वेध माझा ऑनलाइन - शंभर कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. या दरम्यान त्यांची आज जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येवून पडले आहेत. त्यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहत आहेत. पण चक्कर येवून पडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. देशमुख यांना याआधी देखील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना खांद्याचं दुखणं वाढलं होतं. तसेच त्यांना वेगवेगळ्या व्याधी देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आजच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण जेलमधून याबाबतची माहिती समोर आली आहे.
No comments:
Post a Comment