Thursday, August 11, 2022

कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा ; उद्या सकाळी 10 वाजता धरणाचे वक्रदरवाजे उघडून करणार 8000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग...

वेध माझा ऑनलाइन - सध्या कोयना धरणात 85.21 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 55 हजार 477 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 रोजी 8000 क्युसेस पाणी मुख्य दरवाजातून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 4.75 TMC इतकी वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फूट इतके उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment