Saturday, August 27, 2022

बच्चू कडुंची जीभ घसरली ; आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही ; आमदार रवि राणांना लगावला टोला...

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर, गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदार सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा झाले आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. बंडखोर आमदारांना पैसे घेतल्याच्या आरोपावरुन टार्गेट करण्यात येत आहे. त्यावरुन, माजी मंत्री बच्चू कडू यांनी अपक्ष आमदार रवि राणा यांच्यावर जबरी टिका केली आहे. आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही, असा टोलाच कडू यांनी आमदार रवि राणांना लगावला आहे

विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. आता, शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं. बच्चू कडूंनी अशी नामर्दासारखी काय घोषणाबाजी करत म्हणत विरोधकांना टोला लगावला. मात्र, आता भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आमदार रवि राणा यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे. आमदार रवि राणा यांनी गुवाहटी म्हणत बच्चू कडूंना डिवचलं होतं. त्यावर, कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,' असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ चांगलीच घसरली. 'अबे हरामखोराची औलाद...आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे,' असं आमदार कडू यांनी म्हटलं. तसेच, आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असा टोलाही कडू यांनी आमदार रवि राणांना लगावला.
'मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते', असे म्हणत नाव न घेता आमदार अमोल मिटकरीवर निशाणा साधला. तसेच, '५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या', असं आव्हानच आमदार कडूं यांनी विरोधकांना दिलं आहे. 
 



No comments:

Post a Comment