वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणाऱ्या आझाद चौकात भोई समाज व परिसरातील स्वातंत्र्य सेनानी़ना अनोखे
अभिवादन करण्यात आले.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजातील अनेक स्वातंत्र्य सेनानीनी चले जाव चळवळीत भाग घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा यशस्वीही केल्या होत्या. स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी बाबुराव कोतवाल यांच्याबरोबरही स्वातंत्र्य संग्रामात या सेनानींनी
भाग घेतला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमा जमवून त्या आझाद चौकातील मंडपात मांडल्या होत्या. सकाळी परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी या प्रतिमांचे पूजन केले.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, क्रांती सिंह नाना पाटील, बाबुराव कोतवाल यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सम्राट जिरंगे, यशवंत मुळे, गणपतराव चव्हाण, राजाराम जिरंगे, सखाराम चक्के, आकारात वंजारी, पा़डुरंग पाडळे, अब्दुल हमीद वाईकर, गणपती वंजारी, निवृत्ती मुळे, राजाराम शिंदे, यशवंत सातुरे, रामचंद्र मुळे अनंतराव मुळे आदी स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक सुभाषराव पाटील, श्रीकांत कोतवाल, राजेंद्रसिंह यादव, विष्णू पाटसकर, प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह नागरिकांनी त्याठिकाणी भेट दिली.
सायंकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनीही अभिवादन केले.
माजी नगरसेवक विनायक उर्फ श्रीकांत मुळे, दिनेश नलवडे, शिवलिंग नलवडे, शरद मुळे, सागर कांबळे, जितेंद्र ओसवाल यांच्यासह नवजवान गणेश मंडळ, शिवस्पर्श ट्रेकर्स, भोई समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment