वेध माझा ऑनलाइन - आपल्या जिल्ह्यात मी तर म्हणतो, डाॅल्बी पाहिजेच अन् वाजलीच पाहिजे, असे आक्रमकपणे भाजप खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.
सातारा येथे छ. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, ज्या लोकांनी डाॅल्बी विकत घेतले आहे, त्यांनी काय करायचे. तुम्ही त्यांची डाॅल्बी घ्या, त्याचे पैसे द्या अन् तुम्हांला त्या डाॅल्बीचे जे काही करायचे ते करा. ज्यांनी गुंतवणूक केली आहे. त्याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही. डाॅल्बी व्यावसायिकाचे सर्व काही व्यवस्थित असते, तर त्यांनी गुंतवणूक केली असती का?
कुठला तरी लोकप्रतिनिधी सांगतो, हे करा, ते करू नका. कोण हे सांगणार ? डाॅल्बीला परवानगी दिली पाहिजे, अन् का नाही दिली पाहिजे याच शासनाने उत्तर द्यावे, परंतु डाॅल्बी वाजलीच पाहिजे. 2-3 तास डाॅल्बी चालली म्हणजे असे काय आभाळ कोसळते ?. ज्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अंबलवून आहे, त्यांचे सगळं कोसळेल. तेव्हा डाॅल्बी चालू झालीच पाहिजे.
No comments:
Post a Comment