Saturday, August 27, 2022

शरद पवारांचे नातू ईडी च्या रडारवर ; रोहित पवारांची ईडी चौकशी होणार ; ग्रीन एकर कम्पनीची चौकशी सुरू...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून वारंवार राज्य सरकार, भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. ते सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं रोखठोक मत मांडताना दिसत आहेत. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांच्या पाठीमागे आता ईडीचा ससेमिराला लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. ते सध्या एका बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी आहेत.

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते.

No comments:

Post a Comment