Saturday, August 27, 2022

वेध माझा ऑनलाइन - मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोडींच्या या समस्येमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती टोलमाफीची घोषणा केली आहे. वाहतूक कोडींची समस्या सुटावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे. या आदेशानुसार ही टोलमाफी आजच्या दिवसासाठी असणार आहे.

राज्यात सर्वत्र सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक आपल्या गावी जात आहेत. अनेक प्रवासी आज पुण्याच्या दिशेला जात आहेत. याशिवाय आज शनिवार आहे. शनिवार हा शक्यतो सुट्टीचा वार असतो. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. काहीजण आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याशिवाय कोकणात गणेशोत्सवास जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्र्यांनी टोलमाफीची घोषणा केली आहे. पण कोकणात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणारे अनेक प्रवासी हे पुणे-कोल्हापूर मार्गाने कोकणात जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर काही ठिकाणी काम सुरु आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काल या रसत्यावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आज हा रस्ता पूर्ववत सुरु आहे. पण एकंदरीत रस्त्यावर वाढलेली वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत. यात टोल नाक्यावर गाड्यांच्या लांबच लांब रागा लागणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होवू शकते. काही टोल नाक्यावर फास्टटॅग चालत नाही. तर काही ठिकाणी पैसे देण्यात वेळ जाणे त्यामुळे वाहतूक कोंडी वाढू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करुन आजच्या दिवस मुंबई-पुणे महामार्गावर टोलमाफी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment