वेध माझा ऑनलाइन - बिहारमध्ये सत्ताबदलाबरोबरच राजकीय हालचाली अधिक वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेऊ इच्छित आहेत, तर भाजप हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दोन्ही पक्षांना वाटते की, मागासांना प्राधान्य देऊन निवडणुकांना सामोरे गेल्यावर भाजपवर चांगली मात करता येईल व स्थिर सरकार देता येईल; परंतु हा निर्णय घेण्याआधी ते सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची अधिसूचना जारी करू इच्छित आहेत. महागठबंधन सरकार स्थापन होताच १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली होती, तर नितीशकुमार यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील भाषणात २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते.
यापूर्वी २०१५ मध्ये या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या होत्या व काँग्रेससह १७८ जागा जिंकून ४८ टक्के मते मिळवली होती. तेव्हा भाजपला २४ टक्के मते घेऊन ५३ जागा जिंकता आल्या होत्या. भाजप नेते सातत्याने कायदा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. परंतु तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे की, मागील २० पैकी १७ वर्षांच्या कालावधीत जदयूचे सरकार भाजपबरोबर सत्तेत होते. त्यामुळे हा दावा पोकळ आहे.
दरम्यान...
विधानसभा बरखास्त होण्याची भीती दाखवून जदयू व राजदच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे एक माजी केंद्रीय मंत्री व संघटन मंत्र्याने तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा तेजस्वी यादव यांची भेट घेऊन अनेक पर्यायांवर चर्चा केली. तेजस्वी यादव हे काही काळासाठी अस्थिर सरकार चालविण्याऐवजी स्थिर सरकारसाठी बहुमत स्थापन करण्याच्या विचाराचे आहेत.
बिहारच्या विधानसभेत सदस्य : २४२
७९ राजद
४३ जदयू
१९ काॅंग्रेस
१६ डावे
भाजपकडे ७५ आमदार आहेत.
No comments:
Post a Comment