजी यादव, दत्तात्रय देसाई , मन्सूर नदाफ , माणिक जुजार, चंद्रकांत साठे, देवाप्पा मोरे या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला
यावेळी गटनेते यादव म्हणाले...आपल्या तन- मनाने देशासाठी सेवा करणाऱ्या या सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य आज लाभले याचा खूप अभिमान वाटतोय
याप्रसंगी सि ओ दिलीप गुरव, विजयसिंह यादव, माजी नगरसेवक हणमंतराव पवार,
विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, माजी नगरसेविका सौ हुलवान तसेच निशांत ढेकळे, ओमकार मुळे, राहुल खराडे, विष्णू पाटसकर, बापू देसाई, गणेश आवळे, नरेंद्र लिबे, नुरल मुल्ला, फिरोज मुल्ला,अण्णा थोरात,प्रवीण यादव, विनोद शिंदे सुधीर एकांडे, सचिन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment