वेध माझा ऑनलाइन - कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज मंत्री शंभूराज देसाई आपल्या पाटण मतदार संघात पहिल्यांदाच
आले दरम्यान त्यांचे येथील पाटण तिकाटने येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले
यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली
त्यानंतर त्यांची तिथून पाटण तालुक्यातील मरळी गावापर्यंत जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी पाटणकडे जाणारी व तिथून कराडला येणारी वाहतूक मात्र प्रचंड प्रमाणात खोळंबली होती... दरम्यान आदित्य ठाकरेंनी पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हान देसाई याना पाटण मध्ये येऊन काही दिवसांपूर्वी दिले होते...गद्दार असल्याची टीका देखील केली होती... त्याचे उत्तर आज शंभूराज देसाई काय देणार ? हेच आता संपूर्ण जिल्ह्याला पहायचे आहे...
कॅबिनेट मंत्री म्हणून पाटण चे आमदार शंभूराज देसाई यांनी नुकतीच शपथ घेतली आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात प्रमुख विश्वासू मंत्री म्हणून शंभूराज देसाई यांची वर्णीदेखील लागली आहे... शिवसेनेतून एकनाथ शिंदेसह बंडखोरी करण्यासाठी पुढाकार घेतलेले आमदार म्हणून त्यांची राज्यभर ओळख झाली आहे... सांगोलयाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी याविषयी बोलताना...मी आणि शंभूराज देसाई आम्ही दोघे सर्वात पहिल्यांदा गुवाहाटी ला पोचलो... नंतर एकनाथ शिंदे व इतर लोक त्याठिकाणी आले.. असे एका मुलाखती दरम्यान सांगितले होते... म्हणजेच शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पॉकेट मिनिस्ट्रीतले आहेत हे नव्याने सांगायला नको... ते आज शपथविधी नंतर पहिल्यांदाच आपल्या पाटण मतदार संघात आले आहेत...
दरम्यान, त्यांचे येथील पाटण तिकाटने येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले त्यानंतर त्यांची तिकाटने ते मरळी अशी ही मिरवणूक काढण्यात आली... यावेळी मंत्री देसाई यांचे समर्थक गाड्यांचा ताफा घेऊन एकामागून एक असे शेकडोंच्या संख्येने त्यांच्या वाहनांसाहित हजर होते... यामुळे पाटण पासून कराडकडे.. व कराडकडून पाटणकडे...जाणारी वाहतुक प्रचंड प्रमाणात दोन्ही बाजूने थटून राहिली होती... त्यामुळे प्रवासी जनता बराच काळ त्याठिकाणी खोळंबली होती...
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होणार अशीही सध्या चर्चा आहे... उद्या 15 ऑगस्ट रोजी पाटण मतदार संघातील अनेक शासकीय कार्यालयात ते स्वतः ध्वजारोहण करणार असल्याची माहिती मिळत आहे...
आज मिरवणूक पार पडल्यानंतर मंत्री देसाई पाटण भागात मोठे शक्ती प्रदर्शनदेखील करणार आहेत असेही समजते...
काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी त्याठिकाणी मंत्री देसाई यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांची खुपच मोठी जाहीर सभा घेतली होती... त्यावेळी ठाकरेंनी देसाई गद्दार असल्याचे मतदार संघाला सांगितले होते... आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा असे आव्हानही देसाई याना दिले होते... त्याचे उत्तर आज मंत्री शंभूराज देसाई काय देणार ? हेच आता संपूर्ण जिल्ह्याला पहायचे आहे...
No comments:
Post a Comment