वेध माझा ऑनलाइन - आज येथील सर्किट हाऊस येथे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असता, त्याठिकाणी अचानक लाईट गेली... मंत्री देसाई यांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा त्यांनी तेथील एका संबंधित अधिकाऱ्यांला बोलावून घेऊन आत्ताच लाईट कशी गेली ? अशी विचारणा केली... त्यावेळी, साहेब मला माहित नाही...मी नवीन आहे...असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई याना नम्रपणे सांगितले... संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला त्यावेळी...नवीन आहेस तर घरी जा...अशा भाषेत सुनावले... खरतर अचानक लाईट गेली त्याला कोणीच काही करू शकत नाही... जवळपास कोठेतरी लाईटचे काम सुरू असेल त्यामुळे असे होऊ शकते... याबाबत व्यवस्थित शब्दात विचारणा करून माहिती घेता आली असती...मात्र हा झालेला प्रकार तेथील उपस्थित पत्रकारांसहित अनेकांना त्यांची ही भाषा ऐकताना रुचला नाही...याबाबत त्याठिकाणी लगेचच उलटसुलट चर्चाही सुरू झाली...दरम्यान, पत्रकार परिषदेत केवळ आपलयाला काय म्हणायचे आहे एवढेच बोलून व पत्रकारांच्या प्रश्नांना गुळगुळीत उत्तरे देत... मला गडबड आहे... जायचय... असे सांगून केवळ 20 मिनिटात ते तेथून निघून गेले...
दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री देसाई म्हणाले... राज्यात अद्याप पालकमंत्री नेमणुका झाल्या नसल्या तरी राज्यातील कोणतेही काम अथवा निर्णय थांबलेले नाहीत लवकरच याही नेमणुका होतील मात्र... त्या नेमणुका अद्याप का झाल्या नाहीत ? याचे उत्तरं देणे त्यांनी टाळले
आम्ही यापूर्वीच्या महाआघाडी सरकार मध्ये असताना काही निंर्णय इच्छा नसताना घेतले ते निर्णय या सरकारमध्ये आल्यावर आम्ही बदलले आहेत असे सांगताना सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे आहेत असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करत पत्रकार परिषद संपवली
दरम्यान त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अधिवेशनात आपण मांडलेल्या विषयासंबंधीत कामाचा आढावा पत्रकारांना सविस्तरपणे सांगितला तसेच पाटण, कोयनानगर याठिकाणच्या काही "अपकमिंग' कामांच्या केलेल्या तरतुदींचीही माहिती त्यांनी यावेळी दिली
No comments:
Post a Comment