वेध माझा ऑनलाइन - अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी थोरात यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल. थोरात यांच्याविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरीकडे डॉ. चत्तर यांच्या स्वानंद चत्तर या भावाने काल दुपारी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून सुरेश थोरात आणि इतर ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा सुरेश थोरात यांसह इतर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चत्तर यांनी थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना मात्र सोशल मीडियात केलेल्या पोस्टचा उल्लेख टाळला आहे.
No comments:
Post a Comment