Tuesday, August 30, 2022

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली ; बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाचे कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन...

वेध माझा ऑनलाइन - 
सन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विशेष दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाने कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 


ढेबेवाडी फाट्यापासून बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या अग्रस्थानी असलेल्या वाहनात केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उभे होते. 

भारत माता की जय अशा घोषणात देत निघालेली ही बाईक रॅली कोल्हापूर नाका, दत्त चौक, चावडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावर पोहचली. त्याठिकाणी ना. सोम प्रकाश यांनी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच रॅली दरम्यान महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच विजय दिवस चौकातील विजयस्तंभालाही अभिवादन करण्यात आले. 

यावेळी भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुदर्शन पाटसकर, सूरज शेवाळे, संतोष हिंगसे, मोहनराव जाधव, महादेव पवार, मुकुंद चरेगावकर, राजू मुल्ला, आबा गावडे, वसीम मुल्ला, संजय पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment