वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ नागरिकांना खुशखबर दिली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे . त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ज्या नागरिकांनी आपली वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकण्यात आली असून त्यासाठी कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, याबाबतचे धोरण लवकरच ठरवले जाईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
No comments:
Post a Comment